Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगार तरुणाच्या संघर्षाची आणि अमेरिकेतून मिळणाऱ्या अनपेक्षित संधीची धमाल गोष्ट ‘कोलंबस’ या मराठी चित्रपटातून उलगडणार आहे. अंकुर वाढवे अभिनीत हा चित्रपट ११ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 13, 2026 | 11:52 AM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Columbus Marathi Movie: मराठी मनोरंजनविश्वात विविध विषयांवर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. यातच आता शिक्षण, बेरोजगारी आणि सरकारी नोकरीसाठी तरुणांना करावा लागणारा संघर्ष अधोरेखित करणारा ‘कोलंबस’ हा नवा मराठी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रंजक कथानक आणि दमदार कलाकारांची फळी असलेला हा चित्रपट येत्या ११ डिसेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे टीझर पोस्टर सोशल मीडियावर लाँच करण्यात आले.

‘कोलंबस’ची निर्मिती आणि कलाकारांची फळी

एस. एस. आर. फिल्म्स प्रस्तुत ‘कोलंबस’ या चित्रपटाची निर्मिती सतीश नाईक, रोहित गुप्ता आणि सनोबर लाकडावाला यांनी केली आहे. रवींद्र शिवाजी यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, गौरव कुलकर्णी यांनी छायालेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. रोहन पाटील आणि सुयश जाधव यांनी संकलन केले आहे, तर वैभव शिरोळे यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे.

चैतन्य पिसाळ यांनी चित्रपटाचे लेखन आणि क्रिएटिव्ह दिग्दर्शन केले आहे. रोहित नागभिडे यांनी पार्श्वसंगीत दिले असून, आनंद शिंदे आणि कैलास वाघमारे यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. या चित्रपटात अंकुर वाढवे, रोहित माने आणि ‘सातारचा बच्चन’ म्हणून ओळखले जाणारे किरण माने महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत. मुकुंद हंगेकर यांनी कार्यकारी निर्माता म्हणून काम पाहिले आहे.

Adinath Kothare Upcoming Movies: आदिनाथ कोठारेची बॉलिवूडमध्ये मोठी झेप! ‘रामायण’सह दोन बिग बजेट चित्रपटांत झळकणार

सुशिक्षित तरुणाच्या आयुष्याला मिळणार अनपेक्षित वळण

पश्चिम महाराष्ट्रातील एका गावात कैलास नावाचा सुशिक्षित तरुण राहतो. त्याची उंची अवघी तीन फूट असली, तरी शिक्षक होण्याचे स्वप्न त्याने उराशी बाळगले आहे. मात्र, शिक्षणाचे खासगीकरण आणि सरकारी शिक्षक भरतीतील अडचणींमुळे त्याच्या स्वप्नपूर्तीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात.

शिक्षण घेऊनही अपेक्षित नोकरी न मिळाल्याने अनेक तरुण संघर्ष करताना दिसतात. कैलासची गोष्टही याच वास्तवाशी जोडलेली आहे. अशातच त्याच्या आयुष्यात थेट अमेरिकेतून एक अनपेक्षित संधी चालून येते. या संधीमुळे कैलासच्या आयुष्यात काय बदल घडतात? त्याच्या स्वप्नांना नवी दिशा मिळते का? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटातून उलगडणार आहेत.

Ranvir Shorey On CJP Protest: ‘लोकशाहीची हत्या’; CJPच्या आंदोलनावर बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीचा तीव्र विरोध

११ डिसेंबरला चित्रपटगृहांत रंगणार ‘कोलंबस’ची गोष्ट

शिक्षण, रोजगार आणि सरकारी नोकरीसाठी सुरू असलेली धडपड हे आजच्या तरुणाईशी संबंधित विषय आहेत. याच पार्श्वभूमीवर एका ग्रामीण तरुणाच्या संघर्षाची आणि त्याला मिळणाऱ्या अनपेक्षित संधीची गोष्ट ‘कोलंबस’मधून मांडण्यात येणार आहे.

आगळेवेगळे कथानक आणि ग्रामीण भागातील तरुणाच्या आयुष्यात घडणाऱ्या नाट्यमय घडामोडींमुळे हा चित्रपट लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे. आता ११ डिसेंबरला प्रदर्शित होणाऱ्या ‘कोलंबस’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.

Web Title: Columbus marathi movie teaser poster release date ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 11:52 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie

संबंधित बातम्या

Adinath Kothare Upcoming Movies: आदिनाथ कोठारेची बॉलिवूडमध्ये मोठी झेप! ‘रामायण’सह दोन बिग बजेट चित्रपटांत झळकणार
1

Adinath Kothare Upcoming Movies: आदिनाथ कोठारेची बॉलिवूडमध्ये मोठी झेप! ‘रामायण’सह दोन बिग बजेट चित्रपटांत झळकणार

RJ Mitte Death: ‘ब्रेकिंग बॅड’ फेम अभिनेत्याचा धक्कादायक मृत्यू; वयाच्या ३४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2

RJ Mitte Death: ‘ब्रेकिंग बॅड’ फेम अभिनेत्याचा धक्कादायक मृत्यू; वयाच्या ३४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Ranvir Shorey On CJP Protest: ‘लोकशाहीची हत्या’; CJPच्या आंदोलनावर बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीचा तीव्र विरोध
3

Ranvir Shorey On CJP Protest: ‘लोकशाहीची हत्या’; CJPच्या आंदोलनावर बॉलिवूड अभिनेता रणवीर शौरीचा तीव्र विरोध

Ranveer Singh New Car: महागड्या गाड्यांची आवड असलेल्या रणवीर सिंहची नवी खरेदी; १.९५ कोटींच्या कारमध्ये खास काय?
4

Ranveer Singh New Car: महागड्या गाड्यांची आवड असलेल्या रणवीर सिंहची नवी खरेदी; १.९५ कोटींच्या कारमध्ये खास काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.