
Daryabhavani: चित्रपटाच्या यशासाठीच नाही, (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
‘दर्याभवानी’ हा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नसून, छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी सागरी धोरणाला आणि मराठी आरमाराच्या अद्वितीय पराक्रमाला मोठ्या पडद्यावर साकार करणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. या भव्य ऐतिहासिक प्रवासाची सुरुवात करताना दिग्पाल लांजेकर यांनी आपल्या संपूर्ण टीमलाच या शुभारंभाच्या केंद्रस्थानी ठेवत केलेली प्रार्थना विशेष लक्षवेधी ठरली.
लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या आगामी ‘दर्याभवानी’ चित्रपटाची निर्मिती श्री तिरुपती बालाजी चित्रचे प्रकाश पाटील, डॉ. अशोक जीवतोडे आणि एलेवेट फिल्म्सचे पवन सादमवार, सुरज सादमवार यांनी केली असून, पुष्कर यावलकर हे सहनिर्माते आहेत.
मुहूर्ताच्या प्रसंगी कलाकार, निर्माते आणि तंत्रज्ञ मोठ्या उत्साहात उपस्थित होते. पारंपरिक गाऱ्हाणं, कृतज्ञतेची भावना आणि सर्वांच्या भल्याची प्रार्थना अशा सकारात्मक वातावरणात ‘दर्याभवानी’च्या चित्रीकरणाच्या नव्या पर्वाला शुभारंभ झाला. ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ आणि ‘रणपति शिवराय’ या गाजलेल्या चित्रपटांनंतर ‘श्री शिवराज अष्टक’ मालिकेतील सातवा चित्रपट म्हणून ‘दर्याभवानी’कडे प्रेक्षक मोठ्या उत्सुकतेने पाहत आहेत. आता या अनोख्या आणि भावनिक मुहूर्ताने चित्रपटाच्या भव्य प्रवासाची सुरुवातही तितकीच खास आणि संस्मरणीय ठरली आहे.