
फोटो सौजन्य - Social Media
सगळ्यात महत्वाचं, जयवंत वाडकरांच्या लेकीने लग्न दाक्षिणात्य पद्धतीने करण्यामागचे कारण म्हणजे स्वामिनीचा पती वरून नायर मूळचा केरळम राज्यातील आहे. मूळचा, मल्याळी भाषी असल्याने लग्न दाक्षिणात्य पद्धतीने करण्यात आले आहे. या लग्नसोहळ्यात स्वामीनीने केलेला लुक, संपूर्ण लग्नसोहळ्यात मुख्य आकर्षण आहे. भरजरी साडी, दाक्षिणात्य दागिने आणि संपूर्ण लुक अगदी मनमोहक आणि खिळून दिसत आहे.
स्वामिनीच्या विवाहसोहळ्यामध्ये काही मराठी कलाकार दिसून आले होते. बेर्डे कुंटुंबीयांनी या लग्नसोहळ्याला हजेरी लावली होती. या सोहळ्यात अभिनेता अभिनय बेर्डे, स्वानंदी बेर्डे तसेच अभिनेत्री प्रिया बेर्डे दिसून आल्या होत्या. तसेच जेष्ठ अभिनेते विजय पाटकरांचे चिरंजीव शार्दूल पाटकरही या सोहळ्यात उपस्थित होता. स्वामिनीची खास मैत्रीण स्वानंदी बेर्डेने प्रतिकिया दिली आहे. ती म्हणते की, “मी तिच्यासाठी फार आनंदित आहे. तिचं लग्न म्हणजे माझ्या मनात इतकी धडधड होती; पण अखेर आज तिचं लग्न होतंय आणि माझं मन येथे भरून आलंय.”
स्वामिनी Associate casting head तसेच talent manager म्हणून काम पाहते तर वरून नायर एका निर्माती संस्थेचा मालक आहे. स्वामिनी तिच्या ग्लॅमर्स फोटोसाठी नेहमी चर्चेत असते.