Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधी ‘अल्याड पल्याड’ मग ‘घबाडकुंड’; विदर्भाचा युवा दिग्दर्शक ठरतोय मराठी हॉररचा नवा चेहरा!

'अल्याड पल्याड'च्या यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांच्या 'घबाडकुंड'लाही प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. यवतमाळच्या प्रीतम पाटील यांनी सलग दोन यशस्वी हॉररपट देत मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 21, 2026 | 04:35 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

मराठी चित्रपटसृष्टीत गेल्या काही वर्षांत विविध शैलींचे प्रयोग होत असताना हॉरर या प्रकारालाही प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. या बदलत्या प्रवाहात सातत्याने दर्जेदार आणि वेगळ्या संकल्पनांचे चित्रपट सादर करत युवा दिग्दर्शक प्रीतम एस. के. पाटील यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ‘अल्याड पल्याड’ या चित्रपटाच्या यशानंतर आता ‘घबाडकुंड’लाही प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, सलग दोन यशस्वी हॉररपटांच्या जोरावर त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपले स्थान अधिक भक्कम केले आहे.

Kangana Ranaut On CJP Protest: ‘आम्ही घाबरलो होतो…’, CJP आंदोलनावर कंगना रनौतची प्रतिक्रिया; दिल्ली पोलिसांचे मानले आभार

विदर्भातील यवतमाळसारख्या शहरातून आलेल्या प्रीतम पाटील यांनी आपल्या कल्पक दिग्दर्शनामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे. शॉर्ट फिल्म्स आणि वेबसिरीजपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यानंतर ‘खिचिक’, ‘डॉक्टर डॉक्टर’ आणि ‘ढिशक्यांव’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी दिग्दर्शनाची वेगळी शैली प्रेक्षकांसमोर मांडली. मात्र ‘अल्याड पल्याड’ आणि ‘घबाडकुंड’ या दोन हॉररपटांनी त्यांना खऱ्या अर्थाने नवी ओळख मिळवून दिली.

‘घबाडकुंड’चे वैशिष्ट्य म्हणजे या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीला पहिले सिनेमॅटिक युनिव्हर्स मिळाले आहे. भय, रहस्य, अॅक्शन, भावनिक प्रसंग आणि थरार यांचा समतोल साधणाऱ्या या चित्रपटाने प्रेक्षकांसोबतच समीक्षकांच्याही पसंतीची पावती मिळवली आहे. बॉक्स ऑफिसवरही चित्रपटाने उल्लेखनीय कामगिरी करत मराठी हॉररपटांबाबतची प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. या चित्रपटाचे निर्माते डॉ. रसिक कदम (आयकॉन द स्टाईल) यांनी प्रीतम एस. के. पाटील यांच्या दिग्दर्शनावर सुरुवातीपासून विश्वास दाखवत त्यांना सातत्याने पाठिंबा दिला. त्यांच्या विश्वासामुळेच ‘घबाडकुंड’सारखा भव्य आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम चित्रपट साकार होऊ शकला. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दर्जेदार व्हिज्युअल्स आणि प्रभावी कथनशैली यामुळे या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी छाप सोडली आहे.

Priya Bapat : ‘मी रागावली आहे, मी नाराज…’ प्रिया बापटने व्यक्त केला राग! सरकारला स्पष्ट शब्दात ठणकावले

याबाबत बोलताना प्रीतम एस. के. पाटील म्हणाले, “प्रेक्षकांनी ‘अल्याड पल्याड’वर जसं भरभरून प्रेम केलं, तसंच प्रेम ‘घबाडकुंड’लाही मिळत आहे. हा प्रतिसाद आमच्यासाठी आनंददायी असून जबाबदारीही वाढवणारा आहे. मराठी प्रेक्षकांना जागतिक दर्जाचा हॉरर अनुभव देण्याचा आमचा प्रयत्न यापुढेही सुरू राहील. प्रेक्षकांच्या विश्वासामुळेच आम्ही आणखी मोठ्या कथा आणि सिनेमॅटिक युनिव्हर्स विस्तारण्याचं धाडस करू शकतो.” विदर्भातून येऊन मराठी चित्रपटसृष्टीत स्वतःचा ठसा उमटवणारे प्रीतम एस. के. पाटील हे आज नव्या पिढीतील आश्वासक दिग्दर्शक म्हणून ओळखले जात आहेत. सलग दोन यशस्वी हॉररपटांनंतर त्यांच्याकडून आता प्रेक्षकांच्या अपेक्षा आणखी वाढल्या आहेत. मराठी हॉररला नवी दिशा देण्याची क्षमता असलेला हा युवा दिग्दर्शक आगामी काळात आणखी मोठे आणि वेगळे प्रयोग करेल, अशी आशा चाहत्यांना आहे.

Web Title: Young director from vidarbha emerges as the new face of marathi horror

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 21, 2026 | 04:35 PM

Topics:  

  • horror story
  • marathi cinema

संबंधित बातम्या

Nimish Kulkarni: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नंतर निमिष कुलकर्णीची नवी झेप; ‘द्विधा’ चित्रपटातून भेटणार प्रेक्षकांच्या भेटीला
1

Nimish Kulkarni: ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नंतर निमिष कुलकर्णीची नवी झेप; ‘द्विधा’ चित्रपटातून भेटणार प्रेक्षकांच्या भेटीला

Bhootam Bhayam Movie : आता बहरणार प्रेमपुष्प! आली आली ‘सरोजिनी’, GenZ साठी स्पेशल लव्ह सॉंग
2

Bhootam Bhayam Movie : आता बहरणार प्रेमपुष्प! आली आली ‘सरोजिनी’, GenZ साठी स्पेशल लव्ह सॉंग

Types of Ghost : महाराष्ट्राच्या गावागावात आजही असतो सावट! भुतांमध्येही असतात जाती, ‘या’ प्रेतांचा प्रकार भरपूर भयांकर
3

Types of Ghost : महाराष्ट्राच्या गावागावात आजही असतो सावट! भुतांमध्येही असतात जाती, ‘या’ प्रेतांचा प्रकार भरपूर भयांकर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.