Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Marathi Serial : पहिल्या पावसात रंगणार केदार-तारिणीचा रोमँटिक क्षण, शिवानी सोनारने सांगितला शूटिंगचा खास किस्सा

'तारिणी' मालिकेत केदार-तारिणीच्या प्रेमकथेला पहिल्या पावसाची रोमँटिक साथ मिळणार आहे. अभिनेत्री शिवानी सोनारने पहिल्यांदाच पावसात सीन शूट केल्याचा खास अनुभव शेअर केला.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 10, 2026 | 02:22 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

‘तारिणी’ मालिकेत केदार आणि तारिणीच्या नात्याने आता एका नव्या टप्प्यात प्रवेश केला आहे. केदारने मनापासून प्रेमाची कबुली देत तारिणीला प्रपोज केल्यानंतर त्यांच्या नात्यातील गोडवा अधिक खुलला आहे. पहिली वटपौर्णिमा साजरी केल्यानंतर आता ऋतूतील पहिल्या पावसाच्या सरींमध्ये हे दोघे रोमँटिक क्षण अनुभवताना दिसणार आहेत.

मालिकेच्या आगामी भागात केदार आणि तारिणी पहिल्या पावसात मनमोकळेपणाने भिजताना, एकमेकांसोबत हसत-खेळत वेळ घालवताना आणि प्रेमाच्या नव्या भावना अनुभवताना दिसतील. त्यांच्या या गोड क्षणांमुळे प्रेक्षकांनाही त्यांच्या प्रेमप्रवासाचा आणखी एक सुंदर टप्पा पाहायला मिळणार आहे.

या विशेष रेन सीनबद्दल बोलताना तारिणीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शिवानी सोनार म्हणाली, “माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मी पावसात भिजत असा सीन शूट केला. त्यामुळे हा अनुभव माझ्यासाठी खूप खास होता. माझा वाढदिवसही पावसाळ्यातच असल्याने पावसाशी माझं एक वेगळंच नातं आहे. मात्र इतकं मनसोक्त पावसात भिजण्याचा अनुभव बऱ्याच दिवसांनी मिळाला आणि तोही या सीनमुळे.”

Bhootam Bhayyam Movie: ‘भूतम भयम्’मधील ‘जठाई’चा पहिला लूक प्रदर्शित; पोस्टरमध्ये लपली आहे मराठीतील लोकप्रिय अभिनेत्री; ओळखलंत का?

ती पुढे म्हणाली, “या सीनमध्ये आमच्यासोबत लहान मुलंही होती. केदार आणि तारिणीच्या प्रेमकथेची नुकतीच सुरुवात झाली असून, त्यांच्या नात्याला प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळत आहे. त्यामुळे असे रोमँटिक प्रसंग साकारताना आणखी मजा येते. जवळपास तीन तास आम्ही सतत कृत्रिम पावसात शूटिंग केलं. आम्ही कलाकारांनी तर हा अनुभव मनापासून एन्जॉय केला, पण आमचे तंत्रज्ञ, दिग्दर्शन टीम आणि इतर क्रू सदस्यांनी रेनकोट घालून प्रचंड मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीमुळेच हा प्रसंग इतका सुंदर साकारता आला. शूटिंगदरम्यान रस्त्यावरून जाणारे लोकही थांबून चित्रीकरण पाहत होते. आता हा एपिसोड प्रेक्षकांनाही तितकाच आवडेल, अशी मला खात्री आहे.”

केदार आणि तारिणीच्या प्रेमकथेतील हा रोमँटिक पावसाळी प्रसंग प्रेक्षकांसाठी खास ठरणार असून, त्यांच्या नात्यातील वाढता गोडवा मालिकेला आणखी रंगतदार बनवणार आहे.

 

Aamchya Ladkya Naik Bai Serial: ऐश्वर्या नारकर यांच्या नव्या मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षक भडकले; ‘आई कुठे काय करते’शी केली तुलना

Web Title: Kedar and tarinis romance blossoms in the seasons first rain shivani sonar shares a special behind the scenes story

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 10, 2026 | 02:22 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial
  • tv serial

संबंधित बातम्या

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत
1

Mohini Serial: ‘मोहिनी’मध्ये रंगणार तलवारबाजीचा थरार; समीर परांजपे आणि अनघा ठाकूरने घेतली विशेष मेहनत

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव
2

Colors Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’चे २०० भाग पूर्ण; बर्फावर अनवाणी उभी राहिली जान्हवी तांबट, सांगितला खडतर अनुभव

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट
3

Sanai Chaughade: अखेर शरुच्या मनात प्रेमाची चाहूल! जय-रावीची ट्रिप ठरली कारण? मॅकसमोर शरुने दिली प्रेमाची हिंट

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला
4

Marathi TV Serial: ‘दीपज्योती’, ‘कमळी’ आणि ‘तारिणी’मध्ये मोठे ट्विस्ट; या आठवड्यात काय घडणार? प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.