Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tighee Marathi Movie Review : डोळ्यात पाणी आणणारं तिघींचं जग; मराठीचा डंका सातासमुद्रापार वाजवणारा सिनेमा

Tighee Marathi Movie Review : प्रत्येक सिनेमा काही ना काही गोष्ट सांगतो आणि ही गोष्ट साकार होते ती पात्रांमधून, संवादातून आणि कॅमेऱ्यातून ती गोष्ट बोलते आण मग ती प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. सध्या मराठी सिनेसृष्टीत असाच एक सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: May 21, 2026 | 04:11 PM
Tighee Marathi Movie Review

Tighee Marathi Movie Review

Follow Us
Follow Us:
  • मराठीचा डंका सातासमुद्रापार वाजवणारा सिनेमा
  • डोळ्यात पाणी आणणारं तिघींचं जग
Tighee Marathi Movie Review : प्रत्येक सिनेमा काही ना काही गोष्ट सांगतो आणि ही गोष्ट साकार होते ती पात्रांमधून, संवादातून आणि कॅमेऱ्यातून ती गोष्ट बोलते आण मग ती प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेते. सध्या मराठी सिनेसृष्टीत असाच एक सिनेमा प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. तो सिनेमा म्हणजे ZEE 5 वर नुकताच आलेला ‘तिघी’. ओटीटीवर येण्याआधी बॉक्सऑफिसवर देखील या सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाला. एवढंच नाही तर यंदाचा न्यूयॉर्क इंडियन फिल्म फेस्टिव्हल 2026 मध्ये या सिनेमाची क्लोजिंग फिल्म म्हणून निवड झाली आणि मराठीचा डंका पुन्हा एकदा सातासमुद्रापार वाजलाच.

किती सर्हासपणे म्हटलं जातं आणि तसं अनुभवलं पण जात की बाईच बाईचे पाय खेचते. पण नाण्याला दोन बाजू असतात. अशाही काही बायका असतात जिथे म्हणावं वाटतं बाईच बाईला समजून घेते. ‘तिघी’ सिनेमा नाण्याची दुसरी बाजू आहे. हा सिनेमा फक्त मातृत्व नाही बाईपण समजून सांगणारा वाटतो. पण असं असलं तरी सिनेमा कुठेही सो कोल्ड फेमिनिझमला पाठिंबा देणारा नाही वाटला. सगळं अगदी साधं आणि खूप खरं वाटणारी अशी तिघींची गोष्ट. या तिघी एकमेकींशी भयानक भांडतात पण तरीही यांच्यात एक धागा जोडून आहे. प्रेमाचा, खरेपणाचा. या तिघांना कधी जज करताच येणार नाही कारण प्रत्येक जण जिच्या तिच्या ठिकाणी योग्य आहे.

एक खमकी आई जिने दोन मुलींना मोठ्या मेहनतीने वाढवलं.आईच्या आजारपणात आपली स्वप्नं करिअर जेव्हा बाजूला पडतं तेव्हा होणारी घुसमट आजची प्रत्येक मुलगी हे समजू शकते. तेव्हा सारिकाची होणारी चिडचिड तिचा त्रागा सगळं आजची प्रत्येक मुलगी अनुभवते. आणि दुसऱ्या स्वाती एक. स्वतःच घर सांभाळताना अनेकदा प्रोफेशनल लाईफमध्ये एका बाईच्या असाह्यतेचा गैरफायदा घेणारे अनेक जण आहेत. त्यांच्याशी डील करताना काय मानसिक ताण येत असेल हे नेहा पेंडसेने कमाल साकारलंय. भारती आचरेकर म्हटलं की पहिले चेहऱ्यावर खूप हसू येतं कॉमेडी क्वीन म्हणून त्यांची मनावर एक ठसठशीत छाप पडली आहे. पण हेमलता रानडे या व्यक्तिरेखेने मात्र सगळ्या सीमा तोडल्या. काय कमालीचं काम केलंय भारती आचरेकरांनी.

Raja Shivaji Collection : मराठी सिनेसृष्टीत नवा इतिहास रचणार? ‘राजा शिवाजी’चा १०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश

आपल्याकडे फार वेळ नाही, हळूहळू शरीरातील एक एक अवयव कमकुवत होत जाणार पण ते दुख माझ्यापुरतं राहुदेत त्या आठवणी माझ्या मुलींच्या मनात नको. तुमची खमकी आई हीच माझी इमेज रहावी म्हणून हॉस्पिसचा हेमलता रानडेने धरलेला हट्ट. या सिनेमातल्या प्रत्येक फ्रेम या तिघींची गोष्ट सांगतात. सारिका, स्वाती आणि तिची आई यांच्यातला एक प्रसंग आहे त्यावेळेचं एक वाक्य अंगावर काटा आणतो. ‘मी जगण्यापासून पळत नाहीये dignity ने निरोप घेतेय’. काय कमाल संवाद लिहिलाय. आपल्या माणसांचं प्रेम मिळावं पण सहानुभूती संवेदनशील माणसाला मारतेच. मुलींचं प्रेम हेच पुरेसं आणि पण आजारपणात मिळणारी सहानुभुती किंवा त्यांच्या नजरेत आईचं हळूहळू ढासळणं नको म्हणून हेमलता रानडे यांनी धरलेला हॉस्पिसला हट्ट.

