(फोटो सौजन्य-सोशल मिडिया)
Rakhi-Mika Singh Kissing Controversy: बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. तिचे सोशल मीडियावरील व्हिडीओही अनेकदा व्हायरल होताना दिसतात. आता राखी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यावेळी कारण ठरलं आहे तिच्यासोबतचा जुना किसिंग वाद आणि त्यावर गायक मीका सिंह यांनी केलेलं वक्तव्य.
२००६ मध्ये मीका सिंहने राखी सावंतला तिच्या वाढदिवसाच्या पार्टीत किस केल्याचा प्रकार मोठ्या वादाचा विषय ठरला होता. या घटनेनंतर दोघांमध्ये बराच काळ वाद पाहायला मिळाला. आता एका पॉडकास्टदरम्यान मिकाला त्याच्या जुन्या वादांबाबत प्रश्न विचारण्यात आला.
यावर बोलताना मीका म्हणाला, “माझे वाद पुन्हा उद्भवत नाहीत. जर मी कोणाला एकदा किस केली, तर मी त्याला १० वेळा किस किस करणार नाही.” पुढे आपल्या वादांबाबत बोलताना त्याने, “एवढ्या वादांनंतरही मी नंबर १ आहे,” असंही म्हटलं.
राखी सावंतसोबतचा किसिंग वाद त्याने मुद्दाम निर्माण केला होता का, असा प्रश्न मिकाला विचारण्यात आला. यावर उत्तर देताना तो म्हणाला की, “त्यावेळी मी लहान होतो आणि मला अक्कल नव्हती.”
मिकाने पुढे सांगितलं की, वादांनंतरही त्याने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं आणि आजही तो यशस्वी आहे.
‘तो वाद राखीने सुरू केला होता’
राखी सावंतसोबतच्या वादाबाबत मिकाला विचारण्यात आलं असता त्याने दावा केला की, “तो वाद राखी सावंतने सुरू केला होता.” मात्र, आज दोघांमध्ये चांगली मैत्री असल्याचंही त्याने सांगितलं.
मीका म्हणाला की तो राखीशी रोज बोलतो आणि तो तिचा मोठा चाहता आहे. राखीबद्दल बोलताना त्याने तिच्या लोकप्रियतेचंही कौतुक केलं.
‘तिच्याकडे दुर्लक्ष करणं शक्य नाही’
मिकाने राखीचं कौतुक करताना सांगितलं की, आज एखादी व्यक्ती बिग बॉस जिंकली तरी पुढच्या वर्षी लोक तिला विसरू शकतात. मात्र, राखी सावंत अशी व्यक्ती आहे जिला संपूर्ण भारत ओळखतो.
“तुम्ही तिचा द्वेष करू शकता, तिच्यावर प्रेम करू शकता; पण तुम्ही तिच्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही,” असं मीका म्हणाला.
राखीनेही अनेकदा आपल्यामुळे मिकाला फायदा झाल्याचं सांगितल्याचं त्याने नमूद केलं. मात्र, मिकाच्या मते राखीला मिळालेलं यश हे तिच्या स्वतःच्या गुणांमुळे आहे. कॅमेरा सुरू होताच ती सगळ्यांचं लक्ष वेधून घेते, असंही त्याने सांगितलं.
याच मुलाखतीत मिकाने कॉमेडियन समय रैनाचाही उल्लेख केला. त्याने सांगितलं की, समयला त्याने मेसेज करून त्याला कॉमेडियनचं काम किंवा शो फारसे आवडत नसल्याचं सांगितलं होतं. मात्र, समय गिटार खूप छान वाजवतो, असं मिकाने म्हटलं.
यानंतर समय रैनाने मिकाला व्हिडीओ कॉल केला आणि त्याच्यासाठी गिटार वाजवली. या किस्स्याचाही मिकाने मुलाखतीदरम्यान खुलासा केला.






