Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Manjar Movie : तीन मित्र, घरभर पसारा अन्…, मित्रांच्या निवांत आयुष्यात येणार भन्नाट ट्विस्ट; पोस्टर रिलीज

Manjar Movie: सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने आणि भाग्यश्री लिमये यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘मांजर’ चित्रपटाचं पोस्टर रिलीज झालं आहे. हा चित्रपट कधी रिलीज होणार जाणून घ्या.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 13, 2026 | 02:05 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Manjar Movie: मराठी सिनेसृष्टीत आणखी एका भन्नाट कॉमेडी चित्रपटाची उत्सुकता वाढली आहे. ‘मांजर’ या आगामी मराठी चित्रपटाचं पोस्टर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीला आलं असून, पोस्टरमधील गोंधळाने चित्रपटाबद्दलचं कुतूहल आणखी वाढवलं आहे. तीन मित्र, घरभर पसरलेला पसारा आणि त्यांचं बेफिकीर जगणं अशी या पोस्टरची झलक आहे. मात्र, या सगळ्या गोंधळाचा आणि ‘मांजर’ या नावाचा नेमका संबंध काय, याचं उत्तर अद्याप गुलदस्त्यात आहे.

तीन मित्र आणि घरभर गोंधळ

पोस्टरमध्ये घरातील अस्ताव्यस्त पसारा लक्ष वेधून घेतो. कपडे, मोबाईल, लॅपटॉप, इअरफोन्स, बॅग्ज आणि रोजच्या वापराच्या वस्तूंमध्ये तीन मित्र अगदी बिनधास्तपणे वेळ घालवताना दिसत आहेत. या दृश्यातून त्यांच्या मोकळ्या-ढाकळ्या आयुष्याची झलक मिळते.

मात्र, या निवांत विश्वात ‘मांजर’मुळे नेमका कोणता गोंधळ निर्माण होतो, हा प्रश्न पोस्टरमुळे अधिकच रंजक झाला आहे. पोस्टरमधील प्रत्येक गोष्टीमागे एखादा मजेशीर किस्सा दडलेला असावा, असा अंदाज बांधला जात आहे.

The Traitors Season 2: आजपासून सुरू होणार ‘द ट्रेटर्स २’; कुठे आणि कधी पाहता येणार? जाणून घ्या स्पर्धकांची संपूर्ण यादी

सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजनेसह दमदार कलाकार

एचथ्रीओ मोशन पिक्चर्स आणि जस्ट राईट फिल्म्स निर्मित या चित्रपटाचं दिग्दर्शन सुशील महादेव यांनी केलं आहे. चित्रपटात सिद्धार्थ मेनन, ओंकार भोजने, तेजस राऊत आणि भाग्यश्री लिमये यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

पोस्टरमध्ये या कलाकारांची धमाल केमिस्ट्री पाहायला मिळत असून, त्यांच्यातील मैत्री आणि त्यातून निर्माण होणारा गोंधळ चित्रपटाचा महत्त्वाचा भाग असणार असल्याचं दिसत आहे.

‘मांजर’ या नावामागचं रहस्य काय?

चित्रपटाचं शीर्षकच सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरत आहे. ‘मांजर’ हे या तीन मित्रांच्या आयुष्यात नेमकं कशासाठी महत्त्वाचं आहे? त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यात कोणत्या मजेशीर घटना घडतात? या प्रश्नांची उत्तरं चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतरच मिळणार आहेत.

दिग्दर्शक सुशील महादेव यांनी सांगितलं की, ‘मांजर’मध्ये तीन मित्रांचं मोकळंढाकळं विश्व आणि त्यातून निर्माण होणाऱ्या भन्नाट परिस्थिती पाहायला मिळणार आहेत. मांजर त्यांच्या जगाचा आधीपासूनच एक भाग आहे; मात्र त्याच्याभोवती घडणाऱ्या घटनांमुळे त्यांच्या आयुष्यात मजेशीर परिस्थिती निर्माण होते.

पात्रांची केमिस्ट्री, कॉमेडी आणि या सगळ्या गोंधळामागचं कारण प्रेक्षकांचं मनोरंजन करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मांजराचं कथेत नेमकं स्थान काय आहे, हे मात्र सध्या निर्मात्यांनी गुपित ठेवलं आहे.

Mamachya Govyala Jauya: ७ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘मामाच्या गोव्याला जाऊया’ बॉक्स ऑफिसवर हिट, टॉप १० मध्ये मिळवले स्थान

‘मांजर’ कधी होणार प्रदर्शित?

हर्ष, अविनाश शर्मा, हरि राजपूत, बंटी नागी आणि जसबीर नागी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सयाजी शिंदे, अंशुमन विचारे, वैष्णवी अंधाडे आणि अश्विनी काळसेकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.

चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी एए फिल्म्सकडे आहे. ‘मांजर’ हा चित्रपट १८ सप्टेंबर २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तीन मित्रांच्या आयुष्यात नेमका कोणता गोंधळ होतो आणि या सगळ्यामागे मांजराचा काय संबंध आहे, हे पाहण्यासाठी प्रेक्षकांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे.

Web Title: Manjar movie poster released to hit theatres on september 18

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 13, 2026 | 02:04 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actor
  • marathi movie

संबंधित बातम्या

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
1

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी
2

Gondhal Marathi Movie: ‘गोंधळ’ची ऑस्करवारी सुरू! मुख्यमंत्र्यांची भेट घेत टीमने केली ‘ही’ खास मागणी

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
3

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म
4

Jubin Nautiyal: सिंगर जुबिन नौटियाल झाला बाबा; पत्नी निकिताने दिला गोंडस मुलाला जन्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.