Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’मध्ये बालगणेशाचं आगमन; AI-VFXच्या कमाल तंत्रज्ञानाने साकारला गजमुख

Aai Tulja Bhavani Serial: ‘आई तुळजाभवानी’ मालिकेच्या गणेश आगमनाच्या प्रोमोची चर्चा; AI-VFX तंत्रज्ञानाच्या मदतीने साकारलेलं गजमुख आणि सोंडेने मोदक ग्रहण करण्याचा प्रसंग ठरला खास आकर्षण.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 17, 2026 | 12:30 PM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Aai Tulja Bhavani Serial: कलर्स मराठीवरील लोकप्रिय मालिका ‘आई तुळजाभवानी’ सध्या गणेश आगमनाच्या खास प्रोमोमुळे चर्चेत आली आहे. या प्रोमोमध्ये साकारण्यात आलेलं गजमुख प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधून घेत आहे. गणेशाची हलणारी सोंड आणि सोंडेच्या सहाय्याने मोदक ग्रहण करण्याचा प्रसंग अतिशय प्रभावीपणे साकारण्यात आला असून, या दृश्यामागील AI आणि VFX तंत्रज्ञानाची कमाल पाहायला मिळत आहे.

मालिकेच्या आगामी कथानकात तुळजापुरात बालगणेशाचं खट्याळ आणि गोड आगमन होणार आहे. त्यामुळे गणेशाच्या या आगमनासोबत मालिकेत पुढे कोणत्या रंजक घडामोडी घडणार, याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे.

AI आणि VFX तंत्रज्ञानाचा वेगळा प्रयोग

‘आई तुळजाभवानी’ ही मालिका सुरुवातीपासूनच VFX आणि AI तंत्रज्ञानाच्या वेगळ्या प्रयोगांसाठी ओळखली जाते. AIच्या माध्यमातून व्यक्तिरेखा साकारण्यापासून ते प्रत्यक्ष कलाकार आणि AI व्यक्तिरेखांमध्ये संवाद घडवून आणण्यापर्यंत विविध तांत्रिक प्रयोग मालिकेत करण्यात आले आहेत.

पौराणिक आणि दैवी प्रसंग अधिक प्रभावीपणे साकारण्यासाठीही मालिकेत AIचा वापर करण्यात आला आहे. आता गणेश आगमनाच्या निमित्ताने तयार करण्यात आलेल्या गजमुखामुळे या तांत्रिक प्रयोगात आणखी एका नव्या अध्यायाची भर पडली आहे.

गजमुख साकारण्यासाठी बारकाईने काम

गजमुखाची रचना, त्याच्या चेहऱ्यावरील भाव आणि विशेषतः सोंडेच्या हालचाली नैसर्गिक वाटाव्यात, यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्यात आलं. AIच्या माध्यमातून विविध रूपं तयार करून त्यातील योग्य रूपाची निवड करण्यात आली आणि त्यानंतर VFXच्या माध्यमातून त्याला जिवंतपणा देण्यात आला.

विशेष म्हणजे गणेशाने सोंडेच्या सहाय्याने मोदक ग्रहण करण्याचा प्रसंग नैसर्गिक आणि विश्वासार्ह दिसावा, यासाठी विशेष मेहनत घेण्यात आली आहे. त्यामुळे हा प्रसंग मालिकेच्या प्रोमोमधील खास आकर्षण ठरत आहे.

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका

‘ही केवळ व्यावसायिक काम नाही, तर श्रद्धेचा विषय’

मालिकेचे VFX दिग्दर्शक प्रदीप भगत यांनी या प्रयोगाबद्दल सांगितलं की, ‘आई तुळजाभवानी’ ही त्यांच्या कुलदैवतावर आधारित मालिका असल्याने हा प्रकल्प केवळ व्यावसायिक काम नसून श्रद्धा आणि भक्तीचा विषय आहे. VFX आणि AI तंत्रज्ञानाच्या माध्यमातून देवीचं तेज, दैवी स्वरूप आणि कथांचा प्रभावी अनुभव प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असल्याचं त्यांनी नमूद केलं.

गणेश आगमनाचा प्रसंगही विशेष असल्याचं सांगत त्यांनी गजमुखाचं रूप जिवंत, लोभस आणि नैसर्गिक वाटावं यासाठी त्याच्या रचनेपासून सोंडेच्या हालचालींपर्यंत प्रत्येक तपशीलावर काम केल्याचं सांगितलं.

फ्लेमिंगोज VFXची तांत्रिक जबाबदारी

मालिकेच्या VFXचं दिग्दर्शन फ्लेमिंगोज VFX या निर्मिती संस्थेकडून करण्यात येत आहे. या संस्थेने यापूर्वी ‘विक्रम वेधा’, ‘राधा रमण’ यांसारख्या चित्रपटांसोबतच ‘असुर’, ‘फर्जी’, ‘ताज’, ‘सिटाडेल’ आणि ‘गन्स अँड गुलाब्स’ यांसारख्या वेबसीरिजसाठी VFXचं काम केलं आहे. ‘स्वराज’, ‘इमली’, ‘नजर’, ‘जादू है जिन्न का’ आणि ‘विद्रोही’ यांसारख्या हिंदी मालिकांमध्येही संस्थेने काम केलं आहे. मराठीतील ‘आई तुळजाभवानी’ ही त्यांची पहिली मालिका आहे.

दरम्यान, पहिल्या भागापासून आतापर्यंत ६८०हून अधिक भागांचा टप्पा गाठलेल्या ‘आई तुळजाभवानी’मध्ये VFX आणि AI तंत्रज्ञानाचा सातत्याने वापर करण्यात आला आहे. आता बालगणेशाच्या आगमनामुळे मालिकेतील आगामी भाग आणखी रंजक होण्याची शक्यता आहे.

CBFC New Board: तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूडसह ‘या’ मराठी चेहऱ्यांना मिळालं स्थान!

Web Title: Aai tulja bhavani serial ganesh promo ai vfx gajmukh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 17, 2026 | 12:30 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Ganesh Chaturthi 2026
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Ganesh Story: श्रीगणेशांना एकदंत नाव कसे मिळाले? जाणून घ्या परशुराम आणि गणपतीच्या युद्धाची कथा
1

Ganesh Story: श्रीगणेशांना एकदंत नाव कसे मिळाले? जाणून घ्या परशुराम आणि गणपतीच्या युद्धाची कथा

Hanuman Ansh Box Office Collection: ‘हनुमान अंश’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; 2 कोटींच्या बजेटमध्ये वर्ल्डवाइड 300 कोटींची कमाई
2

Hanuman Ansh Box Office Collection: ‘हनुमान अंश’ने बॉक्स ऑफिसवर रचला इतिहास; 2 कोटींच्या बजेटमध्ये वर्ल्डवाइड 300 कोटींची कमाई

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका
3

Devghar On Rent Marathi Movie: ‘देवघर ऑन रेंट’चा थरारक ट्रेलर रिलीज; अध्यात्म, रहस्य आणि ॲक्शनचा जबरदस्त तडका

CBFC New Board: तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूडसह ‘या’ मराठी चेहऱ्यांना मिळालं स्थान!
4

CBFC New Board: तब्बल ७ वर्षांनंतर सेन्सॉर बोर्डाची नवी कार्यकारिणी जाहीर; बॉलिवूडसह ‘या’ मराठी चेहऱ्यांना मिळालं स्थान!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.