Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाटकानंतर आता चित्रपटातही ‘या’ जोडीचा डंका, “बाज्या बैज्या” मध्ये एकत्र झळकणार

अश्विनी कासार आणि ओमकार गोवर्धन पुन्हा एकदा एकत्र दिसणार असून प्रेक्षकांसाठी ही खास पर्वणी आहे. एका नाटकात एकत्र काम करत असणारी ही जोडी आता मोठ्या पडद्यावरही एकत्र दिसणार आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: May 05, 2026 | 10:10 AM
अश्विनी कासार आणि ओमकार गोवर्धन चित्रपटात झळकणार

अश्विनी कासार आणि ओमकार गोवर्धन चित्रपटात झळकणार

Follow Us
Follow Us:
  • अभिनेता ओमकार गोवर्धन आणि अभिनेत्री अश्विनी कासार यांची वर्णी
  • अभिषेक जावीर दिग्दर्शित माणदेश संस्कृती आणि त्याचा इतिहास उलगडणारा “बाज्या बैज्या”
  • नाटकानंतर आता चित्रपटातही एकत्र 
चित्रपट, मालिका, नाटक अशा तिन्ही क्षेत्रात आपल्या अभिनयाचा अनोखा ठसा उमटवलेला आणि घराघरात पोहचलेला अभिनेता ओमकार गोवर्धन आता पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर झळकण्यास सज्ज झाला आहे.”बाज्या बैज्या” असे अनोखे नाव असलेल्या चित्रपटातून तो आता रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

बोधी सिनेमा या निर्मिती संस्थेअंतर्गत या चित्रपटाची निर्मिती आणि प्रस्तुती करण्यात येणार आहे. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन अभिषेक जावीर करणार असून संगीत आणि पार्श्वसंगीत समाधान ऐवळे हे करणार आहेत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या वाघ्या मुरळी परंपरेवर आधारित असलेल्या “फुला” चित्रपटातून अभिषेक जावीर आणि समाधान ऐवळे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले पहिले पाऊल टाकले होते. “फुला” चित्रपटाच्या यशानंतर अभिषेक आणि समाधान हे पुन्हा एकदा जोमाने या चित्रपटाच्या तयारीसाठी सज्ज झाले आहेत.

मराठमोळ्या श्रेयस तळपदेचा नवा सिनेमा; ‘आई तारी तिला कोण मारी’,‘मर्दिनी’ सिनेमाच्या पोस्टरची पहिली झलक

काय आहे कथा?

स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये माणदेशात घडलेल्या सत्य कथेवरती आधारित हा चित्रपट आहे. कुकुडवाड मायणी या भागामध्ये प्रसिद्ध असणारे दोन नरवीर बाज्या आणि बैजा यांच्या जीवनावरती हा चित्रपट आहे. तिच्या समोर हे दोन्ही नरवीर गोफण नेमबाजी करण्यासाठी प्रसिद्ध होते. त्यांनी गोरगरीब आणि शेतकऱ्यांवरती होणारे अन्याय या विरोधात बंड केले होते. सशस्त्र इंग्रजा विरुद्ध त्यांनी आपल्या माणदेशी दुर्गम भागाचा वापर करून लढा उभारला होता. बंदूकधारी इंग्रज सैनिकांचे या दोन्ही नरवीरांनी आपल्या गोफनीने कित्येक वेळा डोके फोडले होते. गाव गावगाड्यातील जुलमी सावकार यांना त्यांनी  सळो की पळो करून सोडले होते. अशा थरारक आणि साहसी ऐतिहासिक घटनेवरती या चित्रपटाची कथा आधारलेली असल्याचे दिग्दर्शक अभिषेक जावीर यांनी सांगितले.

पुन्हा एकत्र 

अभिनेता ओमकार गोवर्धन सोबत आजवर  मालिकांमधून झळकणारी अभिनेत्री अश्विनी कासार हिची देखील मध्यवर्ती भूमिका साकारणार आहे. “फुला” चित्रपटातील अभिनेत्री मंजुशी खेत्री, आरोही गडदे, सनी कदम, सृष्टी जाधव, उमेश बोलके यांचाही अभिनय आपल्याला या चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रपटातील गीतांसाठी वेगळा बाज वापरणार असल्याचे संगीतकार समाधान ऐवळे यांनी सांगितले. चित्रपटाचे चित्रीकरण आता लवकरच सुरु होणार आहे. 

या दोन्ही कलाकारांची जोडगोळी सध्या एका नाटकात काम करत असून दोघांनाही प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे. याशिवाय ओमकार आणि अश्विनी दोघेही मालिकांमधूनही काम करत असल्याने त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. या चित्रपटाची नक्कीच प्रेक्षक उत्सुकतेने वाट पाहतील. 

Javed Akhtar यांच्याकडून रणवीर सिंहच्या Dhurandhar चे कौतुक; ‘प्रोपोगेंडा’ चित्रपटांच्या वादावरही मांडले परखड मत

Web Title: Ashwini kasar and omkar govardhan to act in film bajya baijya after working in drama together

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 10:09 AM

Topics:  

  • Entertainment News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत
1

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत

Dasami Marathi Movie: ‘दशमी’चा पहिला पोस्टर प्रदर्शित; महेश मांजरेकरांसह दिग्गज कलाकारांची फौज
2

Dasami Marathi Movie: ‘दशमी’चा पहिला पोस्टर प्रदर्शित; महेश मांजरेकरांसह दिग्गज कलाकारांची फौज

‘Toxic’साठी यशचा मोठा त्याग! नयनताराने सांगितला साडेचार वर्षांचा थक्क करणारा प्रवास
3

‘Toxic’साठी यशचा मोठा त्याग! नयनताराने सांगितला साडेचार वर्षांचा थक्क करणारा प्रवास

Amey Wagh: TVFचा पहिला मराठी चित्रपट जाहीर; अमेय वाघसह ‘या’ कलाकारांची फौज, नावही भन्नाट!
4

Amey Wagh: TVFचा पहिला मराठी चित्रपट जाहीर; अमेय वाघसह ‘या’ कलाकारांची फौज, नावही भन्नाट!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.