Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

असुरी शक्तींविरुद्ध संघर्षाची कथा, ‘आई तुळजाभवानी’मध्ये मांढरदेवी महात्म्याच्या नव्या दैदीप्यमान दैवी पर्वाचा होणार आरंभ!

एका बाजूला असुरी शक्तींचा कहर, तर दुसऱ्या बाजूला एका सामान्य स्त्रीची अढळ श्रद्धा या संघर्षातून उलगडणार आहे एक दिव्य चमत्कार, जिथे भक्तीच देवत्वाला आव्हान देते. तेव्हा या पर्वात काय घडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 10, 2026 | 03:50 PM
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

कलर्स मराठीवरील Aai Tuljabhavani या मालिकेत लवकरच “मांढरदेवी महात्म्य” या नव्या दैवी पर्वाचा भव्य प्रारंभ होणार आहे. या नव्या अध्यायात भक्ती, श्रद्धा आणि शक्तीची अद्भुत कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. श्रद्धा, शक्ती आणि अवताराची अद्भुत गाथा. एका बाजूला असुरी शक्तींचा कहर, तर दुसऱ्या बाजूला एका सामान्य स्त्रीची अढळ श्रद्धा या संघर्षातून उलगडणार आहे एक दिव्य चमत्कार, जिथे भक्तीच देवत्वाला आव्हान देते.

असुरी शक्तींनी वेढलेल्या, काळ्या धुरात हरवलेल्या एका गावात जिथे कुठलीही हाक देवांपर्यंत पोहोचत नाही तिथे उभी आहे ऋषीपत्नी मांडाबाई. जखमी, कष्टी, पण अजूनही न डगमगलेली… लाख्यासुराच्या अत्याचारांनी गाव उद्ध्वस्त झालंय, लोकांनी आशा सोडली आहे; पण ती मात्र स्वतःच्या भीतीशी आणि नियतीशी लढत खंबीरपणे उभी आहे. दूरवर आई तुळजाभवानीला या संकटाची जाणीव होते, मात्र लाख्यासुराच्या असुरी तंत्रामुळे तिच्याही शक्तींना मानवी रूपात मर्यादा आल्या आहेत. एक धाडसी निर्णय घेत मांडाबाई निघते दुर्गम डोंगराच्या दिशेने जिथून तिची साद देवीपर्यंत पोहोचू शकते. हा प्रवास केवळ डोंगर चढण्याचा नाही, तर श्रद्धा, धैर्य आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याचा आहे. तिच्या एका आर्त हाकेने तुळजाभवानीच्या अंतरंगातील शक्ती जागृत होते.आदिशक्तीचा अंश जागृत होतो. तुळजाभवानीच्या करकमलातून निघालेलं तेज मांडाबाईमध्ये सामावतं आणि एका सामान्य स्त्रीचं रूपांतर होतं एका प्रचंड शक्तिशाली देवी शक्तीत होते. भक्ती आणि शक्ती यांच्यातली सीमा धूसर होत असताना, एक नवा अवतार अधर्माच्या अंतासाठी सज्ज होतो.

Arjun Kapoor Post: अर्जुन कपूरला नेमकं झालं तरी काय? अभिनेत्याची ‘ती’ पोस्ट व्हायरल, चाहत्यांची वाढली चिंता

या कथेत मांढरदेवी आणि तुळजाभवानी यांच्या दैवी शक्तींची साथ असुरी शक्तींविरुद्ध कशी उभी राहते, हे दाखवले जाणार आहे. या संघर्षातून एक रोमहर्षक कथा उलगडेल.मांडाबाईच्या मजबूत श्रद्धा आणि धैर्यावर आधारित ही गोष्ट प्रेक्षकांना खूप भावणारी आणि प्रेरणादायी ठरणार आहे. श्रद्धा, शक्ती आणि दैवी चमत्कार यांचा सुंदर संगम या पर्वात पाहायला मिळेल.

Dhurandhar 2 Box Office Collecion: 22व्या दिवशी ‘धुरंधर 2’ची गती मंदावली, 2000 कोटींचा क्लब गाठणं अवघड?

Aai Tuljabhavani ही एक मराठी पौराणिक मालिका आहे जी देवी तुळजाभवानी यांच्या भक्ती, शक्ती आणि चमत्कारांवर आधारित कथा दाखवते.या मालिकेत श्रद्धा, धर्म आणि अधर्म यांच्यातील संघर्ष दाखवला जातो. एका बाजूला असुरी शक्ती आणि अंधकार आहे, तर दुसऱ्या बाजूला देवीची शक्ती आणि भक्तांची अढळ श्रद्धा दाखवली जाते.मालिकेची कथा प्रामुख्याने देवीच्या चमत्कारांभोवती फिरते आणि भक्तांच्या जीवनात देवी कशी संकटातून मार्ग काढते हे दाखवले जाते. त्यामुळे ही मालिका भावनिक, आध्यात्मिक आणि पौराणिक स्वरूपाची आहे.

Web Title: A new divine chapter titled mandhardevi mahatmya is set to begin soon in the aai tuljabhavani which airs on colors marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 10, 2026 | 03:50 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi serial news
  • marathi serial update

संबंधित बातम्या

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “लाज कशी वाटत नाही?”, कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर नेटकऱ्यांचा संताप; नेमकं काय घडलं?
1

Kriti Sanon Raksha Bandhan Ad: “लाज कशी वाटत नाही?”, कृती सेननच्या रक्षाबंधन जाहिरातीवर नेटकऱ्यांचा संताप; नेमकं काय घडलं?

Mirzapur The Movie: पुणेकरांनो, सज्ज व्हा! प्रमोशनसाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम येणार चाहत्यांच्या भेटीला; साधणार खास संवाद
2

Mirzapur The Movie: पुणेकरांनो, सज्ज व्हा! प्रमोशनसाठी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची टीम येणार चाहत्यांच्या भेटीला; साधणार खास संवाद

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका
3

Tarini Serial: ‘तारिणी’ने रचला नवा इतिहास! अटारी-वाघा बॉर्डरवर शूटिंग करणारी ठरली पहिली मराठी मालिका

Mahakali Teaser: ‘महाकाली’चा टीझर रिलीज; अक्षय खन्नाच्या खतरनाक लूकने उडवली चाहत्यांची झोप, रिलीज डेटही जाहीर
4

Mahakali Teaser: ‘महाकाली’चा टीझर रिलीज; अक्षय खन्नाच्या खतरनाक लूकने उडवली चाहत्यांची झोप, रिलीज डेटही जाहीर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.