Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kapus Konda Movie Trailer: ‘फॅमिलीत कोण राहणार? कोण जाणार?’ सचिन पिळगावकरांच्या ‘कापूसकोंडा’चा ट्रेलर पाहिलात का?

Kapus Konda Movie Trailer: सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले यांच्या ‘कापूसकोंडा’ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. सत्यघटनेवर प्रेरित हा चित्रपट २३ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 12, 2026 | 10:00 AM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘कापूसकोंडा’चा ट्रेलर प्रदर्शित; कथेबद्दल उत्सुकता वाढली
  • सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले यांची प्रमुख भूमिका
  • लातूर जिल्ह्यातील अंधोरी गावात झाले चित्रीकरण
Kapus Konda Movie Trailer:  मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सचिन पिळगावकर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाले आहेत. त्यांच्या आगामी ‘कापूसकोंडा’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. सत्यघटनेवरून प्रेरित असलेल्या या चित्रपटात एका निवृत्त कर्मचाऱ्याची आणि त्याला भेट मिळालेल्या कुत्र्याची अनोखी गोष्ट पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे, कुत्र्याला घाबरणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात हा नवा सदस्य आल्यावर काय घडामोडी घडतात, याची उत्सुकता ट्रेलरमुळे वाढली आहे. हा चित्रपट येत्या २३ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘कापूसकोंडा’चा ट्रेलर प्रदर्शित; कथेबद्दल उत्सुकता वाढली

काही दिवसांपूर्वी ‘कापूसकोंडा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. ‘अ फॅमिली डॉग फिल्म’ अशी टॅगलाइन असलेल्या या चित्रपटात कौटुंबिक नातेसंबंध, मानवी भावना आणि एका कुत्र्यामुळे घडणाऱ्या अनपेक्षित घटनांची गुंफण पाहायला मिळणार आहे.

एका निवृत्त कर्मचाऱ्याला भेट म्हणून कुत्रा मिळतो आणि त्यानंतर त्याच्या आयुष्यात अनेक घडामोडी घडू लागतात. या नव्या सदस्यामुळे कुटुंबात कोणते बदल होतात, नात्यांमध्ये कोणती वळणे येतात आणि नेमके कोणते कारस्थान घडते, हे चित्रपटातून उलगडणार आहे. ‘फॅमिलीत कोण राहणार? कोण जाणार?’ असा प्रश्न उपस्थित करत ट्रेलरने चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढवली आहे.

सचिन पिळगावकर आणि मधुराणी गोखले यांची प्रमुख भूमिका

‘कापूसकोंडा’मध्ये सचिन पिळगावकर आणि अभिनेत्री मधुराणी गोखले यांच्यासह नव्या पिढीतील अभिनेत्री अक्षता पाडगांवकर, जान्हवी तांबट आणि अभिनेता भूषण पाटील यांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. अनुभवी कलाकार आणि नव्या चेहऱ्यांचा संगम या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.

चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन सचिन मोहिते यांनी केले आहे. सचिन मोहिते, गणेश पंडित आणि ऋषिकेश तुरई यांनी पटकथा व संवादलेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. सचिन पाटेकर यांनी छायांकन केले असून, संगीतकार ए. व्ही. प्रफुल्लचंद्र यांनी चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली आहेत. पार्श्वसंगीत अभिजीत हेगडेपाटील यांचे आहे. गायक अवधूत गुप्ते आणि पद्मनाभ गायकवाड यांनी गाण्यांना आपला आवाज दिला आहे, तर सुहास राणे यांनी ध्वनी तंत्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.

 

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

लातूर जिल्ह्यातील अंधोरी गावात झाले चित्रीकरण

‘कापूसकोंडा’ या चित्रपटाची निर्मिती जास्वंद एंटरटेन्मेंट्स प्रा. लि. यांनी केली आहे. पॅनोरामा स्टुडिओज प्रस्तुत हा चित्रपट व्हीपी माऊली ग्रुप ऑफ कंपनीज आणि स्टोरीवाला फिल्म यांच्या सहकार्याने सादर करण्यात येत आहे. कथानकाची गरज लक्षात घेऊन चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण लातूर जिल्ह्यातील अंधोरी या गावात करण्यात आले आहे.

सत्यघटनेवरून प्रेरित असलेली कथा, कौटुंबिक नात्यांची गुंतागुंत आणि एका कुत्र्याभोवती फिरणाऱ्या अनोख्या घटनांमुळे ‘कापूसकोंडा’ चित्रपटाबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. आता या चित्रपटातून प्रेक्षकांना मनोरंजनासोबत भावनिक अनुभवही मिळणार का, हे २३ ऑक्टोबरला स्पष्ट होईल.

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

Web Title: Kapus konda movie trailer released sachin pilgaonkar ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 12, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • entertainment
  • marathi movie
  • Sachin Pilgoankar

संबंधित बातम्या

The Dirty Picture: १५ वर्षांनंतर ‘द डर्टी पिक्चर’चा सीक्वेल येणार! एकता कपूरने केली घोषणा, कथेबाबतही दिली हिंट
1

The Dirty Picture: १५ वर्षांनंतर ‘द डर्टी पिक्चर’चा सीक्वेल येणार! एकता कपूरने केली घोषणा, कथेबाबतही दिली हिंट

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
2

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप
3

Aai Tuljabhavani Serial: टेलिव्हिजन विश्वात तंत्रज्ञानाचा नवा आविष्कार; ‘आई तुळजाभवानी’ मालिकेत AI-VFX मधून साकारलं देवीचं रूप

Megha Dhade Daughter New Movie: मेघा धाडेच्या लेकीची मनोरंजनविश्वात एन्ट्री! थेट गणेश आचार्य यांच्या बायोपिकमध्ये मिळाली संधी
4

Megha Dhade Daughter New Movie: मेघा धाडेच्या लेकीची मनोरंजनविश्वात एन्ट्री! थेट गणेश आचार्य यांच्या बायोपिकमध्ये मिळाली संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.