Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास! १० वर्षांनी मोडला ‘सैराट’चा विक्रम, ‘Raja Shivaji’ ठरला १०० कोटी कमावणारा दुसरा मराठी सिनेमा

Raja Shivaji Box office collection: चित्रपटाच्या या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठीही हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे. आगामी दिवसांत ‘राजा शिवाजी’ आणखी किती विक्रम मोडतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: May 19, 2026 | 08:38 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी सिनेसृष्टीत सध्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. 1 मे 2026 ला राजा शिवाजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने प्रदर्शित झाल्यापासून अनेक रेकॉर्ड मोडले आहेत. प्रदर्शित होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला असून, पहिल्याच दिवशी तब्बल साडे ११ कोटींची कमाई करत मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वात मोठी ओपनिंग देणारा सिनेमा ठरला आहे.

याआधी हा विक्रम ‘सैराट’च्या नावावर होता. नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘सैराट’ने प्रदर्शित झाल्यानंतर जवळपास साडे ३ कोटींची ओपनिंग करत मराठी सिनेसृष्टीत नवा मानदंड निर्माण केला होता. तब्बल १० वर्षे हा विक्रम अबाधित राहिला. मात्र, ‘राजा शिवाजी’च्या भव्य एंट्रीमुळे आता हा इतिहास बदलला आहे.

विशेष म्हणजे, पहिल्याच दिवशी १० कोटींचा टप्पा पार करणारा ‘राजा शिवाजी’ हा मराठीतील पहिलावहिला चित्रपट ठरला आहे. दमदार कथा, भव्यदिव्य सादरीकरण आणि प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद यामुळे चित्रपटाने पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केली आहे.

चित्रपटाच्या या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीसाठीही हा अभिमानाचा क्षण मानला जात आहे. आगामी दिवसांत ‘राजा शिवाजी’ आणखी किती विक्रम मोडतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजा शिवाजी चित्रपटाची एकूण कमाई किती?
अभिनेता रितेश देशमुखच्या राजा शिवाजी चित्रपटाने पहिल्या आठवड्यात 57.7 कोटींची कमाई केली होती. दुसऱ्या आठवड्यात चित्रपटाने 27 कोटी कमावले होते. रितेशच्या या चित्रपटाने 15 व्या दिवशी 1.7 कोटींची कमाई केली होती.

मराठी सिनेसृष्टीत इतिहास रचणाऱ्या ‘राजा शिवाजी’ चित्रपटाची बॉक्स ऑफिसवरील घोडदौड अद्यापही कायम आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या तुफान प्रतिसादामुळे चित्रपटाने तिसऱ्या आठवड्यातही दमदार कमाई सुरू ठेवली आहे.

१६ व्या दिवशी चित्रपटाने २.९ कोटींची कमाई केली होती. तर आता सॅकनिल्कच्या अहवालानुसार, १७ व्या दिवशी म्हणजेच रविवारी सिनेमाच्या कमाईत आणखी वाढ झाली असून, चित्रपटाने तब्बल ३.०८ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे.

यासह ‘राजा शिवाजी’ची देशांतर्गत एकूण कमाई आता ९३.१ कोटी रुपये निव्वळ इतकी झाली आहे. तर ग्रॉस कलेक्शनचा आकडा १०९.९ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे १०० कोटींच्या क्लबमध्ये एन्ट्री करणारा हा मराठीतील दुसरा चित्रपट ठरला आहे.

पहिल्याच दिवशी सर्वाधिक ओपनिंगचा विक्रम करणाऱ्या ‘राजा शिवाजी’ने आता कमाईच्या बाबतीतही अनेक विक्रम मोडण्यास सुरुवात केली आहे. आगामी काही दिवसांत हा चित्रपट आणखी नवे टप्पे पार करणार का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Tighee Marathi Movie : डोळ्यात पाणी आणणारं तिघींचं जग; मराठीचा डंका सातासमुद्रापार वाजवणारा सिनेमा

सध्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या मराठी चित्रपटांच्या यादीत ‘सैराट’ अजूनही अव्वल स्थानी कायम आहे. मात्र, ‘राजा शिवाजी’ची वेगवान कमाई पाहता हा विक्रमही धोक्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

 

मराठीतील सर्वाधिक कमाई करणारे टॉप १० चित्रपट

१.‘सैराट’ – ११० कोटी
२. ‘राजा शिवाजी’ – ९३.१ कोटी निव्वळ (१०९.९ कोटी ग्रॉस / १७ दिवसांत)
३. ‘बाईपण भारी देवा’ – ७६.२८ कोटी
४. ‘वेड’ – ६१.२ कोटी
५. ‘नटसम्राट’ – ४१ कोटी
६. ‘पावनखिंड’ – ३७.७२ कोटी
७.‘लई भारी’ – ३७ कोटी
८.‘कट्यार काळजात घुसली’ – ३५ कोटी
९. ‘ठाकरे’ – ३१.६ कोटी
१०. ‘टाइमपास’ – ३० कोटी

ही चिमुकली अभिनेत्री ओळखली का? 70 च्या दशकात गाजवला पडदा, 72 व्या वर्षी धर्मेंद्रसोबत किसिंग सीनने खळबळ

‘राजा शिवाजी’च्या यशामुळे मराठी चित्रपटसृष्टीला नवसंजीवनी मिळाल्याचे बोलले जात आहे. भव्य मांडणी, दमदार अभिनय आणि प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे चित्रपटाची क्रेझ दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Web Title: New history in marathi cinema sairat record broken after 10 years raja shivaji becomes the second marathi film to cross 100 crore mark

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 08:38 AM

Topics:  

  • Box Office
  • marathi movie
  • ritesh deshmukh

संबंधित बातम्या

‘या शोमध्ये येणं ही माझी चूक होती’; ‘Lock Upp2’मध्ये राम कपूरचं वक्तव्य चर्चेत, रितेश देशमुखकडे केली खास विनंती
1

‘या शोमध्ये येणं ही माझी चूक होती’; ‘Lock Upp2’मध्ये राम कपूरचं वक्तव्य चर्चेत, रितेश देशमुखकडे केली खास विनंती

गुलाबी साडीत ईशा मालवीयाचा भन्नाट डान्स; ठुमक्यांनी जिंकली चाहत्यांची मनं, रितेश देशमुखच्या कमेंटने वेधलं लक्ष
2

गुलाबी साडीत ईशा मालवीयाचा भन्नाट डान्स; ठुमक्यांनी जिंकली चाहत्यांची मनं, रितेश देशमुखच्या कमेंटने वेधलं लक्ष

‘लग्नाआधी अनेक मुलींसोबत..’, Akanksha Chamola चा धक्कादायक खुलासा; Bisexuality बद्दल काय म्हणाली अभिनेत्री?
3

‘लग्नाआधी अनेक मुलींसोबत..’, Akanksha Chamola चा धक्कादायक खुलासा; Bisexuality बद्दल काय म्हणाली अभिनेत्री?

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर
4

Frame: ‘फ्रेम’ चित्रपटाचा होणार प्रीमियर! कर्तव्य आणि विवेकबुद्धी यांच्यातील संघर्षाची प्रभावी कथा लवकरच ZEE5 मराठीवर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.