Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

५ वर्षांनंतर मालिकेत पुनरागमन; शर्वरीच्या उर्जेशील स्वभावासाठी अभिनेत्री चिन्मयी साळवी ने केली ‘ही’ खास तयारी!

अभिनेत्री चिन्मयी साळवी सनई चौघडे या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेतील पात्रासाठी तिने काय काय तयारी केली आहे हे जाणून घेऊया..

  • By अमृता यादव
Updated On: Mar 16, 2026 | 03:16 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

अभिनेत्री चिन्मयी साळवी ५ वर्षांनंतर मालिका विश्वात पुनरागमन करत आहे. ‘सनई चौघडे’ मालिकेतून अभिनेत्री चिन्मयी साळवी एका नवीन भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत ती ‘शर्वरी परब’ ची भूमिका साकारणार असून ही तिची व्यक्तिरेखा एकदम बेधडक आणि बिनधास्त आहे. या भूमिकेबद्दल, ऑडिशन प्रक्रियेबद्दल, तयारी, सहकलाकार आणि त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल चिन्मयीने मनमोकळ्या गप्पा मारल्या.

शर्वरी प्रमिला सुभाष परब ही एक प्रचंड निर्मळ, आनंदी आणि स्वच्छंद मुलगी आहे. ती आपल्या कुटुंबाशी खूप जुळलेली आहे आणि जे काही घडते, त्यावर ती आपले स्पष्ट मत मांडते. तिला पाठीमागून बोलणे अजिबात आवडत नाही; काही बरोबर किंवा चुकीचे असल्यास ती नेहमी स्वतःच्या शब्दांत सांगते.शर्वरीच्या कुटुंबात सर्व सदस्य समाधानी आहेत. ते स्वामीभक्त आहेत आणि स्वामींच्या कृपेने मिळालेल्या गोष्टींमध्ये त्यांना आनंद आहे. कुटुंबातील प्रत्येक जण आपल्या आयुष्यात खुश आहे.शर्वरी ही ग्रॅज्युएट आहे आणि एम.डी.मध्ये रोजची क्वीन आहे, म्हणजे तिचा स्वतःचा खास स्वॅग आहे. ती सध्या नोकरी शोधत आहे. पण नोकरी मिळेपर्यंत ती आपल्या आई पमालाच्या टिफिन व्यवसायात मदत करते. ती तिच्या स्कूटी ‘बेबो’ वरून टिफिन डिलिव्हरी करते, आणि बेबो शर्वरीच्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे.तिचे वडील कंडक्टर आहेत, त्यामुळे शर्वरीला मॅनेजमेंट आणि व्यवहाराची चांगली समज आहे. ती नेहमी प्रयत्न करते की आपल्या कौशल्यांचा उपयोग करून आई-बाबांना आणि कुटुंबाला मदत करावी.

शर्वरी या व्यक्तिरेखेसाठी जेव्हा मला कॉल आला तेव्हा माझा आनंद गगनात मावेनासा झाला. ‘वागळे की दुनिया ‘ ही हिंदी मालिका तब्बल ५ वर्ष केल्यानंतर मला शर्वरीची भूमिकेसाठी कॉल आला. मराठी मालिकेत काम करण्याची संधी मिळाली यासाठी स्वतःला खूप भाग्यवान समजते. माझी इच्छा होती की मला मराठी मालिका करायला मिळावी, ज्यामधली माझी भूमिका प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहावी. आणि स्वामींनी माझी प्रार्थना ऐकली. मालिकेत शर्वरी आणि जय हे खूप विरुद्ध करेक्टर असणार आहेत. जेव्हा हे दोन्ही करेक्टर एकमेकांच्या समोर येतील, तेव्हा काय धुमाकूळ होणार आहे हे बघण्यासारखं असेल.

शर्वरीच्या भूमिकेसाठी अभिनेत्रीने केलेली तयारी

शर्वरीच्या भूमिकेसाठी मला फार काही वेगळे करावे लागले नाही, कारण मी आणि शर्वरी खूपशी सारखीच आहोत. मी सुद्धा मस्तीखोर, बोलकी आणि थोडीशी नौटंकी करणारी आहे. मला ड्रामा करायला आवडते, माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायला आवडते आणि त्यांच्यासाठी काहीही करायला तयार असते.जर खास तयारीची गोष्ट सांगायची झाली, तर ती म्हणजे शर्वरीच्या भूमिकेसाठी मी स्कूटी चालवायला शिकले. शर्वरी आपल्या आईला टिफिन व्यवसायात मदत करण्यासाठी स्कूटीवरून डिलिव्हरी करते, आणि मला ती भूमिका करताना सुरुवातीला थोडी भीती वाटली. पण आता मी गर्दीत सुद्धा स्कूटी चालवू शकते आणि त्याचा मला खूप आनंद आहे.पूर्वी केलेल्या मालिकांमध्ये मी १८–१९ वर्षांची मुलगी साकारली होती, पण शर्वरी ही खूप समजूतदार आणि सगळ्यांना सांभाळून घेणारी मुलगी आहे. ती ग्रॅज्युएट आहे, त्यामुळे तिची विचारसरणी वेगळी आहे आणि प्रत्येकासोबत डील करण्याची तिची स्वतःची पद्धत आहे.

