Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

HM Cinema: दादरमधील ऐतिहासिक ‘हिंदमाता’चं झालं कायापालट; अंकुश चौधरीच्या हस्ते नव्या थिएटरचं दिमाखदार उद्घाटन

HM Cinema Dadar: दादरमधील ऐतिहासिक हिंदमाता चित्रपटगृहाचा कायापालट झाला असून ‘HM Cinema’चं अंकुश चौधरी यांच्या हस्ते दिमाखदार उद्घाटन करण्यात आलं. अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या या थिएटरमध्ये सिनेरसिकांना नवा अनुभव मिळणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 04, 2026 | 11:43 AM
(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

HM Cinema:  मुंबईतील दादर हे मराठी चित्रपटसृष्टी आणि सांस्कृतिक विश्वाचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. याच दादरमध्ये आता सिनेरसिकांसाठी मनोरंजनाचे एक नवे दालन खुले झाले आहे. दादर पूर्व येथील ऐतिहासिक हिंदमाता चित्रपटगृहाचे आधुनिक रूपांतर होऊन ‘HM Cinema’ या नव्या चित्रपटगृहाचे दिमाखदार उद्घाटन पार पडले. मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता अंकुश चौधरी यांच्या शुभहस्ते या चित्रपटगृहाचे लोकार्पण करण्यात आले. या सोहळ्याला चित्रपट क्षेत्रातील मान्यवर, माध्यम प्रतिनिधी आणि स्थानिक सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हिंदमाता चित्रपटगृहाचा आधुनिक कायापालट

दादर पूर्व येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील ऐतिहासिक हिंदमाता चित्रपटगृह काळानुसार ‘हिंदमाता गोल्ड’ या नावाने ओळखले जाऊ लागले. आता याच जागेवर कुमार फन शॉपच्या दुसऱ्या मजल्यावर ‘HM Cinema’ नव्या स्वरूपात सुरू करण्यात आले आहे. या चित्रपटगृहात प्रेक्षकांसाठी अत्याधुनिक ध्वनीप्रणाली, दर्जेदार डिजिटल स्क्रीन आणि आरामदायी आसनव्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सिनेरसिकांना मोठ्या पडद्यावर चित्रपट पाहण्याचा अधिक दर्जेदार अनुभव घेता येणार आहे.

‘दादर हे मुंबईच्या चित्रपटप्रेमाचे हृदयस्थान’

उद्घाटन सोहळ्यात बोलताना अभिनेता अंकुश चौधरी यांनी दादरच्या सांस्कृतिक आणि चित्रपटविषयक वारशाबद्दल आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, “दादर हे मुंबईच्या संस्कृतीचे आणि चित्रपटप्रेमाचे हृदयस्थान आहे. एकेकाळी ‘हिंदमाता’, नंतर ‘हिंदमाता गोल्ड’ आणि आता ‘HM Cinema’च्या आधुनिक रूपात प्रेक्षकांसाठी हे दर्जेदार थिएटर पुन्हा सज्ज झाले आहे, याचा मला मनस्वी आनंद आणि अभिमान वाटतो.”

आजच्या काळात प्रेक्षकांना चित्रपटगृहात उत्कृष्ट साऊंड, व्हिज्युअल्स आणि आरामदायी वातावरण अपेक्षित असते. HM Cinema प्रेक्षकांच्या या अपेक्षा पूर्ण करेल, असा विश्वासही अंकुश चौधरी यांनी व्यक्त केला. तसेच मराठीसह सर्व भाषांतील चित्रपटांना प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळावा, अशी सदिच्छाही त्यांनी दिली.


Rakhi-Mika Singh Kissing Controversy: ‘एकदा किस केलं म्हणजे..”,राखी सोबतच्या किसिंग वादावर मीका सिंहचं मोठं वक्तव्य, म्हणाला..

‘सर्वोत्तम चित्रपट अनुभव देणे हेच उद्दिष्ट’

HM Cinemaचे मालक संकेत पाटील यांनीही या नव्या उपक्रमाबद्दल आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “प्रेक्षकांना सर्वोत्तम चित्रपट अनुभव देणे हेच आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे. ‘हिंदमाता’पासून सुरू झालेला हा वारसा पुढे नेऊन, दादरसारख्या मध्यवर्ती आणि ऐतिहासिक भागात ‘HM Cinema’ सुरू करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटत आहे.”

चित्रपटगृहात आधुनिक तंत्रज्ञान, उत्तम स्क्रीन आणि आरामदायी बैठक व्यवस्थेवर विशेष भर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तसेच अंकुश चौधरी यांच्या हस्ते या नव्या प्रवासाची सुरुवात होणे ही आपल्यासाठी सन्मानाची बाब असल्याचेही संकेत पाटील यांनी नमूद केले. त्यांनी सर्व सिनेरसिकांना HM Cinemaमध्ये येऊन चित्रपटांचा आनंद घेण्याचे आवाहन केले.

Yami Gautam-Adinath Kothare: पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार यामी-आदिनाथ; अभिनेत्रीने सांगितला कामाचा अनुभव

दादरमधील सिनेरसिकांसाठी नवे आकर्षण

ऐतिहासिक हिंदमाता चित्रपटगृहाला आधुनिक स्वरूप देत सुरू झालेल्या HM Cinemaमुळे दादरमधील सिनेरसिकांना नव्या चित्रपटगृहाचा पर्याय उपलब्ध झाला आहे. अत्याधुनिक सुविधा आणि आरामदायी वातावरणाच्या माध्यमातून प्रेक्षकांना दर्जेदार सिनेमॅटिक अनुभव देण्याचा या चित्रपटगृहाचा प्रयत्न आहे. त्यामुळे दादरच्या चित्रपटप्रेमींसाठी HM Cinema हे नवे आकर्षण ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Web Title: Hm cinema dadar ankush chaudhari inauguration hindmata cinema ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 11:43 AM

Topics:  

  • Cinema Hall
  • dadar
  • entertainment

संबंधित बातम्या

3 Monkeys: अर्जुन रामपालच्या नव्या थ्रिलरची घोषणा; ‘ईठा’सोबत होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर, कधी होणार रिलीज?
1

3 Monkeys: अर्जुन रामपालच्या नव्या थ्रिलरची घोषणा; ‘ईठा’सोबत होणार बॉक्स ऑफिसवर टक्कर, कधी होणार रिलीज?

Yami Gautam-Adinath Kothare: पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार यामी-आदिनाथ; अभिनेत्रीने सांगितला कामाचा अनुभव
2

Yami Gautam-Adinath Kothare: पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार यामी-आदिनाथ; अभिनेत्रीने सांगितला कामाचा अनुभव

Rakhi-Mika Singh Kissing Controversy: ‘एकदा किस केलं म्हणजे..”,राखी सोबतच्या किसिंग वादावर मीका सिंहचं मोठं वक्तव्य, म्हणाला..
3

Rakhi-Mika Singh Kissing Controversy: ‘एकदा किस केलं म्हणजे..”,राखी सोबतच्या किसिंग वादावर मीका सिंहचं मोठं वक्तव्य, म्हणाला..

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठला
4

Drishyam 3 Box Office: अजय देवगणच्या ‘दृश्यम 3’ची बॉक्स ऑफिसवर घोडदौड; दुसऱ्याच दिवशी १०० कोटींचा टप्पा गाठला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.