Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! ‘या’ तारखेपासून मराठी लावणीचा रंगणार जल्लोष

Phulwara Marathi Movie: ‘द फोक आख्यान’ फेम हर्ष-विजय या जोडीने सिनेमाला संगीत दिले असून कथा, पटकथा, संवाद आणि गाणी ईश्वर ताराबाई अंधारे यांनी लिहिली आहेत. ‘फुलवरा’मध्ये केवळ लावणीचा नृत्यप्रकार न दाखवता तिची संस्कृती, परंपरा आणि काळानुसार झालेला बदल तसेच तमाशा कलावंतांचा संघर्ष मांडला जाणार असल्याचे रवी जाधव यांनी सांगितले आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 21, 2026 | 06:21 PM
Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Phulwara Marathi Movie: रवी जाधवांच्या दिग्दर्शनात खुलणार ‘फुलवरा’! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • ‘फुलवरा’ १४ जानेवारी २०२७ला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार.
  • रवी जाधव आणि झी स्टुडिओज पुन्हा लावणीच्या विषयावर एकत्र आले आहेत.
  • हर्ष-विजय यांच्या संगीतासह लावणी, तमाशा आणि लोककलेची संस्कृती सिनेमातून पाहायला मिळणार.
लावणी म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो घुंगरूचा आवाज, ढोलकीचा ठेका आणि अस्सल मराठी मातीचा सुगंध. आठवतंय ‘नटरंग‘? 16 वर्षांपूर्वी आलेल्या त्या सिनेमाने अख्ख्या महाराष्ट्राला वेड लावलं होतं. गुणा आणि त्याची लावणी आजही लोक विसरले नाहीत. आता तब्बल 16 वर्षानंतर पुन्हा तीच जोडी, झी स्टुडिओज आणि दिग्दर्शक रवी जाधव पुन्हा एकदा लावणीवर सिनेमा घेऊन येत आहेत.त्या सिनेमाचं नाव आहे ‘फुलवरा’. Phulwara Marathi Movie:

कधी येणार ‘फुलवरा’?

सिनेमाच्या टीमने आता त्याची प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. ‘फुलवरा’ हा सिनेमा मकर संक्रांतीला म्हणजेच 14 जानेवारी 2027 ला थिएटरमध्ये येणार आहे. संक्रांतीचा मुहूर्त साधून हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.या घोषणेसोबत एक पोस्टर पण रिलीज झालं आहे. पोस्टरमध्ये पूजेचं ताट आहे आणि त्यात देवी अंबाबाईचा मुखवटा आहे. आणि त्याखाली एक ओळ लिहिली आहे – ‘आई अंबाबाईचा आशीर्वाद घ्या आणि अस्सल मराठी लावणीला बळ द्या’. या एका ओळीतच सिनेमाचा विषय काय आहे हे कळतंय. सिनेमा अस्सल मराठी लावणीवर असणार आहे. पण गोष्ट काय आहे, कलाकार कोण आहेत हे अजून गुलदस्त्यातच ठेवलं आहे.

संगीत कोणाचं आहे?

‘द फोक आख्यान’ फेम हर्ष-विजय या जोडीने या सिनेमाला संगीत दिलं आहे. आजकाल ही जोडी लोकसंगीतात खूप गाजतेय. लोककलेवर त्यांचा चांगला अभ्यास आहे. आणि या सिनेमाची कथा, पटकथा, डायलॉग आणि गाणी लिहिली आहेत. ते पण ‘द फोक आख्यान’चेच लेखक ईश्वर ताराबाई अंधारे यांनी लिहिले आहे. एकीकडे लोककलेचा अभ्यास असणारी नवीन पिढी आणि दुसरीकडे रवी जाधव यांचा मोठा अनुभव, यांचा संगम या सिनेमात बघायला मिळणार आहे. हा सिनेमा फक्त लावणीचा डान्स दाखवणार नाही तर त्या मागची संस्कृती, परंपरा आणि आजच्या काळात लावणी कशी बदलत गेली हे पण दाखवणार आहे असं बोललं जातंय.

रवी जाधव काय म्हणाले?

या सिनेमाबद्दल बोलताना रवी जाधव म्हणाले, “‘नटरंग’नंतर 16 वर्षांनी परत तमाशावर सिनेमा करणं हे खरंच धाडस आहे. कारण तमाशा हा महाराष्ट्राच्या लोककलेचा जीव आहे आणि लावणी ही त्या लोककलेची राणी आहे. अशा मोठ्या परंपरेवर सिनेमा करणं ही मोठी जबाबदारी आहे. ती जबाबदारी समजून आम्ही ‘फुलवरा’ बनवला आहे.”ते पुढे म्हणाले, “‘नटरंग’ची गोष्ट 70 च्या दशकातली होती. तर ‘फुलवरा’ची गोष्ट 2015 मधली आहे. या 50-55 वर्षात तमाशा खूप बदलला. पण आजही तमाशा कलावंत आपली अस्सल मराठी कला जपण्यासाठी धडपडत आहेत. त्यासाठी त्यांचा संघर्ष आणि त्याग खूप मोठा आहे. आमच्या या फुलवऱ्याला लोक ‘नटरंग’ सारखंच प्रेम देतील अशी आशा आहे.”

झी स्टुडिओजला विश्वास

झी स्टुडिओजचे बवेश जानवलेकर म्हणाले, “झी स्टुडिओज, रवी जाधव आणि लावणी, हे समीकरण पुन्हा एकदा येतंय याचा आम्हाला खूप आनंद आहे. कथा ऐकल्यापासूनच आम्हाला या सिनेमाबद्दल उत्सुकता होती. नवीन वर्षाची सुरुवात ‘फुलवरा’ने चांगली होईल याची खात्री आहे. प्रेक्षकांना अस्सल लावणीचा बाज बघायला मिळेल.”तर मित्रांनो, 14 जानेवारी 2027 ला ‘फुलवरा’ थिएटरमध्ये येतोय. ‘नटरंग’ने जो ठसा उमटवला होता, तोच ठसा ‘फुलवरा’ उमटवतोय का हे बघणं आता महत्त्वाचं असणार आहे.

Web Title: Phulwara marathi movie ravi jadhav release date

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 21, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका
1

Trump vs Media : ‘दरवाजा बंद केला? मग कोर्टात भेटू!’ CNN-MSNOW-Politicoचा ट्रम्प प्रशासनाला झटका

Wi-Fi Not Working?  Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा
2

Wi-Fi Not Working? Wi-Fi कनेक्ट होत नाहीये? फक्त 5 मिनिटांत समस्या सोडवा, ‘या’ 10 ट्रिक्स नक्की करून पाहा

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना
3

world News:आता फक्त वाट बघायची ,हल्ला झाला कि तिप्पट रिटर्न गिफ्ट मिळणार ;इराणची सूचना

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !
4

Nagpur News : देशातील मोठी सोलर इकोसिस्टीम आता नागपुरात !

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.