Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abir Marathi Film Unveils New Poster: सौंदर्याच्या पलीकडील स्त्रीमनाचा वेध घेणारा ‘अबीर’ १८ डिसेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला.

Abir Marathi Film Unveils New Poster: स्त्रीचा आत्मसन्मान, मनोधैर्य आणि अस्तित्वाचा संघर्ष मांडणाऱ्या ‘अबीर’ या मराठी चित्रपटाचे नवे पोस्टर विजयादशमीच्या मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आले. सौंदर्याच्या पारंपरिक व्याख्या आणि स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचा सामाजिक दृष्टिकोन यांवर चित्रपट भाष्य करतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 20, 2026 | 06:09 PM
Abir Marathi Film Unveils New Poster: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Abir Marathi Film Unveils New Poster: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘अबीर’च्या नव्या पोस्टरने वाढवली चित्रपटाची उत्सुकता.
  • जर्मनी आणि दिल्लीतील चित्रपट महोत्सवांमध्ये ‘अबीर’ची निवड.
  • स्त्रीचा आत्मसन्मान आणि सौंदर्याच्या पारंपरिक कल्पनांवर भाष्य.

सौंदर्याच्या पारंपरिक व्याख्यांना छेद देत स्त्रीच्या आत्मसन्मानाचा, मनोधैर्याचा आणि अस्तित्वाच्या संघर्षाचा वेध घेणारा ‘अबीर’ हा मराठी चित्रपट रसिकांच्या मनात कुतूहल निर्माण करत आहे. मराठी चित्रपटाचा डंका सातासमुद्रापार घुमवणाऱ्या ‘अबीर’ने आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतील निवडीमुळेही विशेष लक्ष वेधून घेतले आहे. Abir Marathi Film Unveils New Poster:

विजयादशमीच्या मंगल मुहूर्तावर प्रदर्शित

आता विजयादशमीच्या मंगल मुहूर्तावर प्रदर्शित करण्यात आलेल्या चित्रपटाच्या नव्या पोस्टरने या उत्सुकतेत आणखी भर घातली आहे. स्त्रीच्या व्यक्तिमत्त्वाकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन, सौंदर्याच्या कल्पनांमागील पूर्वग्रह आणि तिच्या अंतर्मनातील भावविश्व यांची झलक देणारे हे पोस्टर चित्रपटाच्या आशयाविषयी अनेक प्रश्न उपस्थित करते.

श्री. सुदेश वसंतराव झावरे पाटील यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शंभो एंटरटेनमेंट व श्री महाकाल प्रॉडक्शन्स यांनी हा चित्रपट प्रस्तुत केला आहे. आकाश विष्णू शिंदे यांनी ‘अबीर’ या चित्रपटाचे पटकथा, संवाद व दिग्दर्शन केले आहे. सौंदर्यामुळे स्त्रीच्या कलागुणांपेक्षा तिच्यातील उणिवांनाच अधिक महत्त्व देणाऱ्या सामाजिक मानसिकतेवर चित्रपट भाष्य करतो.

प्रकाश-सावल्यांचा खेळ

स्त्रीने आत्मविश्वासाने उभे राहावे, तिच्यावरील भेदभाव आणि अत्याचार थांबावेत, हा या निर्मितीमागील महत्त्वाचा हेतू आहे. पोस्टरमध्ये गडद केशरी-तपकिरी रंगछटांच्या पार्श्वभूमीवर उमटलेली स्त्रीची छायाकृती, प्रकाश-सावल्यांचा खेळ आणि मध्यभागी झळकणारे ‘सौंदर्य चेहऱ्यात शोधायचं की संस्कारात?’ हे प्रश्नार्थक वाक्य लक्ष वेधून घेते. बाह्य सौंदर्यापेक्षा अंतर्मनातील संस्कार आणि व्यक्तिमत्त्वाचे मोल अधोरेखित करणारा हा दृश्यात्मक आशय चित्रपटाच्या मध्यवर्ती विचाराची चाहूल देतो.

दिग्दर्शक आकाश शिंदे यांच्या मांडणीतून स्त्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा आणि तिच्या सामर्थ्याची जाणीव समाजाला व्हावी, हा संदेश प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. जर्मनीतील २२व्या इंडियन फिल्म फेस्टिव्हल स्टुटगार्टमध्ये निवड झाल्यानंतर ‘अबीर’ची जागरण फिल्म फेस्टिव्हल, दिल्ली येथेही निवड झाली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील या निवडींमुळे चित्रपटाच्या सामाजिक आशयाला व्यापक व्यासपीठ मिळाले आहे.

पोस्टरमधील सूचक मांडणी

प्रदर्शित करण्यात आलेल्या ‘अबीर’च्या पोस्टरबाबत दिग्दर्शक आकाश विष्णू शिंदे म्हणाले, “बाह्यसौंदर्याच्या झगमगाटात अनेकदा स्त्रीचे अंतःसौंदर्य, तिची स्वप्ने आणि तिच्या भावविश्वातील असंख्य रंग दुर्लक्षित राहतात. याच उपेक्षित भावनांना संवेदनशीलतेचा स्पर्श देत स्त्रीच्या अस्तित्वाचा, संघर्षाचा आणि स्वाभिमानाचा वेध घेण्याचा प्रयत्न ‘अबीर’मधून केला आहे.