‘बनावट चित्रपट बनत आहेत’, नवाजुद्दीन सिद्दीकी संतापले; मोठ्या बॉलिवूड चित्रपटांवर साधला निशाणा

प्रेक्षकांचा प्रतिसाद मला मिक्स पाहायला मिळाला. प्रेक्षकांचे शॉक आणि सरप्राईज असे दोन्ही रिऍक्शन्स मला पाहायला मिळाले. हिंदी मालिकेतून आता मी मराठी मालिकेत दिसणार, तेही इतक्या वर्षांनंतर हे त्यांच्यासाठी खूप मोठं सरप्राईज होतं. मी याआधी जी मराठी मालिका करत होते, त्याचे प्रेक्षकही या बातमीनंतर खूप आनंदी झाले. माझे हिंदी मालिकेचे फॅन्सही तितकेच उत्सुक आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की तुमच्यासाठी आम्ही तुमची भूमिका पाहण्यासाठी तुमचा मराठी कार्यक्रमही पाहायला सुरुवात करू. हे सगळं खूप छान आहे आणि मला खूप आनंद वाटत आहे. आमची को-ॲक्टर्स आणि प्रोडक्शन टीम खूप छान आहे. त्यांच्यासोबत काम करताना मला अगदी घरगुती वातावरण वाटतं. माझी सगळ्यांशी मैत्रीही झाली आहे. माझा स्वभावच असा आहे की मी एखाद्याशी बोलल्याशिवाय, बडबड केल्याशिवाय काम करू शकत नाही. एवढी फ्रेंडली मी आहे. हळूहळू काम करताना कदाचित काही कालावधीनंतर मला इथे माझी खास मैत्रीण मिळेल असं मला वाटतं.

जन्नत झुबैर आणि तिचा भाऊ संकटात; पनवेलमध्ये दोघांवर हल्ला, नेमकं घडलं तरी काय?

शूटिंगदरम्यानचा एखादा किस्सा सांगायचा तर शूटिंग चालू असताना एक किस्सा झाला होता. हॉस्पिटलचं शूटिंग चालू होतं. आम्ही हॉस्पिटलच्या खाली शूट करत होतो. मी, जय आणि मॅक. तिथे प्रोडक्शन आणि चॅनलचे सगळे लोकही होते. शूटिंगदरम्यान अचानक गर्दीतून अंदाजे पन्नास वर्षांच्या एक महिला पुढे आल्या आणि म्हणाल्या की मला चिन्मयीसोबत फोटो काढायचा आहे. माझा मुलगा सोबत आहे, तो फोटो काढेल. आमचे प्रोड्युसर राजू सरांनी त्याला परवानगी दिली. आमचे फोटो काढून झाल्यानंतर त्या महिलेने आम्हाला खूप आशीर्वाद दिले. त्या म्हणाल्या, “तुमची मालिका खूप छान चालेल. तुम्हा सगळ्यांना खूप खूप आशीर्वाद.” ते ऐकून आम्ही खूपच भारावून गेले. शूटच्या पहिल्याच दिवशी एवढा मस्त अनुभव आला. हा अनुभव मी कधीच विसरणार नाही असं मला वाटतं.

Web Title: After 5 years back on tv actress chinmayi salvi does this special preparation for sharvaris energetic character

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • marathi serial news

संबंधित बातम्या

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…
1

Ranu Mondal New Home: रानू मंडलने घेतलं स्वतःचं घर; आनंदात गायलं माधुरी-सलमानचं गाणं; व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले…

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल
2

Mallika Sherawat: ‘तुमच्या नजरेतून..’; तुकाराम मुंढेंच्या कामाचं मल्लिका शेरावतने मराठीतून केलं कौतुक, इडली खातानाचा VIDEO व्हायरल

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल
3

Jennifer Winget Wedding: जेनिफर विंगेटने गोव्यात दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; विल्यम इश्माएलसोबतचा रोमँटिक VIDEO व्हायरल

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक
4

Rohit Sharma: रोहित शर्माचा टीव्ही डेब्यू ठरला हिट; ‘फॅमिली फुल हाऊस’ पाहून प्रेक्षक खूश, शोचं केलं कौतुक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.