( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)
दिल्लीच्या जंतर मंतरवर कॉकरोच जनता पक्षाचे आंदोलन सुरूच आहे. २० जुलै रोजी, सीजेपीने देशभरातील विद्यार्थ्यांसोबत संसदेवर मोर्चा काढला. नीट पेपरफुटीचा निषेध करण्यासाठी आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पक्ष आणि विविध विद्यार्थी संघटनांचे हजारो आंदोलक संसदेवर मोर्चा घेऊन गेले. 20 जुलै रोजी सोमवारी दिल्लीत मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी आणि इतर नागरिकांनीसुद्धा हजेरी लावत या आंदोलनला पाठिंबा दिला मात्र काल दिल्ली पोलिसांकडून यादरम्यान आंदोलनकरत्यांवर लाठी चार्ज करण्यात आला. सीजेपीच्या आंदोलनाला अनेक बॉलिवूड कलाकारांकडून पाठिंबा मिळाला, परंतु बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौतने (Kangana Ranaut) याला गुंडगिरी संबोधून त्याचा निषेध केला.
पावसाळी अधिवेशनादरम्यानकंगना रणौतने सरन्यायाधीशांच्या आंदोलनाबद्दल उघडपणे भाष्य केले. ती म्हणाली की, जेव्हा आंदोलक संसदेबाहेर आले, तेव्हा सर्व खासदार आत होते. आंदोलक आपल्यावर हल्ला करतील या भीतीने ते खूप घाबरले होते, असे अभिनेत्रीने सांगितले. मात्र, दिल्ली पोलिसांनी कोणालाही इजा होणार नाही याची काळजी घेतली.
बैठकीत काय झाले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी काय म्हणाले, असे कंगनाला विचारले असता, कंगनाने उत्तर दिले, “पंतप्रधानांनी आम्हाला मार्गदर्शन केले. आम्हाला तरुण आणि त्यांच्या आकांक्षांबाबत अनेक सूचना मिळाल्या. पंतप्रधानांनी नीट (NEET) आणि भ्रष्टाचाराबाबतच्या त्यांच्या रणनीतीवरही सविस्तरपणे सांगितले.”
आंदोलनादरम्यान झालेल्या गोंधळाबद्दल, ज्यात तरुण आणि पोलीस जखमी झाले होते, कंगनाला पुढे विचारण्यात आले की तिला याबद्दल काय म्हणायचे आहे. कंगनाने उत्तर दिले, “संसदेतील प्रत्येकजण खूप घाबरला होता आणि दरवाजे बंद होते. आम्ही हलू शकत नव्हतो. ज्या प्रकारे जमावाने हल्ला केला, ते आमच्यावरही हल्ला करतील या भीतीने आम्ही क्षणभर घाबरलो होतो. पण मी दिल्ली पोलिसांचे कौतुक करते, ज्या प्रकारे ते आमच्यामध्ये ढाल बनून उभे राहिले, दगडफेक आणि जखमा सहन केल्या आणि आम्हाला कोणत्याही धोक्यापासून सुरक्षित ठेवले.”
#WATCH | Delhi | On the CJP protest outside Parliament yesterday, BJP MP Kangana Ranaut says, “All parliamentarians were inside the Parliament. We all were scared, thinking that the mob might attack us. I appreciate Delhi Police for playing the role of a shield, not letting… pic.twitter.com/Oop3B29PKw — ANI (@ANI) July 21, 2026
नीट वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांप्रकरणी सीजेपी गेल्या अनेक दिवसांपासून जंतर मंतरवर आंदोलन करत आहे. सोमवारी दिल्लीतील जंतर मंतरवर हजारो आंदोलक जमले होते. त्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी त्यांनी संसदेच्या दिशेने मोर्चा काढला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्या फेकल्या, ज्यात अनेक आंदोलक आणि पोलीस अधिकारी जखमी झाले. दरम्यान, सीजेपीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी म्हटले आहे की, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा देईपर्यंत जंतर मंतरवरील आंदोलन सुरूच राहील.
CJP Protest: मुलांना घेऊन जंतर-मंतर आंदोलनात पोहोचली ‘ही’ मराठी अभिनेत्री; व्हिडिओने वेधलं लक्ष






