फोटो सौजन्य - Social Media
पोस्टमध्ये अशोक मा. मा या मराठी मालिकेमधील काही फोटोज शेअर केले आहेत. या फोटोजमध्ये निवेदिता सराफ आणि अशोक सराफ यांनी न्यायालयात जाऊन कोर्ट मॅरेज केल्याचे दिसत आहे, हे मालिकेतील क्षण जरी असले तरी या क्षणाशी त्या दोघांच्या भावना जोडल्या आहेत. एकमेकांच्या गळ्यामध्ये वरमाला टाकण्याची संधी मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा चालून आली होती. हे क्षण निवेदिता सराफ यांनी शेअर केले आहेत. तसेच कॅप्शनमध्ये अशोक सराफांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी नमूद केले आहे की, “लग्नाला ३७ वर्षे पूर्ण झाली, तरी आजही तुला पाहिलं की माझ्या चेहऱ्यावर पहिल्यासारखंच हसू उमटतं. तू माझा सर्वात जवळचा साथीदार, माझी प्रेरणा आणि आयुष्यभराचं प्रेम आहेस. प्रत्येक सुख-दुःखात माझी साथ दिल्याबद्दल मनःपूर्वक आभार. आपल्या लग्नाच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!”
निवेदिता सराफ आणि अशोक सराफांनी एकत्र केलेले सिनेमे!
लग्नाअगोदर आणि लग्नानंतर निवेदिता सराफ आणि अशोक सराफ एकत्र मोठ्या पडद्यावर झळकले आहेत. त्यांनी अशी ही बनवा बनवी, धूम धडाका, नवरी मिळे नवऱ्याला, मामला पोरीचा तसेच आमच्यासारखे आम्हीच अशा अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे.
सध्या ही आयकॉनिक जोडी ‘अशोक मा.मा’ या मालिकेत नवरा-बायकोच्या रूपात झळकत होते.