Dhanush-Mammootty Movie: धनुष-ममूटीच्या चाहत्यांसाठी खास भेट! ‘ओम: चैप्टर 1’मधील ‘वीझा वीरा’ गाणं प्रेक्षकांच्या भेटीला

पोस्टरमधील सूचक मांडणी, भावनांची गूढ किनार आणि त्यातून उमटणारा आशय कथानकातील अनेक पदरांविषयी उत्सुकता जागवतो. विजयादशमी हा वाईट प्रवृत्तींवर चांगुलपणाच्या विजयाचा सण आहे. त्याच धर्तीवर सौंदर्याच्या संकुचित कल्पनांवर माणुसकीच्या उदात्त विचारांचा विजय व्हावा, हीच ‘अबीर’मागील भावना आहे.”

निर्माते श्री. सुदेश वसंतराव झावरे पाटील म्हणाले, “सौंदर्याला वर्णाच्या चौकटीत बंदिस्त करणाऱ्या मानसिकतेवर प्रहार करताना स्त्रीच्या कर्तृत्वाला, तिच्या जिद्दीला आणि स्वाभिमानाला नवा आयाम देण्याचा आमचा प्रयत्न आहे. ‘अबीर’च्या पोस्टरमधील प्रत्येक भावछटा ही केवळ कथानकाची चाहूल नसून, समाजाच्या डोळ्यांवरील पूर्वग्रहांची झापडे दूर करण्याचे एक संवेदनशील आवाहन आहे.

भक्तीचा अबीर उधळणारा एक भावस्पर्शी चित्रानुभव

महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेत अबीर, वारकरी संप्रदाय आणि सावळ्या विठुरायाचे नाते हे केवळ श्रद्धेचे नसून, भक्तीच्या अखंड रंगात न्हाऊन निघालेल्या आत्मीयतेचे आहे. ‘अबीर’ हा केवळ मनोरंजनाचा चित्रपट नसून, मातीशी नाळ जपणाऱ्या ग्रामीण रसिकांपासून ते विठुमाऊलीच्या चरणी नतमस्तक होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या हृदयात भक्तीचा अबीर उधळणारा एक भावस्पर्शी चित्रानुभव ठरणार आहे.”

पायल जाधव, निखिल चव्हाण, देविका दफ्तरदार, अविनाश नारकर, गणेश देशमुख, प्राजक्ता हनमघर, गार्गी फुले, यश डिंबळे, रोशन सुनील राऊत, प्रशांत नेटके, गायत्री सुदेश झावरे, रेखा दहातोंडे, राजवर्धन झावरे, साईराज केंद्रे यांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

Akshaya Naik: दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर अक्षयाने सांगितला आयुष्यातील ‘सोनेरी क्षण’; या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर झळकणार अभिनेत्री

छायांकनाची जबाबदारी निशांत भागवत

तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री सुजित झावरे पाटील यांनीही चित्रपटांमध्ये विशेष भूमिका साकारली आहे. प्रोडक्शन विष्णू घोरपडे, कार्यकारी निर्माता मंगेश भीमराज जोंधळे (प्रसिद्धी आणि वितरण), छायांकनाची जबाबदारी निशांत भागवत यांनी सांभाळली असून, सह-दिग्दर्शन अमित खंडागळे, सचिन नागरे तसेच निलेश गावंड यांनी संकलन केले आहे.

संगीत आणि पार्श्वसंगीत रोहित नागभिडे यांचे असून आर्या आंबेकर, वैशाली माडे, राधा खुडे यांनी या चित्रपटातील गीतांचे पार्श्वगायन केले आहे. सुजित सुरवसे यांनी रंगभूषा, तर स्नेहल नार्वेकर यांनी वेशभूषेची जबाबदारी पार पाडली आहे. महेश गोरे यांनी कला दिग्दर्शन, विकास खंदारे यांनी ध्वनी संयोजन, तर स्वरूप जोशी यांनी ध्वनी संकलन केले आहे.

Web Title: Abir marathi film new poster international film festivals rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 06:09 PM

Topics:  

  • Entertainement News
  • imarathi movie
  • Marathi News

संबंधित बातम्या

World News : दहशतवादावर दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही! एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा
1

World News : दहशतवादावर दुटप्पी भूमिका खपवून घेणार नाही! एससीओ बैठकीत राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

Alto ला टक्कर देण्यासाठी नवी कार सज्ज! लुक जबरदस्त, फीचर्स स्मार्ट अन् किंमत बजेटमध्ये
2

Alto ला टक्कर देण्यासाठी नवी कार सज्ज! लुक जबरदस्त, फीचर्स स्मार्ट अन् किंमत बजेटमध्ये

Jalgaon News: वाहतूक पोलिसाने रोखताच व्यक्तीचा पारा चढला; थेट कॉलर पकडून घातली हुज्जत
3

Jalgaon News: वाहतूक पोलिसाने रोखताच व्यक्तीचा पारा चढला; थेट कॉलर पकडून घातली हुज्जत

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय
4

Chandrapur News: चंद्रपुरात पावसाची मोठी तूट; रब्बी पिकांचे नियोजन कसे कराल? कृषी विभागाने सांगितला पर्याय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.