Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

The Dirty Picture: १५ वर्षांनंतर ‘द डर्टी पिक्चर’चा सीक्वेल येणार! एकता कपूरने केली घोषणा, कथेबाबतही दिली हिंट

The Dirty Picture: ‘द डर्टी पिक्चर २’वर काम सुरू असल्याची एकता कपूरने दिली माहिती. सिक्वेलची कथा कोणत्या स्त्रीवर आधारित असेल आणि विद्या बालन पुन्हा दिसणार का? जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 12, 2026 | 09:28 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

The Dirty Picture:  बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा गाजलेला चित्रपट ‘द डर्टी पिक्चर’ पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. २०११ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. या चित्रपटात विद्या बालनने १९८० च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री सिल्क स्मिताची भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी विद्याचे विशेष कौतुक झाले होते. आता तब्बल १५ वर्षांनंतर या चित्रपटाच्या सिक्वेलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. निर्माती एकता कपूरने ‘द डर्टी पिक्चर २’वर काम सुरू असल्याचे सांगितले आहे.

एकता कपूरने केली ‘द डर्टी पिक्चर २’ची घोषणा

एकता कपूरने रणवीर अलाहाबादियाच्या पॉडकास्टवरील संभाषणादरम्यान या आगामी चित्रपटाबाबत माहिती दिली. सध्या ती काही मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करत असून, त्यापैकी ‘द डर्टी पिक्चर २’ हा एक महत्त्वाचा चित्रपट असल्याचे तिने सांगितले. या चित्रपटाची पटकथा तिच्याकडे आली असून, १५ वर्षांनंतर ही कथा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याची तिची तयारी सुरू आहे.

याबाबत बोलताना एकता कपूर म्हणाली की, ती एका मोठ्या चित्रपटावर काम करत आहे. ‘द डर्टी पिक्चर २’ची योजना आखत असून, यावेळी तिच्याकडे सांगण्यासारखी एक खास कथा आहे. त्यामुळे या सिक्वेलमध्ये नेमके काय पाहायला मिळणार, याबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

यावेळी कोणत्या स्त्रीची कथा उलगडणार?

‘द डर्टी पिक्चर’ हा चित्रपट अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यापासून प्रेरित होता. चित्रपटात एका महिलेचा प्रवास, तिची लैंगिकता आणि समाजाकडून तिला मिळणारी वागणूक यांसारखे विषय मांडण्यात आले होते. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि विद्या बालनच्या अभिनयाचेही मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.

चित्रपटाच्या सिक्वेलबद्दल बोलताना एकता कपूरने यावेळीही एका स्त्रीची कथा सांगितली जाणार असल्याचे संकेत दिले. मात्र, ही कथा नेमकी कोणाच्या आयुष्यावर आधारित असेल, याचा खुलासा तिने केलेला नाही. त्यामुळे ‘द डर्टी पिक्चर २’मध्ये कोणत्या महिलेचा प्रवास पाहायला मिळणार, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.

विद्या बालन पुन्हा मुख्य भूमिकेत दिसणार?

‘द डर्टी पिक्चर २’ची घोषणा झाल्यानंतर चित्रपटातील मुख्य अभिनेत्री कोण असेल, हा प्रश्नही उपस्थित होत आहे. पहिल्या भागात विद्या बालनने सिल्क स्मिताची भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकली होती. मात्र, सिक्वेलमध्ये विद्या बालन पुन्हा दिसणार की नव्या अभिनेत्रीची निवड केली जाणार, याबाबत एकता कपूरने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही.

चित्रपटाची अधिकृत कास्ट, कथानक आणि प्रदर्शनाची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे ‘द डर्टी पिक्चर २’बाबतच्या पुढील अपडेट्सकडे आता चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

Web Title: The dirty picture 2 ektaa kapoor sequel announcement ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • ekta kapoor
  • entertainment
  • Vidya Balan

संबंधित बातम्या

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
1

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप
2

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित
3

New Marathi Song: महाराष्ट्राच्या मातीतून मेक्सिकोपर्यंत! स्वॅगर बॉय आणि फ्रीबोटचं ‘नाच ना’ गाणं प्रदर्शित

Kiara Advani: प्रेग्नंट कियारा आडवाणीचा बीच हॉलिडे; सिद्धार्थ आणि लेक सरायासोबत घालवतेय निवांत वेळ
4

Kiara Advani: प्रेग्नंट कियारा आडवाणीचा बीच हॉलिडे; सिद्धार्थ आणि लेक सरायासोबत घालवतेय निवांत वेळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.