Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bhata Marathi Movie: बेलदार समाजाची वेदना मोठ्या पडद्यावर! ‘भाटा’ चित्रपटाचे पोस्टर लॉन्च; ‘या’ दिवशी होणार प्रदर्शित

'भाटा' या मराठी चित्रपटातून बेलदार समाजाचा संघर्ष मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचे पोस्टर लॉन्च झाले असून हा चित्रपट ऑगस्ट महिन्यात या दिवशी प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 05, 2026 | 10:56 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Bhata Marathi Movie मराठी चित्रपटसृष्टीत सामाजिक आशयाचे विषय प्रभावीपणे मांडण्याची परंपरा कायम आहे. त्याच परंपरेला पुढे नेत ‘भाटा’ हा आगामी मराठी चित्रपट बेलदार या भटक्या जमातीच्या संघर्षमय जीवनावर प्रकाश टाकणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले (मंत्री, सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, लातूर) यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. हा चित्रपट २८ ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

बेलदार समाजाच्या वास्तवावर भाष्य

‘भाटा’ हा चित्रपट बेलदार समाजाच्या कष्टमय आयुष्याची कथा मांडतो. दगड फोडून उदरनिर्वाह करणाऱ्या या भटक्या समाजातील लोकांचे संघर्ष, त्यांची स्वप्ने आणि सामाजिक वास्तव चित्रपटातून उलगडणार आहे. चित्रपटातील ‘राणा’ हे पात्र आपल्या मुलीला शिक्षण देऊन मोठे करण्याचे स्वप्न पाहते. मात्र, सामाजिक बंधने आणि प्रतिकूल परिस्थितीत तो हे स्वप्न पूर्ण करू शकतो का, याची हृदयस्पर्शी कहाणी चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

Genelia D’Souza Birthday: अवघ्या १५व्या वर्षी ‘बिग बीं सोबत काम करण्याची संधी; मात्र ‘या’ कारणामुळे जेनेलियाने दिला होता नकार

दमदार स्टारकास्टची साथ

या चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी, अरुण नलावडे, विजय कदम, अनिल नगरकर, लक्ष्मण देवभट, प्रशांत मोहिते, अभिनेत्री रुपाली जाधव, प्रेमा किरण आणि बालकलाकार तनिष्का जाधव यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

निर्मिती आणि दिग्दर्शन

व्ही. डी. एंटरटेनमेंट आणि मोरया उद्योग समूह प्रस्तुत तसेच अरायव्हल स्टुडिओ प्रा. लि. निर्मित ‘भाटा’ या चित्रपटाचे निर्माते सुनील आबा जाधव आणि विजय चंद्रकांत चव्हाण आहेत. रिजवान शेख, नितेश पराडकर आणि सुनील कातकर हे सहनिर्माते आहेत.

चित्रपटाचे दिग्दर्शन भरतराज नारायण यादव यांनी केले असून अक्षय सुतार यांनी सहदिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. कथालेखन विजय चंद्रकांत चव्हाण यांचे असून पटकथा आणि संवाद शरद कारंडे यांनी लिहिले आहेत. गीत आणि संगीताची धुरा श्रेयस आंगणे यांनी सांभाळली असून छायाचित्रण हरेश सावंत यांचे आहे.

Pradeep Rawat Death: सिनेसृष्टीवर शोककळा! ‘गजनी’ फेम ज्येष्ठ अभिनेते प्रदीप रावत यांचे निधन; ७४ व्या वर्षी संपला अभिनयाचा प्रवास

२८ ऑगस्टला होणार प्रदर्शित

बेलदार समाजाच्या वेदना, संघर्ष आणि स्वप्नांना पडद्यावर आणणारा ‘भाटा’ हा चित्रपट २८ ऑगस्ट २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून, सामाजिक आशय असलेल्या चित्रपटांची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी तो एक वेगळा अनुभव ठरण्याची शक्यता आहे.

Web Title: Bhata marathi movie poster launch release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 05, 2026 | 10:56 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie

संबंधित बातम्या

Bandhu Movie: भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र
1

Bandhu Movie: भावाच्या गोष्टीत बहिणींच्या नात्याचा हळवा स्पर्श; ‘बंधू’ चित्रपटात मृण्मयी देशपांडे आणि स्मिता तांबे प्रथमच एकत्र

‘अबीर’ चित्रपटातील ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ गाण्यात मानसी शिंदेच्या लावणीचा ठसकेबाज ठेका!
2

‘अबीर’ चित्रपटातील ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ गाण्यात मानसी शिंदेच्या लावणीचा ठसकेबाज ठेका!

Jai Shree Ram Marathi Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं? ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात
3

Jai Shree Ram Marathi Movie: अयोध्येतील राम मंदिरानंतर पाकिस्तानमध्ये काय घडलं? ‘जय श्री राम’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात

Chikizing Movie: ‘चला चला मामाच्या गावाला…’ म्हणत उपेंद्र लिमये घेऊन येणार बालपणीच्या आठवणींची सफर; ‘चिकीझिंग’चे गाणे रिलीज
4

Chikizing Movie: ‘चला चला मामाच्या गावाला…’ म्हणत उपेंद्र लिमये घेऊन येणार बालपणीच्या आठवणींची सफर; ‘चिकीझिंग’चे गाणे रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.