Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhata Marathi Movie: पिढ्यानपिढ्या दगड फोडणाऱ्या बापाचं मुलांसाठी मोठं स्वप्न; ‘भाटा’ची संवेदनशील कहाणी उलगडणार

Bhata Marathi Movie: बेलदार समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या बापाची संवेदनशील कहाणी ‘भाटा’ चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. चित्रपट ११ सप्टेंबरला प्रदर्शित होणार.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 08, 2026 | 03:30 PM
(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य -सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bhata Marathi Movie:आजच्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगातही समाजातील काही घटक शिक्षणापासून वंचित आहेत. अशाच एका वंचित घटकाच्या संघर्षाची संवेदनशील कहाणी आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. बेलदार समाजाचा इतिहास आणि शिक्षणासाठीच्या संघर्षाची गोष्ट मांडणारा ‘भाटा’ हा मराठी चित्रपट ११ सप्टेंबरपासून सर्वत्र चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

‘भाटा’च्या माध्यमातून पिढ्यानपिढ्या दगड फोडत उदरनिर्वाह करणाऱ्या बेलदार समाजातील एका वडिलांची आपल्या मुलांना शिकवून त्यांच्या आयुष्याला नवी दिशा देण्याची धडपड दाखवण्यात आली आहे. गरिबी, प्रतिकूल परिस्थिती आणि पारंपरिक विचारांना सामोरं जात मुलांना शिक्षण देण्यासाठी केलेला संघर्ष या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे.

बेलदार समाजाचा इतिहासही उलगडणार

पारंपरिक समाजरचनेत प्रत्येक समाजघटकाच्या कामाचे स्वरूप निश्चित होते. मात्र, काळ बदलला तशी परिस्थितीही बदलत गेली आणि नव्या पिढीने नवी स्वप्ने पाहण्यास सुरुवात केली. तरीही बेलदार समाजासारख्या अनेक घटकांतील मुले आजही शिक्षणापासून वंचित आहेत.

याच वास्तवावर ‘भाटा’ भाष्य करतो. शिक्षण, नव्या पिढीची स्वप्ने, प्रथा-परंपरा आणि बदलत्या सामाजिक परिस्थितीच्या माध्यमातून एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न चित्रपटातून करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, बेलदार समाजाचा इतिहास उलगडण्याचा प्रयत्नही या चित्रपटातून करण्यात आला आहे.

Abhinay Berde Career Break: अभिनय बेर्डेने अचानक का घेतला करिअरमधून ब्रेक? VIDEO शेअर करत सांगितलं खरं कारण

दमदार स्टारकास्ट

‘भाटा’मध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अरुण नलावडे, प्रशांत मोहिते, अभिनेत्री रुपाली जाधव, विजय कदम, अनिल नगरकर, लक्ष्मण दावभट, ऋषभ जाधव, प्रेमा किरण आणि बालकलाकार तनिष्का जाधव यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत.

व्ही. डी. एंटरटेनमेंट आणि मोरया उद्योग समूह यांनी या चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. अरायव्हल स्टुडिओ प्रा. लि. या निर्मिती संस्थेने चित्रपटाची निर्मिती केली असून सुनील आबा जाधव आणि विजय चंद्रकांत चव्हाण हे निर्माते आहेत. रिजवान शेख, मितेश पराडकर आणि सुनील कातकर हे सहनिर्माते आहेत.

भरतराज नारायण यादव यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. कथा विजय चंद्रकांत चव्हाण यांची असून पटकथा आणि संवाद शरद कारंडे यांचे आहेत. श्रेयस आंगणे यांनी गीतलेखन आणि संगीताची जबाबदारी सांभाळली आहे. हरेश सावंत यांनी छायाचित्रण केले आहे.

Operation Ganga: मोहनलालच्या ‘ऑपरेशन गंगा’त दिसणार लष्करी कारवाईचा थरार; कॉम्बॅट ॲडव्हायझर म्हणून वर्लिन पंवारांची एन्ट्री

ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद

चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा टीझर याआधी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता ‘भाटा’चा प्रभावी ट्रेलरही लाँच करण्यात आला आहे. ट्रेलरला सोशल मीडियावर चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपटाची संकल्पना आणि मांडणीचं कौतुक होत आहे.

शिक्षणापासून वंचित राहिलेल्या समाजघटकाची व्यथा आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झगडणाऱ्या बापाची कहाणी मांडणारा ‘भाटा’ ११ सप्टेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Web Title: Bhata marathi movie beldar community education struggle

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी
1

Marathmola Fashion Show 2026: मराठमोळ्या साजशृंगाराचा दिमाखदार जलवा; ‘मराठमोळा फॅशन शो २०२६’मध्ये कलाकारांची मांदियाळी

Abhinay Berde Career Break: अभिनय बेर्डेने अचानक का घेतला करिअरमधून ब्रेक? VIDEO शेअर करत सांगितलं खरं कारण
2

Abhinay Berde Career Break: अभिनय बेर्डेने अचानक का घेतला करिअरमधून ब्रेक? VIDEO शेअर करत सांगितलं खरं कारण

Operation Ganga: मोहनलालच्या ‘ऑपरेशन गंगा’त दिसणार लष्करी कारवाईचा थरार; कॉम्बॅट ॲडव्हायझर म्हणून वर्लिन पंवारांची एन्ट्री
3

Operation Ganga: मोहनलालच्या ‘ऑपरेशन गंगा’त दिसणार लष्करी कारवाईचा थरार; कॉम्बॅट ॲडव्हायझर म्हणून वर्लिन पंवारांची एन्ट्री

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!
4

Bandkhor Marathi Movie: अन्यायाविरोधात पेटल्या सहा स्त्रिया, उचललं बंडाचं पाऊल; ‘बंडखोर’चा दमदार ट्रेलर रिलीज!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.