Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 28 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maitreya Movie: मैत्रीचं प्रेमात रूपांतर! ‘मैत्रेया’मधील ‘तुला पाहते’ हे रोमँटिक गाणं रिलीज

Maitreya movie: क्रांती रेडकर वानखेडे यांच्या ‘मैत्रेया’ चित्रपटातील ‘तुला पाहते’ हे रोमँटिक गाणं रिलीज झालं आहे. पंकज पडघण यांचं संगीत, सायली पंकज आणि शिवम सिंह यांचा आवाज लाभलेला हा चित्रपट २० नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 28, 2026 | 01:50 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Maitreya Movie: मैत्रीच्या नात्यात प्रेमाची चाहूल कधी लागते, हे अनेकदा कळतही नाही. एकमेकांकडे पाहताना रेंगाळणारी नजर, नकळत निर्माण होणारी ओढ आणि शब्दांविना व्यक्त होणाऱ्या भावना… प्रेमाच्या याच हळुवार क्षणांचं सुंदर चित्रण आगामी मराठी चित्रपट ‘मैत्रेया’मधील ‘तुला पाहते’ या नव्या गाण्यातून पाहायला मिळत आहे. हे रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, मैत्रीचं प्रेमात रूपांतर होण्याचा नाजूक प्रवास यातून उलगडतो.

नजरेतून व्यक्त होणाऱ्या प्रेमभावना

कधी सहज होणारी नजरानजर, कधी एकमेकांकडे पाहून खुलणारं हसू, तर कधी मनातल्या भावना न बोलताच व्यक्त करणारी नजर… अशा छोट्या छोट्या क्षणांतून प्रेम फुलत असल्याचा अनुभव ‘तुला पाहते’ या गाण्यातून येतो. कलाकारांमधील सहज केमिस्ट्री आणि हळूहळू खुलत जाणाऱ्या नात्याचे भाव यामुळे गाणं लक्षवेधी ठरतं.

या गाण्याला संगीतकार पंकज पडघण यांनी संगीत दिलं असून, सायली पंकज आणि शिवम सिंह यांनी ते गायलं आहे. गीतकार गुरू ठाकूर यांच्या शब्दांतून प्रेमाच्या नाजूक भावना व्यक्त होतात. संगीत, शब्द आणि सुरांचा सुरेख मेळ या गाण्यात अनुभवायला मिळतो.

क्रांती रेडकर म्हणतात, “मैत्री आणि प्रेम यांच्यात सुंदर सीमारेषा असते”

चित्रपटाच्या लेखिका-दिग्दर्शिका क्रांती रेडकर वानखेडे यांनी गाण्यामागील भावना स्पष्ट केल्या. त्या म्हणाल्या की, मैत्रीचं नातं कधी प्रेमाच्या दिशेने वाटचाल करू लागतं, हे अनेकदा आपल्याला कळतही नाही. एकमेकांकडे पाहण्याची बदललेली नजर, छोट्या छोट्या गोष्टींतून व्यक्त होणाऱ्या भावना आणि नकळत निर्माण होणारी ओढ यातून प्रेम फुलत जातं.

‘तुला पाहते’ या गाण्यातून प्रेमाची हीच हळुवार सुरुवात मांडण्याचा प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं. या गाण्यातील भावना प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील अशाच सुंदर क्षणांची आठवण करून देतील, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.

Vibhavari Pradhan: मराठी चित्रपटांत काम करण्याची इच्छा, पण संधीच मिळाली नाही! अभिनेत्री विभावरी प्रधान यांनी व्यक्त केली खंत

पंकज पडघण यांचं संगीत गाण्याचं खास वैशिष्ट्य

संगीतकार पंकज पडघण यांच्या मते, प्रेम व्यक्त करण्यासाठी नेहमी मोठ्या शब्दांची किंवा भव्य प्रसंगांची गरज नसते. एखादी नजर, निरागस हास्य किंवा एकमेकांच्या सहवासात घालवलेला क्षणही मनातील भावना व्यक्त करू शकतो. ‘तुला पाहते’ या गाण्यातून अशाच न बोलता व्यक्त होणाऱ्या भावनांना संगीताच्या माध्यमातून उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

चित्रपटाचे निर्माते मनोज खळतकर यांनीही ‘तुला पाहते’ हे गाणं मैत्रीच्या पलीकडे जाऊन नव्या नात्याची चाहूल देणारं असल्याचं सांगितलं. ‘मैत्रेया’मध्ये तरुणाईच्या आयुष्यातील नात्यांचे विविध रंग पाहायला मिळतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

२० नोव्हेंबरला चित्रपटगृहांत येणार ‘मैत्रेया’

समर टाईम्स प्रॉडक्शनची निर्मिती असलेल्या ‘मैत्रेया’ या चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन क्रांती रेडकर वानखेडे यांनी केलं आहे. मनोज खळतकर हे चित्रपटाचे निर्माते, तर अमन खळतकर सहनिर्माते आहेत. चित्रपटात समर, आयुषी, स्काय आणि रुची यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

मैत्री, प्रेम आणि तरुणाईच्या आयुष्यात फुलणाऱ्या नात्यांची गोष्ट सांगणारा ‘मैत्रेया’ २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे प्रेमाच्या हळुवार भावनांनी सजलेल्या या चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Navika Kotia: ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम नविका कोटियाचा लग्नाच्या काही दिवस आधीच मोडला साखरपुडा, मुलाने केली फसवणूक?

Web Title: Maitreya movie tula pahate romantic song released ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • entertainment
  • Kranti Redkar Wankhede
  • marathi movie

संबंधित बातम्या

Natak Controversy: ‘एक शब्द राहिला तो म्हणजे…’; ‘आमनेसामने’ नाटकाच्या मानधनाच्या वादावर मंगेश कदम-लीना भागवत यांचं स्पष्टीकरण
1

Natak Controversy: ‘एक शब्द राहिला तो म्हणजे…’; ‘आमनेसामने’ नाटकाच्या मानधनाच्या वादावर मंगेश कदम-लीना भागवत यांचं स्पष्टीकरण

Vibhavari Pradhan: मराठी चित्रपटांत काम करण्याची इच्छा, पण संधीच मिळाली नाही! अभिनेत्री विभावरी प्रधान यांनी व्यक्त केली खंत
2

Vibhavari Pradhan: मराठी चित्रपटांत काम करण्याची इच्छा, पण संधीच मिळाली नाही! अभिनेत्री विभावरी प्रधान यांनी व्यक्त केली खंत

Navika Kotia: ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम नविका कोटियाचा लग्नाच्या काही दिवस आधीच मोडला साखरपुडा, मुलाने केली फसवणूक?
3

Navika Kotia: ‘इंग्लिश विंग्लिश’ फेम नविका कोटियाचा लग्नाच्या काही दिवस आधीच मोडला साखरपुडा, मुलाने केली फसवणूक?

Ramayana : भारतीय संस्कृतीचा जागतिक डंका! ‘रामायणम्’च्या भव्य विश्वाची नमित मल्होत्रांनी शेअर केली झलक
4

Ramayana : भारतीय संस्कृतीचा जागतिक डंका! ‘रामायणम्’च्या भव्य विश्वाची नमित मल्होत्रांनी शेअर केली झलक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.