Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Gondhal Movie on Oscar: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी रंगणार! ९ ऑक्टोबरपासून देशभरातील ‘या’ ६ शहरांत खास शो

Gondhal Movie on Oscar: संतोष डावकर लिखित-दिग्दर्शित ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाची ९९व्या अकादमी पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून निवड झाली आहे. ऑस्करच्या पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबरपासून 'या' सहा शहरांमध्ये विशेष स्क्रीनिंग होणार आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Oct 03, 2026 | 06:25 PM
Gondhal Movie on Oscar: ‘ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Gondhal Movie on Oscar: ‘ (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ९ ऑक्टोबरपासून ६ शहरांत ‘गोंधळ’चे स्पेशल स्क्रीनिंग होणार.
  • मुंबई आणि पुण्यात प्रत्येकी ४ थिएटर्समध्ये स्क्रीनिंगला सुरुवात होईल.
  • ऑस्कर एन्ट्रीनंतर चित्रपट ६ भाषांमध्ये रिलीज करण्याची निर्मात्यांची योजना.
मराठी सिनेसृष्टीसाठी एक मोठी आणि अभिनयास्मद गोष्ट समोर आली. संतोष डावकर दिग्दर्शित गोंधळ या मराठी चित्रपट ऑस्कर पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 99 व्या अकादमी पुरस्कार (ऑस्कर)साठी भारताची अधिकृत एन्ट्री म्हणून ‘गोंधळ’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. ही गोष्ट प्रत्येक मराठी माणसांची छाती आनंदाने फुलवून येण्यासारखी आहे. Gondhal Movie on Oscar:

6 मोठ्या शहरात स्पेशल स्क्रीनिंग होणार

ऑस्करला जाण्याआधी मेकर्सनी एक खास प्लॅन केला आहे. जगभरात चित्रपट रिलीज करण्याआधी भारतातल्या 6 मोठ्या शहरांमध्ये त्याचे स्पेशल स्क्रीनिंग ठेवले जाणार आहे.यामध्ये मुंबई, पुणे, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद आणि बंगळुरू या शहरांचा समावेश आहे. 9 ऑक्टोबरपासून मुंबई आणि पुण्यातल्या प्रत्येकी 4 थिएटर्समध्ये हे स्पेशल स्क्रीनिंग सुरु होईल. त्यानंतर बाकीच्या शहरांमध्ये पण स्क्रीनिंग केले जाईल.

या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये हा चित्रपट मराठी आणि हिंदी अशा दोन भाषेत दाखवला जाणार आहे. निर्मात्यांनी सांगितलं की स्क्रीनिंग झाल्यावर हा चित्रपट फक्त भारतातच नाही तर परदेशात सुद्धा मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या सहा भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज होईल. पण थिएटरमध्ये तो कधी येणार याची अद्याप माहिती समोर आली नाही.

गोंधळची गोष्ट काय?

‘गोंधळ’ हे नाव ऐकलं की आपल्याला आपल्या गावाकडचा तो पारंपरिक विधी आठवतो. जिथे संगीत असतं, नाच असतो आणि देवीच्या गोष्टी सांगितल्या जातात. याच गोंधळ या परंपरेच्या भोवती या चित्रपटाची कथा फिरते. ही गोष्ट आहे एका नवविवाहित जोडप्याची. सुमन नावाची एक बाई आहे, जी तिच्या लग्नात खुश नाही. तिचा प्रियकर आहे सर्जेराव, ज्याला गोंधळ या विधीचं खूप वेड आहे.

मग सुमन त्याच्या याच वेडेपणाचा फायदा घेते आणि एका पवित्र परंपरेला एका धोकादायक खेळात बदलते. पुढे काय होतं, यातून काय गोंधळ उडतो, हाच या चित्रपटाचा थरार आहे. या चित्रपटात इशिता देशमुख, किशोर कदम आणि योगेश सोहनी यांच्या मुख्य भूमिका आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन दोन्ही संतोष डावखर यांनीच केलं आहे.

दिग्दर्शक काय म्हणाले?

या निवडीवर दिग्दर्शक संतोष डावखर खूप खुश आहे. तो म्हणाला, “हे स्पेशल स्क्रीनिंग म्हणजे फक्त चित्रपट लवकर दाखवणं नाहीये. तर ज्या लोकांना थिएटरमध्ये जाऊन चित्रपट पाहायला आवडतं, त्यांच्यासाठी हा एक खास अनुभव आहे.”तो पुढे म्हणाला, “गोंधळ ही कथा महाराष्ट्राच्या मातीशी, आपल्या संस्कृतीशी जोडलेली आहे. त्यातलं वातावरण, त्यातले आवाज हे मोठ्या पडद्यावरच अनुभवायला हवेत.

ऑस्करमध्ये भारताचं प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळाल्यावर हा चित्रपट लोकांसमोर आणणं हे माझ्यासाठी खूप खास आहे. लोकांनी कोणताही अंदाज न बांधता थिएटरमध्ये यावं आणि या सायकोलॉजिकल प्रवासाचा अनुभव घ्यावा.”खरंच, एका मराठी चित्रपटाने थेट ऑस्करपर्यंत धडक मारली आहे, ही काही छोटी गोष्ट नाही. आता सगळ्यांच्या नजरा या चित्रपटाकडे लागल्या आहेत.

Web Title: Gondhal marathi movie oscar entry six city screening october 9 rv

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • marathi movie
  • Marathi News
  • Oscar

संबंधित बातम्या

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले
1

World News :फ्लायदुबईच्या विमानात थरार; सहवैमानिकाने कुऱ्हाडीने कॅप्टनवर केला हल्ला, UAEने ‘दहशतवादी कृत्य’ म्हटले

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’
2

Breaking News :चीनशी पंगा अमेरिकेला महागात पडणार? नव्या रिपोर्टने वाढवली चिंता; ‘आधी देशांतर्गत प्रश्नांकडे पाहा’

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती
3

Nagpur News :नागपूरचे आकाश घेणार एअरोस्पेसची नवी झेप;महिंद्रा-एम्ब्रायरची शहराला पसंती

Chandrapur News: पावसाने पाठ फिरवली, उभी पिके वाळली;   गोंडपिपरीत दुष्काळाचे सावट, बळीराजाला आर्थिक मदतीची गरज
4

Chandrapur News: पावसाने पाठ फिरवली, उभी पिके वाळली; गोंडपिपरीत दुष्काळाचे सावट, बळीराजाला आर्थिक मदतीची गरज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.