Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dharau Marathi Movie Released: गोमाता आणि चिमुकल्याच्या नात्याची भावस्पर्शी कहाणी! ‘धाराऊ’ची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा

Dharau Marathi Movie Released: ‘धाराऊ... ती गाय नाय... माय हाय!’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ पासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. गोमातेप्रती श्रद्धा, गोरक्षण आणि एका लहानग्याला गोमातेमध्ये अनुभवायला मिळणारी आईची माया, या भावनिक विषयांवर चित्रपटाची कथा आधारित आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 23, 2026 | 06:55 PM
Dharau Marathi Movie Released: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Dharau Marathi Movie Released: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘धाराऊ’ चित्रपट २३ ऑक्टोबरपासून प्रदर्शित
  • गोमाता आणि चिमुकल्याच्या मायेची हृदयस्पर्शी कहाणी
  • गोरक्षणाच्या संवेदनशील विषयाला भावनिक स्पर्श

मुंबई, २३ ऑक्टोबर २०२६ : गोमातेप्रती असलेली श्रद्धा, गोरक्षणाचा विषय आणि एका लहानग्याचं आपल्या आईशी असलेलं भावनिक नातं यांची गुंफण असलेला ‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ हा बहुचर्चित मराठी चित्रपट आज, २३ ऑक्टोबरपासून संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि मोशन पोस्टर प्रदर्शित झाल्यापासून सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा सुरू असून, आता प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर ही भावस्पर्शी कथा अनुभवता येणार आहे. Dharau Marathi Movie Released:

गोमातेची हृदयस्पर्शी कहाणी

आई आणि लेकराचं नातं हे जगातील सर्वात निःस्वार्थ नात्यांपैकी एक मानलं जातं. मात्र, आईच्या मायेचा अनुभव एका लहानग्याला गोमातेमध्ये मिळाला, तर? हाच भावनिक धागा पकडत ‘धाराऊ’ चित्रपटातून एका निरागस बालमनाची आणि गोमातेची हृदयस्पर्शी कहाणी उलगडते. गोमातेप्रती असलेली श्रद्धा, भारतीय संस्कृतीतील तिचं स्थान आणि माणूस व प्राणी यांच्यात निर्माण होणारं नातं या विषयांना चित्रपटातून स्पर्श करण्यात आला आहे.

Aai Tuljabhavani Marathi Serial: तुळजाईचा अवतार, असुरी शक्तींवर प्रहार! ‘आई तुळजाभवानी’मध्ये पाहा दैवी शक्तीचा महिमा

भावविश्वातून चित्रपट प्रेक्षकांशी संवाद

‘धाराऊ… ती गाय नाय… माय हाय!’ ही चित्रपटाची टॅगलाइनच या कथेमागील भावविश्व अधोरेखित करते. गोमाता ही केवळ एक गाय नसून, तिच्यामध्ये आईचं रूप पाहणाऱ्या एका लहानग्याच्या भावविश्वातून चित्रपट प्रेक्षकांशी संवाद साधतो. त्यामुळे हा चित्रपट केवळ गोरक्षणाच्या विषयापुरता मर्यादित न राहता, माया, प्रेम, श्रद्धा आणि भावनिक नात्यांचा अनुभव देणारा ठरतो.

बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस

या चित्रपटाचं लेखन, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन मनीष सुरेश शिंदे यांनी केलं आहे. बुलढाणा अर्बन मीडिया हाऊस आणि हिंदचित्र फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती श्री. राधेश्यामजी चांडक (भाईजी), डॉ. श्री. सुकेशजी झंवर आणि सौ. कोमलजी झंवर यांनी केली आहे.

Punah Nakki Bhetu Marathi Play: मुक्ता बर्वे–प्रियदर्शन जाधव पहिल्यांदाच एकत्र! ‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांचा अनोखा खेळ

‘धाराऊ’ प्रेक्षकांना विचार करायला लावणारा

गोरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयाला भावनिक कथेची जोड देणारा ‘धाराऊ’ प्रेक्षकांना विचार करायला लावणारा आणि नात्यांमधील मायेची जाणीव करून देणारा चित्रपट आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चेनंतर आता चित्रपटगृहांत प्रदर्शित झालेल्या ‘धाराऊ’ला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो, याकडे चित्रपटसृष्टीचं लक्ष लागलं आहे.

Web Title: Dharau marathi movie released child cow emotional story rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 06:55 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Nagpur News : दलित वस्ती सुधार निधी अडचणीत; ३५ कोटींच्या तरतुदीत ५५ कोटींच्या कामांना मंजुरी!
1

Nagpur News : दलित वस्ती सुधार निधी अडचणीत; ३५ कोटींच्या तरतुदीत ५५ कोटींच्या कामांना मंजुरी!

Aai Tuljabhavani Marathi Serial: तुळजाईचा अवतार, असुरी शक्तींवर प्रहार! ‘आई तुळजाभवानी’मध्ये पाहा दैवी शक्तीचा महिमा
2

Aai Tuljabhavani Marathi Serial: तुळजाईचा अवतार, असुरी शक्तींवर प्रहार! ‘आई तुळजाभवानी’मध्ये पाहा दैवी शक्तीचा महिमा

Punah Nakki Bhetu Marathi Play: मुक्ता बर्वे–प्रियदर्शन जाधव पहिल्यांदाच एकत्र! ‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांचा अनोखा खेळ
3

Punah Nakki Bhetu Marathi Play: मुक्ता बर्वे–प्रियदर्शन जाधव पहिल्यांदाच एकत्र! ‘पुन्हा नक्की भेटू’मधून रंगणार नात्यांचा अनोखा खेळ

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ
4

Nagpur News : दिवाळीत ऑटोमोबाईल बाजाराला वेग; विक्रीत १२ टक्क्यांची वाढ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.