Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘दर्याभवानी’ मधून उलगडणार शिवरायांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास; ‘या’ तारखेला होणार प्रदर्शित

दिग्पाल लांजेकर यांच्या 'श्री शिवराज अष्टक' मालिकेतील हा सातवा चित्रपट १५ जानेवारी २०२७ रोजी प्रदर्शित होणार असून, त्यात अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, ऋषी सक्सेना, आस्ताद काळे, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, नितीन वाघ आणि सचिन देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 27, 2026 | 03:46 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:
  • प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण!
  • अध्याय प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सिनेमाच्या माध्यमातून साकारला जाणार आहे.
  • तीन वाघ आणि सचिन देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथेतील सागरी पराक्रमाचा सुवर्णअध्याय आता रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्या बहुचर्चित ‘श्री शिवराज अष्टक’ चित्रपट मालिकेतील सातवा चित्रपट ‘दर्याभवानी’ १५ जानेवारी २०२७ रोजी राज्यभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या शुभमुहूर्त आणि भव्य पोस्टर अनावरण सोहळ्यात या चित्रपटाची अधिकृत घोषणा करण्यात आली. या सोहळ्याला कलाकारांसह दर्यासारंग सरखेल कान्होजी आंग्रे यांचे नववे वंशज रघुजीराजे आंग्रे सरखेल यांनी विशेष उपस्थिती लावली. चित्रपटाचे दमदार पोस्टर समोर आल्यानंतर प्रेक्षकांमध्ये उत्सुकतेचं वातावरण निर्माण झालं आहे.

प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर ‘खिलाडी’ आणि ‘अनाडी’ पुन्हा घालणार धुमाकूळ… Haiwaan ची रिलीज डेट जाहीर

‘ज्याच्याकडे अश्वबल त्याची पृथ्वी आणि ज्याच्याकडे समर्थ आरमार त्याचा समुद्र’ या छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदर्शी विचाराला केंद्रस्थानी ठेवून ‘दर्याभवानी’ची कथा आकाराला आली आहे. हिंदवी स्वराज्याच्या सागरी संरक्षणाची उभारणी, आरमाराची निर्मिती, जलदुर्गांची रणनीती आणि समुद्रावर मराठ्यांनी निर्माण केलेलं वर्चस्व या सर्वांचा भव्य आणि थरारक पट या चित्रपटातून उलगडणार आहे. शिवरायांच्या सागरी दूरदृष्टीचा हा महत्त्वपूर्ण अध्याय प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणावर सिनेमाच्या माध्यमातून साकारला जाणार आहे.

या चित्रपटाची निर्मिती श्री तिरुपती बालाजी चित्रचे प्रकाश पाटील, डॉ. अशोक जीवतोडे, अजिंक्य पाटील तसेच एलेवेट फिल्म्सचे पवन सादमवार आणि सुरज सादमवार यांनी केली आहे. पुष्कर यावलकर हे सहनिर्माते असून दीठी प्रॉडक्शन्स चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. यापूर्वी ‘फर्जंद’, ‘फत्तेशिकस्त’, ‘पावनखिंड’, ‘शेर शिवराज’, ‘सुभेदार’ आणि ‘रणपति शिवराय’ या चित्रपटांद्वारे शिवकालीन इतिहास प्रभावीपणे मांडणाऱ्या दिग्पाल लांजेकर यांच्या ‘श्री शिवराज अष्टक’ मालिकेतील हा सातवा चित्रपट असल्याने त्याबद्दल विशेष उत्सुकता आहे.

निर्माते प्रकाश पाटील यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सागरी सामर्थ्याचा इतिहास नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याचा प्रयत्न या चित्रपटातून केला जात आहे. सखोल संशोधन, वास्तवदर्शी मांडणी आणि भव्य निर्मितीमूल्यांच्या जोरावर ‘दर्याभवानी’ प्रेक्षकांसाठी संस्मरणीय सिनेमॅटिक अनुभव ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर म्हणाले की, शिवरायांचा इतिहास हा फक्त गड-किल्ल्यांपुरता मर्यादित नसून समुद्रावर स्वराज्याची पताका फडकवणाऱ्या दूरदृष्टीचाही इतिहास आहे. ‘दर्याभवानी’च्या माध्यमातून शिवरायांच्या आरमार निर्मितीचा प्रवास, जलदुर्गांचे महत्त्व आणि सागरी संरक्षण व्यवस्थेची ताकद प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

Ashok Saraf : 37 वर्षांचा सुखाचा संसार! जेष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ यांची रोमँटिक पोस्ट; म्हणाल्या ‘आजही माझं हृदय…’

या चित्रपटात अभिजीत श्वेतचंद्र, मृणाल कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, स्मिता शेवाळे, अजय पूरकर, मृण्मयी देशपांडे, ऋषी सक्सेना, आस्ताद काळे, प्रसन्न केतकर, निखिल राऊत, नितीन वाघ आणि सचिन देशपांडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाचे लेखन दिग्पाल लांजेकर यांनी केले असून नितीन वाघ यांनी सहलेखक म्हणून योगदान दिले आहे. स्मिता शेवाळे या क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. विजय खडके यांनी छायांकन, केदार दिवेकर आणि अवधूत गांधी यांनी संगीत, तर दिग्पाल लांजेकर यांनी गीतलेखनाची जबाबदारी सांभाळली आहे. निखिल लांजेकर (ध्वनी), प्रतीक रेडीज (कला दिग्दर्शन), बब्बू खन्ना (साहसदृश्य), सुमित साळुंखे (नृत्यदिग्दर्शन), रोहिणी साळेकर (वेशभूषा) आणि अतुल म्हस्के (रंगभूषा) यांनी चित्रपटाच्या तांत्रिक बाजू अधिक भक्कम केली आहे.

Web Title: The history of shivrais naval might to be unveiled through daryabhavani

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2026 | 03:46 PM

Topics:  

  • chatrapati Shivaji Maharaj
  • latest movies
  • Marathi celebrities

संबंधित बातम्या

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
1

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Shruti Marathe: ‘कलावंत’च्या वादनावर विद्याधर जोशींचा प्रश्न; अभिनेत्याच्या पोस्टवर श्रुती मराठेचं सणसणीत उत्तर, म्हणाली..
2

Shruti Marathe: ‘कलावंत’च्या वादनावर विद्याधर जोशींचा प्रश्न; अभिनेत्याच्या पोस्टवर श्रुती मराठेचं सणसणीत उत्तर, म्हणाली..

Albattya Galbattya Natak: ‘अलबत्या गलबत्या’ची १००० प्रयोगांकडे झेप; आता बालप्रेक्षकांसाठी खास गाण्यांची मेजवानी
3

Albattya Galbattya Natak: ‘अलबत्या गलबत्या’ची १००० प्रयोगांकडे झेप; आता बालप्रेक्षकांसाठी खास गाण्यांची मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.