Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: ‘RK म्हणजे हिरोपासून माणूस होण्याच्या प्रवासाची गोष्ट’, सांगतोय सर्वांचा लाडका समीर परांजपे

कलर्स मराठीवरील मोहिनी ही मालिका प्रेक्षकांच्या मनाची चांगलीच पकड घेत आहे आणि पहिल्यांदाच एका वेगळ्या भूमिकेत अभिनेता समीर परांजपे प्रेक्षकांच्या समोर आला आहे. या भूमिकेबाबत त्याने मनसोक्त गप्पा मारल्या

  • By दिपाली नाफडे
Updated On: Apr 30, 2026 | 04:22 PM
समीर परांजपेने मारल्या आरकेच्या भूमिकेविषयी मनसोक्त गप्पा

समीर परांजपेने मारल्या आरकेच्या भूमिकेविषयी मनसोक्त गप्पा

Follow Us
Close
Follow Us:

कलर्स मराठीवरील ‘मोहिनी’ ही मालिका आणि प्रेक्षकांच्या मनावर चांगलीच रुजायला लागली आहे आणि यातील प्रमुख भूमिका RK ही साकारणारा अभिनेता समीर परांजपे एका वेगळ्याच अंदाजात पहायला मिळत आहे. समीरने यापूर्वी खूपच वेगवेगळ्या भूमिका केल्या आहेत आणि आता या भूमिकेमध्येही त्याचा अभिनय अगदी चपखल बसल्याचे दिसून येत आहे. यामध्ये भूमिका साकारत असणारा समीर अनेकांना कदाचित राग येण्यासारखा सुरूवातीला वाटू शकतो पण तितकाच हळवा मुलगादेखील त्याच्या या भूमिकेतून दिसून येत आहे आणि त्याच्या भूमिकेचे हे वेगवेगळे कंगोरे प्रेक्षकांसमोर येत आहेत आणि याबाबतच त्याने नवराष्ट्रशी खास बातचीत केली आहे आणि मनमोकळेपणाने व्यक्त झालाय. 

आधीच्या भूमिकेपेक्षा ही खूप वेगळी भूमिका आहे तर कशी तयारी केलीस आणि काही वेगळ्या गोष्टी शिकलास का? या पहिल्याच प्रश्नावर समीर म्हणाला की, ‘RK च्या भूमिकेसाठी एक वेगळा Attitude असायला पाहिजे होता. कदाचित ही भूमिका माणूस म्हणून काही जणांना चुकीची वाटू शकते. पण प्रत्येक परिस्थितीनुसार माणूस घडत असतो आणि आरकेदेखील तसाच आहे. ही भूमिका कुठेही उपरी वाटायला नको हे डोक्यात चपखल बसलं होतं आणि मराठीतील स्टारडम हे हिंदीतील स्टारडमपेक्षा वेगळं आहे ते दाखविण्यासाठी थोडा अभ्यास करायची गरज होती आणि ते कुठेही आव आणल्यासारखं वाटू नये यासाठी नक्कीच प्रयत्न करतोय. RK ची स्टाईल, त्याचं वागणं-बोलणं हे माझ्या स्वतःच्या अभ्यासातून प्रेक्षकांपर्यंत पोहचलेलं असावं यासाठी आणि दिसण्यासाठी एक वेगळा प्रयत्न नक्की केलाय’

यामध्ये तुझी पोतराजाची भूमिका फारच भावली तर त्यावेळी सीन करताना काय आव्हान होतं? यावर समीरने उत्तर देताना अक्षरशः सीनच डोळ्यासमोर उभा केला, तो म्हणाला की, ‘पोतराजाचा सीन खूपच सुंदर होता आणि आईसाठी भावना दाखवणं गरजेचं होतं. सगळे मार्ग बंद झाल्यावर एक मुलगा एका शक्तीचा धावा करतोय हे नक्कीच आव्हानात्मक होतं, त्याहीपेक्षा पोतराजाचा एक विशिष्ट आवाज हा खूपच अंगावर काटा आणणारा होता. पण त्यासाठी खऱ्या पोतराजाकडून टेक्निक शिकून घेतलं. पण संगीताशी माझा चांगला कनेक्ट असल्याने हा सीन एका लयबद्ध पद्धतीने करता आला. पण अशा पद्धतीने पोतराजाचा सीन मी करू शकेन याचा मी कधी विचारही केला नव्हता’

