
फोटो सौजन्य - Social Media
दीपाली सय्यद झळकणार सिनेमात?
Bigg Boss Fame अभिनेत्री दीपाली सय्यद या सिनेमात झळकण्याची शक्यता दाट आहे. सिनेमात दीपाली सय्यद राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांच्या भूमिकेत दिसू शकतात. मुळात, याबाबत स्वतः दीपाली सय्यद यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात की, “Bigg Boss च्या घराबाहेर आल्यानंतर मला या संपूर्ण प्रकरणाचा आराखडा समजला. ज्यावेळी मला कळालं की या संपूर्ण प्रकरणावर आधारित एका मराठी सिनेमाची निर्मिती होत आहे, मी त्याच क्षणी सिनेमासाठी होकार दिला.” दीपाली सय्यद यांनी या सिनेमात एका महत्वाच्या भूमिकेत झळकणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच राजकीय वर्तुळात आणि सिनेक्षेत्रामध्ये होणाऱ्या चर्चेनुसार, त्या rupali chakankar यांच्या भूमिकेत झळकणार असल्याचे सगळीकडे म्हंटले जात आहे.
अभिनेत्रीने लोकांना केले सावध!
सिनेमाविषयी सांगताना दीपाली यांनी लोकांना सावध केले आहे. त्या सांगतात की, “खरातसारखे कित्येक भोंदूबाबा आजही आपल्या समाजात आहेत. लोकांच्या विश्वसाचा गैरफायदा घेणाऱ्या अशा ढोंगींविषयी समाजात जागरूकता असणे गरजेचे आहे.” हे प्रकरण राज्यातील एक धक्कादायक प्रकरण आहे, यामध्ये राजकीय क्षेत्रातील कोणते महत्वाचे चेहरे सूत्रधार होते? ज्यांवर आरोप झाले त्या राजकीय व्यक्तिमत्त्वांचा खरंच या गोष्टींशी तितका संबंध आहे? या सगळ्या गोष्टी या सिनेमात कशा प्रकारे दाखवण्यात आल्या आहेत? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.