गैरसमजातून विकोपाला गेलेली भांडणं आणि पुन्हा संवादातून घट्ट झालेलं तिघींचं जग. जशी कणखर आई तशाच तिच्या लेकी. “पाठीचा कणा ताठ ठेवा गं जिथे तुम्ही टेकताय ती भिंत ढासळतेय” असं म्हणणारी आई भारती आचरेकरांनी सुंदर रित्या साकारली. सोनाली कुलकर्णी आणि नेहा पेंडसे या सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री आहेत पण या सिनेमात ना सोनाली दिसली ना नेहा. दिसल्या त्या फक्त सारिका आणि स्वातीच. प्रत्येक सिनेमा एक गोष्ट सांगतो आणि हा सिनेमा पुन्हा हेच सांगतो की, बाईच बाईला जास्त कळते. तीन अभिनेत्रींनी जसं त्यांच्या व्यक्तिरेखेचं सोनं केलं तसंच काळजाचा ठाव घेणारं जितेंद्र जोशींचे शब्द आणि त्याला संगीत दिलंय निलेश मोहरीरने. या सिनेमातल्या प्रत्येक पात्राला बोलकं करणारे प्राजक्त देशमुखचे संवाद सगळं अगदी कमाल जुळून आलंय. दमदार कथानक आणि तिघींना एका फ्रेममध्ये सुंदरपणे गुंफणारी कमाल दिग्दर्शिका. या सिनेमाच्या इंडस्ट्रीला जीजिवीषा काळे सारखी खुप सुंदर दिग्दर्शिका मिळाली. या सिनेमाने आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील मोठी झेप घेतली.

अजून बाजू सांगायची म्हणजे आपण म्हणतो पुरुष वाईट नजरेने महिलांकडे पाहतात स्वातीच्या बाबतीत ते होताना सिनेमात दाखवलं देखील. पण सगळेच पुरुष तसे नसतात हे दाखवून देणारं कॅरेक्टर म्हणजे गंधर्व. निपुण धर्माधिकारीची ती भुमिका खूप खरी होती. एक सच्चा मित्र जो सारिकाला तिच्या करिअरसाठी मदत करतो. या सिनेमात अशा खूप गोष्टी आहेत जिथे एका एका फ्रेमवर सविस्तरपणे लिहावं तरी कमीच पडेल. सगळेच पुरुष काही एकाच माळेचे मणी नसतात काही गंधर्व सारखे देखील असतात. एकीकडे स्वातीला समजून न घेणारा नवरा तर दुसरीकडे गंधर्व सारखा मैत्री जपणारा सच्चा मित्र कसं म्हणता येईल सगळे पुरुष एकाच माळेचे मणी?

अभिनेत्री अभिज्ञा भावेची पती मेहुलसाठी मजेशीर कविता; वाढदिवसाच्या शुभेच्छा देत म्हणाली, “आता तरी…. “

सिनेमा का पाहावा ?

सिनेमा का पाहावा तर , या तिघींच जग सरतेशेवटी डोळ्यात पाणी आणतं. कारण आईबरोबर लेक कितीही भांडली तरी प्रत्येक लेकीसाठी आई हळवा कप्पा असतेच. बऱ्याचदा होतं काय तर, आपल्याला माहित असतं आपली माणसं कितीही भांडली तरी सोबत आहेत पण या विश्वासामुळे कधी कधी नकळतपणे आपण त्यांना गृहीत धरतो आणि सांगायचं राहून जातं की, तुम्ही आमच्यासाठी किती महत्वाचे आहात. स्पेशली हे आईला शब्दातून सांगायचं राहून जातं. या सिनेमाने पुन्हा आयुष्यातल्या हळव्या कोपऱ्याची जाणीव करून देतं आणि पुन्हा पुन्हा सिनेमा हेच सांगतो की, बाईच बाईला कळते.

 

 

Web Title: Tighee marathi movie review new york indian film festival 2026 in selected closing film

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 06:27 PM

Topics:  

  • Entertainement News
  • marathi cinema
  • sonalee kulkarni

संबंधित बातम्या

The Vvan Box Office Collection: रिव्ह्यू निगेटिव्ह, तरी प्रेक्षकांचा पैसा वसूल! ‘द वन’ने ओपनिंग डेला केली ‘इतकी’ कोटींची कमाई
1

The Vvan Box Office Collection: रिव्ह्यू निगेटिव्ह, तरी प्रेक्षकांचा पैसा वसूल! ‘द वन’ने ओपनिंग डेला केली ‘इतकी’ कोटींची कमाई

Bigg Boss fame Divya Shinde Arrest:  ५ लाखांसाठी थेट डॉक्टरांचं घर गाठलं? ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदे पोलिसांच्या ताब्यात
2

Bigg Boss fame Divya Shinde Arrest: ५ लाखांसाठी थेट डॉक्टरांचं घर गाठलं? ‘बिग बॉस मराठी’ फेम दिव्या शिंदे पोलिसांच्या ताब्यात

Bigg Boss 20 Eviction: यंग डीएसए की ईशा रिखी? ‘बिग बॉस 20’मधून कोणाचा पत्ता कट? समोर आलं नाव
3

Bigg Boss 20 Eviction: यंग डीएसए की ईशा रिखी? ‘बिग बॉस 20’मधून कोणाचा पत्ता कट? समोर आलं नाव

Govinda Sunita Ahuja Controversy: ‘आधीच मोडकळीस आलेलं घर…’; गोविंदाच्या पत्नीला कोमल राणीचं सडेतोड उत्तर
4

Govinda Sunita Ahuja Controversy: ‘आधीच मोडकळीस आलेलं घर…’; गोविंदाच्या पत्नीला कोमल राणीचं सडेतोड उत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.