Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vikram Gokhale Last Movie: दिवंगत विक्रम गोखले यांची अखेरची पडद्यावरील झलक; ‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’चा टीजर लाँच

दिवंगत विक्रम गोखले यांच्या अखेरच्या 'बेवारस - सत्य एका वळणावरचं' चित्रपटाचा टीजर प्रदर्शित झाला आहे. हृदयस्पर्शी कथानक, दमदार स्टारकास्ट आणि भावनिक अभिनयाने सजलेला हा चित्रपट २५ जून रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 07, 2026 | 11:12 AM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

मराठी रंगभूमी आणि मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते Vikram Gokhale यांच्या अखेरच्या चित्रपटाची पहिली झलक प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’ या चित्रपटाचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून, त्यातील हृदयस्पर्शी कथानक, दमदार कलाकारांची फळी आणि भावनिक मांडणी यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढली आहे. हा चित्रपट २५ जून रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे.

हरिणी प्रॉडक्शन्स निर्मित आणि शिव आर्यन फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती सौ. रिया कुमार, नितीन विचारे आणि शिव आर्यन यांनी केली आहे. चित्रपटाची कथा विजय राणे यांची असून दिग्दर्शन विजय राणे आणि सौ. रिया कुमार यांनी केले आहे. क्रिएटिव्ह दिग्दर्शन नितीन विचारे यांचे आहे.

चित्रपटाची पटकथा आणि संवाद लेखन शिरीष लाटकर यांनी केले असून गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन विवेक आपटे यांचे आहे. शीर्षक गीताचे लेखन सौ. रिया कुमार यांनी केले असून संगीत बिपलाब दत्ता यांचे आहे. यूजीन डिसोझा आणि योगेश कोळी यांनी छायांकन, अमीर हडकर यांनी पार्श्वसंगीत, तर यश सुर्वे यांनी संकलनाची जबाबदारी सांभाळली आहे. स्टार कास्टिंग नितीन विचारे यांनी केले आहे.

चित्रपटातील कलाकार
चित्रपटात विक्रम गोखले यांच्यासोबत Tejaswini Pandit, Rohini Hattangadi, Usha Naik, Rutuja Bagwe, Uday Tikekar, Srijit Marathe आणि आदित्य देशमुख यांच्यासह अनेक कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’ या चित्रपटात विक्रम गोखले यांनी अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका साकारली आहे. पायाने अधू असलेल्या एका अनाथ मुलाच्या न्यायासाठीच्या कोर्ट-कचेरीतील संघर्षाची कथा या चित्रपटात उलगडणार आहे. सामाजिक वास्तव आणि मानवी भावनांचा स्पर्श असलेल्या या कथानकामुळे चित्रपटाला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.


टीजरमध्ये विक्रम गोखले यांच्या आर्त आणि भावनिक अभिनयाची प्रभावी झलक पाहायला मिळते. त्यांचा अनुभवसंपन्न अभिनय, हृदयाला भिडणारे कथानक आणि दमदार कलाकारांमुळे प्रेक्षकांना एक उत्कृष्ट सिनेमॅटिक अनुभव मिळणार असल्याची खात्री टीजरमधून दिसून येते. तांत्रिकदृष्ट्याही चित्रपट भक्कम वाटत असून, आता २५ जूनच्या प्रदर्शनाकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Vikram gokhale last movie the final on screen appearance of late vikram gokhale teaser of bewaras satya eka valanavarach launched

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 07, 2026 | 11:12 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi movie
  • Vikram Gokhale

संबंधित बातम्या

Abhijeet Sawant: २१ वर्षांनंतरही ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ची क्रेझ कायम; पॅपाराझींच्या आग्रहाखातर अभिजीतने विमानतळावर गायल्या दोन ओळी
1

Abhijeet Sawant: २१ वर्षांनंतरही ‘मोहब्बतें लुटाऊँगा’ची क्रेझ कायम; पॅपाराझींच्या आग्रहाखातर अभिजीतने विमानतळावर गायल्या दोन ओळी

Elakshi Gupta: ‘तान्हाजी’ फेम इलाक्षी गुप्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज
2

Elakshi Gupta: ‘तान्हाजी’ फेम इलाक्षी गुप्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

Don’t Be Shy Jhoomo Song:  मस्ती, मैत्री आणि तरुणाईचा जोश; ‘डोंट बी शाय’चं धमाकेदार गाणं ‘झूमो’ रिलीज
3

Don’t Be Shy Jhoomo Song: मस्ती, मैत्री आणि तरुणाईचा जोश; ‘डोंट बी शाय’चं धमाकेदार गाणं ‘झूमो’ रिलीज

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
4

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.