प्रतीक्षा संपली! 18 वर्षांनंतर 'खिलाडी' आणि 'अनाडी' पुन्हा घालणार धुमाकूळ... Haiwaan ची रिलीज डेट जाहीर
Gaurav Patki : ‘ऑफिसवाली प्रेम कहाणी’ Premala Conditions Apply सिरीजवर काय म्हणाला दिग्दर्शक?
बऱ्याच काळानंतर आता सैफ अली खान आणि अक्षय कुमार एकत्र काम करणार आहेत. चित्रपटाची घोषणा झाल्यानंतर प्रेक्षक प्रचंड आनंदी झाले होते. आता हा आनंद आणखी वाढणार आहे. कारण सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांच्या बहुप्रतिक्षित हैवान चित्रपटाची रिलीज डेट जाहिर करण्यात आली आहे. (फोटो सौजन्य – इंस्टाग्राम)
सस्पेंस थ्रिलर चित्रपट ‘हैवान’ चे निर्माता केवीएन प्रोडक्शन यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाच्या अधिकृत रिलीज डेटविषयी घोषणा करत सांगितलं की, सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांचा आगामी आणि बहुप्रतिक्षित चित्रपट हैवान 11 सप्टेंबर 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित केला जाणार आहे. रिलीज डेटबाबत घोषणा करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहीले आहे की, “एक ध्यास, एक अफाट प्रयत्न… अशी एक तारीख जी तुम्ही कधीच विसरणार नाही. प्रियदर्शन यांचा ‘हैवान’ 11 सप्टेंबरला प्रदर्शित होत आहे. ही तारीख नक्की लक्षात ठेवा.”
निर्माता केवीएन प्रोडक्शन यांनी रिलीज डेटबाबत घोषणा करताच, सैफ अली खान आणि अक्षय कुमार यांच्या चाहत्यांमध्ये एक वेगळाच उत्साह निर्माण झाला आहे. एका यूजरने कमेंट करत लिहीले आहे की, “अक्षय कुमारच्या आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटाची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे. तुम्ही कमाल कराल, अक्की सर.” तर दुसऱ्या एका यूजरने लिहीले आहे की, “सैफ अली खान 6 वर्षांनंतर मुख्य कलाकाराच्या भुमिकेत पाहायला मिळणार आहे. माझा आनंद गगनात मावेनासा झाला आहे.” तर आणखी एका यूजरने म्हटलं आहे की, “या दोन्ही अभिनेत्यांची जोडी आधीपासूनच ब्लॉकबस्टर आहे.”
अक्षय कुमार आणि सैफ अली खान या दोघांनी पहिल्यांदा 1994 मध्ये ‘मैं खिलाडी तू अनाडी’ या चित्रपटात एकत्र काम केले होते. ‘तशन’, ‘आरजू’, ‘तू चोर मैं सिपाही’ आणि ‘तशन’ यांसारख्या चित्रपटांमध्येही त्यांच्या जोडीला चांगला प्रतिसाद मिळाला. आता 18 वर्षांनंतर त्यांना एकत्र पाहणे हे चाहत्यांसाठी एक ट्रीट आहे.