Exclusive: ‘मोहिनी’ मधील महेंद्र आणि माझ्या स्वभावात खूपच साम्य, भूमिका करणं सोपं झालं – शंतनू मोघे

स्टारडम असणाऱ्या हिरोची भूमिका साकारताना काय डाएट फॉलो करतो आहेस? यावर समीर हसत म्हणाला, ‘खरं सांगू का? मला एक तर बाहेरचं वा फास्ट फूड खायला आवडत नाही आणि माझ्या अंगाची चणच अशी आहे की, जास्त काही वेगळं हार्डकोअर डाएट मला करावं लागत नाही. मी कधीच क्रॅश डाएट वगैरे करत नाही. दूध, तूप, भाकरी हे माझं नेहमीचं जेवण आहे आणि मी तेच फॉलो करतो. फास्ट फूडच खात नसल्यामुळे चीट डे चा प्रश्न येत नाही. त्यामुळे माझ्या शरीराचा पोत मला साथ देतो असं मी म्हणेन’

ही मालिका मधुबाला या हिंदी मालिकेचा रिमेक आहे तर तू विवियनची भूमिका पाहिली होतीस का? असं विचारल्यावर समीर पटकन म्हणाला की, ‘मी मधुबाला ही मालिका अजिबात पाहिली नाही कारण एकतर कोणाचीही कॉपी प्रेक्षकांना वाटायला नको आणि ते बघून मी पुढची भूमिका करायला हवी असं मला वाटत नाही. जे स्क्रिप्ट आलं तेच माझ्यासाठी अभ्यासाचं पुस्तक आहे. दिग्दर्शकासह योग्य चर्चा करून पडद्यावर तो सीन परफेक्ट यायला हवा या मताचा मी आहे. भूमिकेची कॉपी असण्यापेक्षा स्वतःचा ठसा उमटवणं मला अधिक चांगलं वाटतंय आणि म्हणूनच मी मालिका बघेन असंही नाही’

या भूमिकेसाठी प्रेक्षकांचा प्रतिसाद कसा येतोय तुला? यावर समीर अगदी मनापासून म्हणाला की, ‘मला खरंच खूप छान प्रतिसाद मिळतो आहे. प्रेक्षकांना आरके आणि या मालिकेची कथा आवडत आहे हे पाहून खूप बरं वाटतंय आणि मुळात आरके हा हिरोपासून माणूस होण्यापर्यंतचा प्रवास आहे आणि तोच यातून उलगडणार आहे, जो हळूहळू प्रेक्षकांना कळेल’. समीरने अगदी मनसोक्तपणे आपल्या भूमिकेबाबत सांगितले आणि त्याची ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत असल्याचे दिसून येत आहे.

‘Mohini’मध्ये थरारक अ‍ॅक्शन ट्रॅक; अनघा ठाकूर-शांतनू मोघेची दमदार केमिस्ट्री चर्चेत

Web Title: Actor sameer paranjape shared his experience about new role in mohini serial exclusively

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 30, 2026 | 04:22 PM

Topics:  

  • colors marathi
  • marathi serial update
  • New Marathi Serial

संबंधित बातम्या

गौरी इंगवलेची TV क्षेत्रात दमदार Entry! प्राजक्ता गायकवाडसह ‘या’ मालिकेत झळकणार अभिनेत्री
1

गौरी इंगवलेची TV क्षेत्रात दमदार Entry! प्राजक्ता गायकवाडसह ‘या’ मालिकेत झळकणार अभिनेत्री

Exclusive: ‘आई तुळजाभवानी’च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत – पूजा काळे
2

Exclusive: ‘आई तुळजाभवानी’च्या अलौकिक विवाहाचा हा अनुभव खूपच अद्भुत – पूजा काळे

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’ वेगळ्याच वळणावर, छवीसमोर उभं ठाकणार ‘शांभवी’ नावाचं मोठं आव्हान!
3

Marathi Serial: ‘मी जिंकून घेईन सारं’ वेगळ्याच वळणावर, छवीसमोर उभं ठाकणार ‘शांभवी’ नावाचं मोठं आव्हान!

दीपची ‘सुलू आत्या’, फसवणूक सहन न करणारी स्वाभिमानी सुलोचना; सुहास परांजपे यांनी उलगडले भूमिकेचे पैलू
4

दीपची ‘सुलू आत्या’, फसवणूक सहन न करणारी स्वाभिमानी सुलोचना; सुहास परांजपे यांनी उलगडले भूमिकेचे पैलू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.