Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Bigg Boss Marathi 6 Winner : राखीचा राकेश बापट ठरला रनर अप! Tanvi Kolte ने मारली बाजी, बिग बॉस मराठी ६ गाजवत ठरली विजेती

Bigg Boss Marathi च्या सहाव्या पर्वाचा ग्रँड फिनाले दणक्यात पार पडला असून बिग बॉस मराठीच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला विजेती म्हणून तन्वी कोलतेने ट्रॉफीवर आपले नाव कोरले.

  • By अमृता यादव
Updated On: Apr 19, 2026 | 11:07 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • बिग बॉस मराठीची पहिली महिला विजेती
  • तन्वीला मिळाली 15 लाख रूपयांची रोख रक्कम
  • राकेश बापट ठरला रनर अप
 Bigg Boss Marathi चा ग्रँड फिनाले दणक्यात पार पडताच सीझन ६ च्या महाविजेत्याची घोषणा झाली. या पर्वात पहिल्यांदाच एका महिलेने ट्रॉफी जिंकत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. संपूर्ण सीझनभर टास्कमध्ये सातत्य, ठाम भूमिका आणि प्रेक्षकांचा प्रचंड पाठिंबा यामुळे हा विजय विशेष ठरला. घरातील संघर्ष, मैत्री, रणनीती आणि भावनिक क्षण यांचा अचूक समतोल साधत तिने शेवटपर्यंत दमदार खेळ केला आणि ही विजेती दुसरी तिसरी कोणी नसून तन्वी कोलते आहे.

शंभर दिवसांचा हा रोमांचक प्रवास अखेर महाअंतिम सोहळ्यात संपन्न झाला. सदस्यांसह संपूर्ण महाराष्ट्राला विजेता कोण ठरणार याची उत्सुकता लागली होती. अंतिम क्षणापर्यंत रंगलेल्या या स्पर्धेनंतर तन्वी कोलते हिने आपल्या सातत्यपूर्ण आणि प्रभावी खेळाच्या जोरावर ‘महाविजेती’चा किताब पटकावला आहे.

बिग बॉस मराठी सिझन ६ ची सुरुवात तीन महिन्यांपूर्वी Colors Marathi वर झाली होती. अल्पावधीतच हा शो महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचला आणि सर्वत्र चर्चेचा विषय ठरला. या सिझनमध्ये स्पर्धकांनी तब्बल १०० दिवस कॅमेऱ्यांच्या नजरकैदेत राहून विविध टास्क, वाद-विवाद, मैत्री, भावनिक चढ-उतार आणि नात्यांचे बदलते रंग अनुभवले.

तन्वीला मिळाली 15 लाख रूपयांची रोख रक्कम

विजेतेपद म्हणून तन्वीला १५ लाख रुपयांची रोख रक्कम आणि ट्रॉफी प्रदान करण्यात आली. याशिवाय P. N. Gadgil & Sons कडून १० लाख रुपयांचे वाउचर, Reva Diamonds च्या सर्टिफाईड नॅचरल डायमंड ज्वेलरीसाठी विशेष गिफ्ट, तसेच Tunwal E-Motors ची Lithino Pro ही ई-बाईक देण्यात आली.

अभिनेता Riteish Deshmukh आणि ‘राज शिवाजी’ चित्रपटाच्या टीमकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुंदर फोटोही विजेत्याला भेट देण्यात आला. या ऐतिहासिक विजयामुळे बिग बॉस मराठीच्या इतिहासात नवा अध्याय लिहिला गेला असून, तन्वी कोलतेवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

या घराने गेल्या १०० दिवसांत प्रत्येक भावनेचा साक्षीदार होत अनेक रंग दाखवले कधी मैत्रीची घट्ट नाती जुळताना पाहिली, तर कधी त्याच नात्यांमध्ये कटुता येताना अनुभवली. सदस्यांचे रडणं–हसणं, तक्रारी, मतभेद आणि स्पर्धेची धग यामुळे प्रत्येक दिवस नवा वाटत गेला. कॅमेरांच्या नजरकैदेत प्रत्येकाचा खरा चेहरा प्रेक्षकांसमोर आला. या सगळ्या प्रवासात तन्वीने आपल्या रोखटोक बोलण्याने, जिद्दीने आणि ठाम मताने स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आणि प्रेक्षकांचा विश्वास जिंकला.

Executive Vice President, Marathi Cluster‘ Jiostar, सतीश राजवाडे म्हणाले, “बिग बॉस मराठी सिझन ६’ अनोख्या थीमसह सुरू झाला आणि सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवले. या सिझनमध्ये सदस्यांसाठी दार उघडलं आणि नशिबाचा खेळही पालटला एका मागून एक सरप्राइजेस, अनपेक्षित ट्विस्ट्स, नात्यांचे बदलते रंग आणि प्रत्येक क्षणाला नव्या आव्हानांचा सामना करत हा १०० दिवसांचा प्रवास भावनांनी, संघर्षांनी आणि जिद्दीने परिपूर्ण ठरला. या पर्वाला महाराष्ट्राचं भरभरून प्रेम लाभलं आणि प्रत्येक स्पर्धकाने आपल्या व्यक्तिमत्त्वाची वेगळी छाप उमटवली. तन्वी कोलतेने सातत्य, प्रामाणिकपणा आणि प्रेक्षकांशी जोडलेलं नातं यांच्या जोरावर ‘महाविजेती’ हा मान पटकावला. हा शेवट नाही, तर नव्या प्रवासाची सुरुवात आहे.”

मराठी सिनेसृष्टीत अनोख्या हिरो’ची दमदार एंट्री, २२ वर्षांनी सचिन पिळगांवकर–मधुराणी गोखले पुन्हा एकत्र; चित्रपटाचे पोस्टर लॉन्च

तन्वी कोलतेने वक्त केल्या भावना

विजेती ठरल्यानंतर भावना व्यक्त करताना तन्वी कोलते म्हणाली, “हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आणि शिकवणारा ठरला. या घराने मला स्वतःला ओळखायला शिकवलं, प्रत्येक परिस्थितीत ठाम राहायला शिकवलं. प्रेक्षकांनी दिलेलं प्रेम आणि पाठिंबा हीच माझी खरी ताकद आहे. हा विजय मी माझ्या कुटुंबाला आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकाला समर्पित करते. मला सगळे घरात बोलत होते विचारत होते काय काम केलंस, काय नावं तेव्हा वाईट वाटायचे पण मी ठरवलं होतं या घरातून बाहेर पडेन तेव्हा सगळ्यांच्या तोंडी माझंच नावं असेल. बिग बॉस मराठीने माझं नाव मोठं केले आहे, आले होते तन्वी कोलते म्हणून जाते आहे तन्वी कोलते हा ब्रॅण्ड बनून”.

असं म्हणता म्हणता, भावना, जिद्द आणि मनोरंजनाचा संगम असलेला हा प्रवास एका अविस्मरणीय टप्प्यावर येऊन पूर्ण झाला. ‘बिग बॉस मराठी सिझन ६’ने पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मनात आपली वेगळी छाप उमटवत या पर्वाची दिमाखदार सांगता केली.

Mahavatar Parshuram Poster: धैर्य संपलं, आता महावतार…, ‘नरसिंहा’नंतर भगवान विष्णूच्या 6व्या अवताराची भव्य कथा मोठ्या पडद्यावर

Web Title: Bigg boss marathi 6 tanvi kolte crowned winner raqesh bapat ends as runner up

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 19, 2026 | 11:07 PM

Topics:  

  • bigg boss marathi 6
  • Raqesh Bapat
  • Tanvi Kolte

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.