Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! ‘बंधू’मध्ये साकारणार महत्त्वाची भूमिका

Actor Rajat Bedi:दोन सख्ख्या भावांमधील प्रेम, भांडणं आणि एकमेकांसाठीची घट्ट साथ यावर आधारित ‘बंधू’ हा नवा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात राष्ट्रीय पुरस्कार विजेते उपेंद्र लिमये आणि इफ्फी पुरस्कार विजेते जितेंद्र जोशी पहिल्यांदाच भावांच्या भूमिकेत एकत्र दिसणार आहेत.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 31, 2026 | 06:45 PM
Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Actor Rajat Bedi: बॉलिवूडनंतर मराठीत रजत बेदीची दमदार एन्ट्री! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • उपेंद्र लिमये आणि जितेंद्र जोशी पहिल्यांदा भावांच्या भूमिकेत
  • रजत बेदीची मराठी सिनेसृष्टीत एन्ट्री
  • ‘बंधू’ २० नोव्हेंबरला होणार प्रदर्शित
 

Actor Rajat Bedi’s Entry into Marathi Cinema: दोन सख्या भावांचं नातं कसं असतं? कधी भांडण, कधी प्रेम, पण एकमेकांसाठी जीव द्यायला तयार असणं. याच नात्यावर आधारित एक भन्नाट मराठी सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतोय. त्या सिनेमाचं नाव आहे ‘बंधू‘. या सिनेमाचं सगळ्यात मोठं आकर्षण म्हणजे यात दोन मोठे कलाकार पहिल्यांदाच एकत्र दिसणार आहेत.

एक आहेत राष्ट्रीय पुरस्कार मिळवलेले उपेंद्र लिमये आणि दुसरे आहेत इफ्फी पुरस्कार विजेते जितेंद्र जोशी. दोघेही आपल्या नैसर्गिक आणि भारी अभिनयासाठी ओळखले जातात. दोघेही वेगवेगळ्या आणि अवघड भूमिका करण्यात तरबेज आहेत. आता या दोघांना एका चित्रपटात दोन भावांच्या भूमिकेत बघणं ही प्रेक्षकांसाठी एक मोठी मेजवानी असणार आहे.

मराठी सिनेमाशी जोडले

या सिनेमात आणखी एक मोठी एन्ट्री झाली आहे. बॉलिवूड आणि साऊथच्या सिनेमात काम केलेले प्रसिद्ध अभिनेते रजत बेदी आता मराठी सिनेमाशी जोडले गेले आहेत. रजत बेदी यांच्या घराण्यात तीन पिढ्या सिनेमात आहेत. ते या ‘बंधू’ सिनेमाचे प्रस्तुतकर्ते आहेत. जे एस डी स्टुडिओ आणि ट्राईफ्लिक्स एंटरटेनमेंट यांनी मिळून हा सिनेमा बनवला आहे. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप ओझा हे या सिनेमाचे निर्माते आहेत. हा सिनेमा २० नोव्हेंबरला सगळीकडे प्रदर्शित होणार आहे. Actor Rajat Bedi:

वेगळ्या विषयावरचे सिनेमे

या सिनेमाचं दिग्दर्शन नितीन सिंधूविजय सुपेकर यांनी केलं आहे. त्यांनी याआधी ‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ सारखे हिट आणि वेगळ्या विषयावरचे सिनेमे दिले आहेत. त्यांना भावनिक सीन खूप चांगल्या पद्धतीने दाखवता येतात. या सिनेमाचं लेखन आणि संवाद पण त्यांचेच आहेत. सिनेमाचं संगीत विजय नारायण गवंडे यांनी दिलं आहे. त्यांची गाणी मनाला भिडणारी आणि काळजाला हात घालणारी असतात, त्यामुळे या सिनेमात पण चांगली गाणी ऐकायला मिळतील.

Jui Gadkari post: ‘आमची म्हातारी आज ७०ची झाली असती…’ सायलीची पूर्णा आजीच्या आठवणीत भावूक पोस्ट

सिनेमाची गोष्ट काय आहे?

ही गोष्ट एका लहान गावातली आहे. दोन भावांच्या आयुष्याभोवती ही गोष्ट फिरते. आपल्या भावाचं भलं व्हावं म्हणून दुसरा भाऊ स्वतः किती त्रास सहन करतो, हे यात दाखवलं आहे. कधी कधी नात्यांमध्ये पैसा, अहंकार येतो. मग ती नाती तुटतात का? परिस्थिती कितीही वाईट आली तरी भाऊ भाऊ एकत्र राहतात का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या सिनेमात मिळतील.

Mrunmayee Deshpande: स्पर्धकांच्या आत्मविश्वासासाठी मृण्मयी काय करते? ‘सारेगमप’च्या सूत्रसंचालनामागचा सांगितला खास दृष्टिकोन

हा सिनेमा बघताना आपल्याला आपल्याच घरची गोष्ट बघतोय असं वाटेल. कारण प्रत्येकाच्या घरात भाऊ-भाऊ असतातच. त्यांच्यातलं प्रेम, भांडण, त्याग हे सगळं आपण अनुभवलं आहे. म्हणूनच ‘बंधू’ हा फक्त सिनेमा नाही तर प्रत्येकाच्या मनाला स्पर्श करणारी गोष्ट आहे. २० नोव्हेंबरची वाट बघावीच लागेल.

 

Web Title: Rajat bedi enters marathi cinema with bandhu

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 31, 2026 | 06:45 PM

Topics:  

  • Entertainement News
  • Marathi News

संबंधित बातम्या

Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, हृता दुर्गुळेचा नवा लूक पाहिलात का?
1

Hrita Durgule: शाळेचा गणवेश, दोन वेण्या आणि खट्याळ हसू, हृता दुर्गुळेचा नवा लूक पाहिलात का?

Entertainment News: तीस वर्षांचा प्रवास आणि तीन नवे आवाज – पंचम निषादचा ‘वर्तमान’ पुन्हा रंगमंचावर
2

Entertainment News: तीस वर्षांचा प्रवास आणि तीन नवे आवाज – पंचम निषादचा ‘वर्तमान’ पुन्हा रंगमंचावर

Obesity and Back Pain: मणक्यांची काळजी घ्या! वाढत्या वजनामुळे स्पाईनवर होणाऱ्या परिणामांबद्दल तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला
3

Obesity and Back Pain: मणक्यांची काळजी घ्या! वाढत्या वजनामुळे स्पाईनवर होणाऱ्या परिणामांबद्दल तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

Jui Gadkari post:  ‘आमची म्हातारी आज ७०ची झाली असती…’ सायलीची पूर्णा आजीच्या आठवणीत भावूक पोस्ट
4

Jui Gadkari post: ‘आमची म्हातारी आज ७०ची झाली असती…’ सायलीची पूर्णा आजीच्या आठवणीत भावूक पोस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.