Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Viral Video: आफ्रिकेतील शाळेत घुमला ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा’ जयघोष; व्हिडिओ पाहून येईल अंगावर काटा

Viral Video: महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या युगांडातील एका छोट्याशा शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि स्वराज्याच्या विचारांचा जयघोष घुमला. काही मराठी तरुणांनी विशेष उपक्रम राबवत स्थानिक विद्यार्थ्यांना महाराजांच्या जीवनकार्याची ओळख करून दिली.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 10, 2026 | 12:30 PM
Viral Video: आफ्रिकेतील शाळेत घुमला ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा’ जयघोष (फोटो-सौजन्य- सोशलमीडिया)

Viral Video: आफ्रिकेतील शाळेत घुमला ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा’ जयघोष (फोटो-सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • युगांडातील शाळेत घुमला शिवरायांचा जयघोष
  • मराठी तरुणांनी विद्यार्थ्यांना सांगितली महाराजांची गाथा
  • स्वराज्य आणि शिवरायांचे विचार पोहोचले आफ्रिकेत
Chhatrapati Shivaji Maharaj Uganda School: महाराष्ट्रापासून हजारो किलोमीटर दूर असलेल्या आफ्रिकेतील युगांडामधील एका छोट्याशा शाळेत अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घुमले. मराठी मातीपासून दूर, वेगळ्या देशात आणि वेगळ्या वातावरणात एका विद्यार्थ्याने महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या विचारांची माहिती एक सुंदर भाषण केले. या भाषणाने मात्र अनेकांचे लक्ष वेधून घेतले. युगांडातील या शाळेत काही मराठी तरुणांनी एक विशेष उपक्रम राबवला. या उपक्रमाच्या माध्यमातून स्थानिक विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाची ओळख करून देण्यात आली. महाराजांनी उभे केलेले स्वराज्य, त्यांचा धाडसी स्वभाव, सामान्य माणसाबद्दल असलेली आस्था आणि संकटांशी लढण्याची वृत्ती याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

शाळेतील वातावरण काही क्षणांसाठी भारावून

यावेळी एका विद्यार्थ्याने महाराजांबद्दल आपल्या शब्दांत भाषण केले. सुरुवातीला कदाचित त्याच्यासाठी हा विषय नवीन असावा; मात्र महाराजांची माहिती ऐकल्यानंतर त्याने ज्या आत्मविश्वासाने त्यांचे नाव घेतले, ते पाहण्यासारखे आहे. भाषणाच्या शेवटी त्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला आणि शाळेतील वातावरण काही क्षणांसाठी भारावून गेले.

व्हिडिओची चर्चा सर्वत्र

या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा सुरू झाली. महाराष्ट्रात जन्मलेल्या आणि वाढलेल्या अनेकांसाठी शिवाजी महाराज हे आपल्या इतिहासाचा अभिमान आहेत. पण त्याच महाराजांविषयी आफ्रिकेतील एका विद्यार्थ्याला उत्सुकता निर्माण होणे आणि त्याने त्यांच्याबद्दल बोलणे, ही बाब नक्कीच विशेष ठरते. या उपक्रमादरम्यान मराठी तरुणांनी विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पुस्तकेही भेट दिली. त्यासोबत शाळकरी मुलांना वह्यांचे वाटप करण्यात आले. केवळ महाराजांचा इतिहास सांगून थांबण्याऐवजी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याचा प्रयत्नही या माध्यमातून करण्यात आला.

शाळा आफ्रिकेतली पण जयघोष माझ्या राजाचा… छत्रपती शिवाजी महाराजांचा !
हिच आपल्या शिवरायांची खरी ताकद आहे.#Gajawaja #ChhatrapatiShivajiMaharaj #AfricanKid pic.twitter.com/PznYjOyKNd
— Gajawaja_Official (@Gajawaja273973) August 9, 2026

महाराजांचा इतिहास सातासमुद्रापार

महाराजांचा इतिहास केवळ युद्धांच्या कथा किंवा किल्ल्यांपुरता मर्यादित नाही. त्यामागे ध्येय, नियोजन, धैर्य, नेतृत्व आणि माणसांबद्दलचा आदर अशा अनेक गोष्टी आहेत. म्हणूनच त्यांचे विचार आजही वेगवेगळ्या पिढ्यांना आकर्षित करतात. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता स्वतःच्या ध्येयासाठी प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा त्यांच्या जीवनातून मिळते. युगांडातील या शाळेतील विद्यार्थ्यांना महाराजांची माहिती देण्याचा प्रयत्न याच कारणामुळे महत्त्वाचा ठरतो. भाषा, देश, संस्कृती आणि हजारो किलोमीटरचे अंतर वेगळे असले तरी चांगल्या विचारांना सीमा नसतात. एका देशातील महान व्यक्तिमत्त्वाची ओळख दुसऱ्या देशातील मुलांपर्यंत पोहोचणे, ही स्वतःमध्ये आनंदाची गोष्ट आहे.

Viral Video: छत्रीचा माईक… आणि PWD ची पोलखोल! शाळकरी मुलींच्या रिपोर्टिंगने उडवली खळबळ

चांगल्या विचारांना सीमा नसतात

आजच्या काळात मुलांना इतिहास सांगताना तो त्यांच्या मनापर्यंत पोहोचणे अधिक महत्त्वाचे आहे. युगांडातील या विद्यार्थ्याने महाराजांचे नाव आत्मविश्वासाने घेतले, ही त्या प्रयत्नाची छोटीशी पण सुंदर झलक म्हणावी लागेल. महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आता दूर आफ्रिकेतील एका शाळेपर्यंत पोहोचले आहेत. या घटनेतून एक गोष्ट पुन्हा जाणवते, चांगल्या विचारांना सीमा नसतात. ते मनाला भिडले की ते देशाच्या सीमा ओलांडून दुसऱ्या माणसापर्यंत पोहोचतात.

ग्रॅज्युएशनच्या आधीच मुलीचा मृत्यू; वडिलांनी कार्डबोर्ड कटआउटसोबत घेतली स्वीकारली डिग्री; हृदयस्पर्शी Video Viral

Web Title: Chhatrapati shivaji maharajs legacy echoes in uganda school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 10, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • african country
  • chatrapati Shivaji Maharaj
  • viral video

संबंधित बातम्या

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या
1

‘ही अंधभक्तांची जमात फोफावत चालली आहे’ जमुईतील तरुणीच्या छेडछाडीवर रोहिणी खडसे संतापल्या

Mumbai Women Safety:  ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!
2

Mumbai Women Safety: ना टोमणे, ना त्रास… बाईकस्वार तरुणीसाठी मुंबईकरांनी केलं असं काही, देशभर कौतुक!

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड
3

Athletics News :ॲग्नेस न्गेतिचची भन्नाट कामगिरी! कोपनहेगनमध्ये हाफ मॅराथॉनचा वर्ल्ड रेकॉर्ड

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.