Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर काळाच्या पडद्याआड, वयाच्या ७३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Madhu Kambikar Death: ज्येष्ठ मराठी अभिनेत्री मधु कांबीकर यांचं वयाच्या ७३व्या वर्षी पुण्यात निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 12, 2026 | 10:53 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Madhu Kambikar Death:  मनोरंजनविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने आणि लावणीच्या ठसकेबाज सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनावर छाप उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ७३व्या वर्षी त्यांनी पुण्यात अखेरचा श्वास घेतला. दीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

गेल्या काही वर्षांपासून ज्येष्ठ अभिनेत्री मधु कांबीकर अंथरुणाला खिळून होत्या. रंगमंचावर लावणी सादर करत असताना त्यांची प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना पक्षाघाताचा झटका आल्याची माहिती समोर आली होती. आपल्या अभिनयाने आणि लावणीच्या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या मधु कांबीकर यांच्या निधनाने मराठी कलाविश्वाची मोठी हानी झाली आहे.

तमाशाच्या फडातून सुरू झाला कलाप्रवास

मधु कांबीकर यांचा जन्म २८ जुलै १९५३ रोजी बीड जिल्ह्यातील माळेगाव खुर्द येथे झाला. तमाशाच्या फडातून त्यांच्या कलाप्रवासाला सुरुवात झाली. कथ्थक नृत्याचे प्रशिक्षण घेतल्यानंतर १९७३ मध्ये मुंबईतील लालबाग येथील न्यू हनुमान थिएटरमधून त्यांनी आपल्या कलेचा प्रवास पुढे नेला. लावणी, लोकनाट्य, नाटक आणि चित्रपट अशा विविध माध्यमांतून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली. ग्रामीण महाराष्ट्रातील लोककलेला व्यापक ओळख मिळवून देण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान राहिले.

Kapus Konda Movie Trailer: ‘फॅमिलीत कोण राहणार? कोण जाणार?’ सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’चा ट्रेलर पाहिलात का?

मराठी चित्रपटांतील भूमिका ठरल्या लक्षवेधी

मधु कांबीकर यांनी मराठी चित्रपटसृष्टीत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या. ‘सतीची पुण्याई’, ‘शापित’, ‘हेच माझं माहेर’, ‘ह्योच नवरा पाह्यजे’, ‘झपाटलेला’, ‘एक होता विदूषक’ आणि ‘रावसाहेब’ यांसारख्या चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका विशेष उल्लेखनीय ठरल्या. मराठी चित्रपटांसोबतच त्यांनी हिंदी चित्रपटांतही काम केले. चित्रपटांबरोबरच लोकनाट्य आणि रंगभूमीवरही त्या सक्रिय होत्या.

‘महाराष्ट्राची लोकधारा’मधून दिल्लीपर्यंत पोहोचली कला

१९७७ मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ या कलापथकाच्या माध्यमातून त्यांनी दिल्ली येथे नृत्यनाट्य सादर केले. लावणीतील सहजता, प्रभावी अभिनय आणि हावभावांमुळे मधु कांबीकर यांना महाराष्ट्रभर ओळख मिळाली. लोककलेशी असलेली त्यांची नाळ आणि रंगभूमीवरील योगदान यामुळे त्यांनी मराठी मनोरंजनविश्वात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्या निधनाने मराठी चित्रपटसृष्टीने एक ज्येष्ठ अभिनेत्री, तर लोककलेच्या क्षेत्राने एक महत्त्वाची कलावंत गमावली आहे.

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Web Title: Madhu kambikar death actress passes away age 73 ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 10:47 AM

Topics:  

  • Death
  • entertainment
  • marathi actress

संबंधित बातम्या

Kapus Konda Movie Trailer: ‘फॅमिलीत कोण राहणार? कोण जाणार?’ सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’चा ट्रेलर पाहिलात का?
1

Kapus Konda Movie Trailer: ‘फॅमिलीत कोण राहणार? कोण जाणार?’ सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’चा ट्रेलर पाहिलात का?

The Dirty Picture: १५ वर्षांनंतर ‘द डर्टी पिक्चर’चा सीक्वेल येणार! एकता कपूरने केली घोषणा, कथेबाबतही दिली हिंट
2

The Dirty Picture: १५ वर्षांनंतर ‘द डर्टी पिक्चर’चा सीक्वेल येणार! एकता कपूरने केली घोषणा, कथेबाबतही दिली हिंट

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
3

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप
4

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.