Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट पडद्यावर, पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ची घोषणा

Jodi Marathi Movie: महाराष्ट्रातील शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते, कष्ट आणि मातीशी असलेली नाळ यांना केंद्रस्थानी ठेवत ‘जोडी’ या नव्या मराठी चित्रपटाची पोळ्याच्या मुहूर्तावर घोषणा करण्यात आली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 10, 2026 | 05:03 PM
Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jodi Marathi Movie: शेतकरी आणि बैलजोडीच्या नात्याची हृदयस्पर्शी गोष्ट (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • पोळ्याच्या मुहूर्तावर ‘जोडी’ या नव्या मराठी चित्रपटाची घोषणा.
  • शेतकरी आणि बैलजोडीच्या भावनिक नात्यावर चित्रपटाची कथा आधारित.
  • पोस्टरमधून पारंपरिक शेती आणि आधुनिक शेतीतील बदलाची झलक.
 

शेतकऱ्याच्या जीवनात बैलांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शेतीच्या कामात शेतकऱ्याचा खांद्याला खांदा लावून साथ देणाऱ्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या दिवशी बैलांना आंघोळ घालून, सजवून त्यांची पूजा केली जाते. Jodi Marathi Movie:

शेतकरी आणि बैलाची गोष्ट सांगणारी कथा

शेतकरी आणि बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते, कष्ट आणि मातीशी असलेली नाळ या परंपरेतून अधोरेखित होते. याच भावनिक नात्याला केंद्रस्थानी ठेवत पोळ्याचा मुहूर्त साधून एका नव्या मराठी चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. ‘काळाने कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं!’ या आशयाच्या टॅगलाइनसह ‘जोडी’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

पोस्टरमध्ये नेमकं काय दिसतयं?

फायनल ड्राफ्ट फिल्म प्रॉडक्शन आणि फेबलफॉक्स मीडिया प्रॉडक्शन यांच्या निर्मितीचा ‘जोडी’ हा चित्रपट ज्ञानेश्वर शांताराम जाधव यांनी लिहिला असून तेच या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या घोषणेसोबत प्रदर्शित करण्यात आलेल्या पोस्टरने या कलाकृतीची उत्सुकता वाढवली आहे. पोस्टरमध्ये हिरवाईने नटलेल्या शेतातून बैलजोडी नांगर ओढत पुढे जाताना दिसते. त्याच दृश्याच्या पार्श्वभूमीवर आकाश, शेतजमीन आणि आधुनिक शेतीचे प्रतीक असलेले ट्रॅक्टर दिसत असल्याने बदलत्या काळाची झलकही पोस्टरमधून पाहायला मिळते.

Baahubali: ‘बाहुबली’ युनिव्हर्सचा ग्लोबल विस्तार; ड्रीम थिएटरसोबत मोठी पार्टनरशिप

‘ही’ ओळ ठळकपणे झळकते

पोस्टरवर ‘काळाने कितीही घाव घातले तरी हे नातं तुटत नसतं!’ ही ओळ ठळकपणे झळकते. त्यामुळे बदलत्या शेतीपद्धती आणि तंत्रज्ञानाच्या काळातही शेतकरी आणि बैलजोडी यांच्यातील भावनिक नातं अबाधित राहणार असल्याचा आशय यातून सूचित होतो. चित्रपटातून बैलजोडी आणि त्यांच्या मालकाच्या नात्याचा वेगळा, भावस्पर्शी पैलू उलगडण्यात येणार आहे.

Bigg Boss 20: अवघ्या ३ दिवसांत या स्पर्धकाने जिंकलं प्रेक्षकांचं मन; सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस!

चित्रपटाची संकल्पना असल्याचे पोस्टरवरून जाणवते

‘एक नातं… एक परंपरा… आणि त्यामागची मनाला भिडणारी गोष्ट’ अशी या चित्रपटाची संकल्पना असल्याचे पोस्टरवरून जाणवते. ऑगस्ट २०२७मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचेही पोस्टरवर नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे ग्रामीण जीवन, शेती आणि माणूस-बैल यांच्यातील जिव्हाळ्याचे नाते मोठ्या पडद्यावर कसे रंगते, याची उत्सुकता आता निर्माण झाली आहे.

Web Title: Jodi marathi film farmer bullock bond

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2026 | 05:03 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi movie
  • Marathi News
  • marathi newss
  • NAVARASHTRA

संबंधित बातम्या

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
1

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे
2

‘तुम्हीच आरोपींना फरार होण्याची संधी दिली’;रुग्णालयातील मारहाण प्रकरणी हायकोर्ट संतप्त, पोलिसांच्या दिरंगाईवर हायकोर्टाचे ताशेरे

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत
3

Ganeshotsav 2026: गणेशोत्सवात AIची एंट्री! आमंत्रण पत्रिकेपासून सजावटीपर्यंत ‘बाप्पाच्या स्वागतासाठी’ AI करणार मदत

MUMBAI : आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; राज्यस्तरीय वनहक्क मोहीम राबविणार, बावनकुळेंची मोठी घोषणा
4

MUMBAI : आदिवासी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा; राज्यस्तरीय वनहक्क मोहीम राबविणार, बावनकुळेंची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.