Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashok Saraf: मराठी चित्रपटसृष्टीचे ‘मामा’ अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार; मुख्यमंत्र्यांनी केला गौरव

Ashok Saraf: ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांचा नागपुरात नागरी सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या अभिनयाचे आणि मराठी सिनेमातील योगदानाचे कौतुक केले.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 21, 2026 | 04:10 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अशोक सराफ यांचा नागपुरात भव्य नागरी सत्कार
  • मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं भरभरून कौतुक
  • अशोक सराफ यांचा ५ लाख रुपयांचा धनादेश देऊन गौरव
Ashok Saraf: मराठी माणसाच्या जीवनातील संघर्ष, वास्तव, मर्यादा, दुःख आणि आनंद अशोक सराफ यांच्या कलाकृतींमधून दिसतो. सर्वसामान्यांच्या जीवनातील या भावभावनांना त्यांनी आपल्या अभिनयातून हास्याची आणि आनंदाची किनार दिली. मराठी सिनेमा खऱ्या अर्थाने लोकाभिमुख करून त्याला वेगळी उंची प्राप्त करून देण्याचे कार्य ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांनी केले, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

महाराष्ट्र भूषण, पद्मश्री ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. नागपूर येथील वसंतराव देशपांडे सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.

नागपूर महानगरपालिका, विदर्भ गौरव प्रतिष्ठान आणि श्री सिद्धीविनायक ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने या नागरी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महापौर नीता ठाकरे, विदर्भ गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, श्री सिद्धीविनायक सेवा ट्रस्टचे अध्यक्ष व माजी आमदार संदीप जोशी, उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी-वखरे, नागपूर मनपातील सत्तापक्ष नेते नरेंद्र बोरकर आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर यांची उपस्थिती होती.

‘अशोक सराफ यांच्यासारखे कलाकार लाभणे अभिमानाची बाब’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, अशोक सराफ यांच्यासारखे कलाकार लाभणे ही मराठी रंगभूमी, चित्रपटसृष्टी आणि रसिकांसाठी अभिमानाची बाब आहे. त्यांच्या कलेचे कौतुक आणि योगदानाचा गौरव करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला हा नागरी सत्कार म्हणजे नागपूरकरांच्या वतीने व्यक्त करण्यात आलेली कृतज्ञता आहे.

अशोक सराफ यांच्या कलाकृतींनी अनेक पिढ्यांना आनंद दिला आहे. त्यांनी आपल्या सर्वांना मराठी सिनेमाची गोडी लावली. रसिकांच्या मनात त्यांनी निर्माण केलेल्या आनंदाचा हा सत्कार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

‘प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत’

सत्काराला उत्तर देताना अशोक सराफ यांनी नागपूरकरांचे आभार मानले. “आजच्या इतका भव्य सत्कार माझा आजवर झाला नाही. प्रेक्षक आहेत म्हणून आम्ही आहोत,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला अभिनेते पुष्कर श्रोत्री यांनी अशोक सराफ यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी त्यांच्या कारकिर्दीतील विविध आठवणींना उजाळा मिळाला.

Jay Jay Swami Samarth: स्वामींची शिवनाथ-राधाला अंतिम चेतावणी; दिला ३ दिवसांचा अवधी, अक्कलकोटमध्ये मोठा ट्विस्ट

अशोक सराफ यांचा विविध पुरस्कारांनी गौरव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अशोक सराफ यांना सन्मानचिन्ह आणि ५ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. विदर्भ गौरव प्रतिष्ठानतर्फे डॉ. गिरीश गांधी यांनी सन्मानचिन्ह आणि ५१ हजार रुपयांचा धनादेश देऊन त्यांचा सत्कार केला. तसेच श्री सिद्धीविनायक ट्रस्टतर्फे १ लाख रुपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला.

अशोक सराफ यांनी वयाच्या ८०व्या वर्षात पदार्पण केल्याबद्दल यावेळी ८० दिव्यांनी औक्षण करण्यात आले. महापौर नीता ठाकरे यांनीही कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित केले.

मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीत आपल्या अभिनयाने अनेक दशकं रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या अशोक सराफ यांच्या कारकिर्दीचा नागपुरात झालेला हा नागरी सत्कार त्यांच्या कलाप्रवासाचा गौरव करणारा ठरला.

Tarini Serial: देशाच्या सुरक्षेसाठी जीव धोक्यात घालणार ‘तारिणी’; अमृतसरमध्ये रंगणार गुप्त मोहिमेचा थरार

Web Title: Ashok saraf civic felicitation nagpur cm fadnavis praise veteran actor

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 04:10 PM

Topics:  

  • ashok saraf
  • devendra fadnavis
  • marathi movie

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
2

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष
3

Aali Mothi Shahani Movie: हृता-सारंगची ऑनस्क्रीन जुगलबंदी; ‘बोनिता बोनिता’ गाण्याने वेधलं लक्ष

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट
4

Chhaya Kadam Bhootam Bhayyam: छाया कदमांचा ‘भूतम भयम्’चा अनुभव; ‘जठाई’च्या व्यक्तिरेखेबाबत अभिनेत्रीने सांगितली मनातली गोष्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.