Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 3 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कलेक्टर होण्याचं स्वप्न, संघर्षाची साथ, ‘कृष्णाईच्या लेकी’मध्ये ट्विंकल यादवची दमदार एन्ट्री, अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना

झी मराठीच्या ‘कृष्णाईच्या लेकी’ मालिकेत गौरीची भूमिका साकारणारी ट्विंकल यादवने निवेदिता सराफ यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव, भूमिकेची तयारी आणि मालिकेबद्दलच्या भावना व्यक्त केल्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jun 04, 2026 | 01:01 PM
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:

झी मराठीवर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या ‘कृष्णाईच्या लेकी’ या नव्या मालिकेबाबत उत्सुकता वाढत आहे. या मालिकेत अभिनेत्री ट्विंकल यादव ‘गौरी’ ही महत्त्वपूर्ण भूमिका साकारत असून, तिच्या व्यक्तिरेखेबद्दल तिने मनमोकळ्या गप्पा मारल्या आहेत.

कृष्णाईच्या तीन मुलींमधील मधली मुलगी असलेली गौरी खंबीर, आत्मविश्वासू आणि जिद्दी स्वभावाची आहे. आईवर जीवापाड प्रेम करणारी गौरी कुटुंबासाठी कोणत्याही संकटाला सामोरी जाण्यास तयार असते. आईने आयुष्यभर केलेला संघर्ष आणि त्याग तिने जवळून पाहिल्यामुळे तिचं आईशी अतूट नातं आहे. मात्र, वडिलांविषयी तिच्या मनात खोलवर रागही दडलेला आहे. या भावनिक संघर्षासोबतच गौरीचं मोठं स्वप्न म्हणजे कलेक्टर होण्याचं आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी ती सातत्याने प्रयत्न करताना दिसणार आहे.

ट्विंकल सांगते की, गौरीचं पात्र तिला सुरुवातीपासूनच स्वतःशी जोडलेलं वाटलं. तिचा स्वभाव, निरागसपणा आणि कुटुंबाविषयीची भावना या अनेक गोष्टी स्वतःसारख्या असल्यामुळे हे पात्र साकारणं तिच्यासाठी खास ठरलं. सांगली जिल्ह्यातील भिलवडी गावाशी असलेली तिची नाळही या भूमिकेशी जोडली गेली.

या भूमिकेसाठी ट्विंकलने कायदे, महिला सुरक्षा, सामाजिक प्रश्न आणि प्रशासनाशी संबंधित विषयांचा अभ्यास केला आहे. ग्रामीण पार्श्वभूमीतील गौरीची भाषा आणि बोलण्याची शैली आत्मसात करण्यासाठीही तिने विशेष मेहनत घेतली.

मालिकेच्या प्रोमोला मिळालेल्या प्रतिसादाबद्दल बोलताना ट्विंकलने सांगितलं की, लोक तिला आता ‘गौरी’ म्हणून ओळखू लागले आहेत. हा अनुभव तिच्यासाठी खूप आनंददायी आणि प्रेरणादायी आहे. साताऱ्यात सुरू असलेल्या शूटिंगदरम्यानचा पहिला दिवसही तिच्यासाठी अविस्मरणीय ठरला. पहिल्याच दिवशी अॅक्शन सीन करताना पाय मुरगळला, तरीही कामाचा उत्साह कायम होता.

या अनुभवाबद्दल बोलताना ट्विंकल यादव म्हणाली, “मालिकेतील सर्वात आनंदाचा क्षण म्हणजे मला निवेदिता ताईंसोबत काम करण्याची संधी मिळणं. ही बातमी घरी कळताच कुटुंबीयांचा आनंद गगनात मावत नव्हता. मलाही खूप आनंद झाला होता, मात्र त्याचवेळी जबाबदारीची जाणीव आणि थोडीशी भीतीही मनात होती. इतक्या अनुभवी अभिनेत्रीसमोर काम करताना आपण कसं सादरीकरण करू, याची सतत चिंता वाटत होती. पण शूटिंगला सुरुवात झाल्यानंतर निवेदिता ताईंनी मला खूप आधार दिला. जसं एखादी आई आपल्या मुलीला प्रेमाने मार्गदर्शन करते, तसंच त्यांनी प्रत्येक टप्प्यावर माझा आत्मविश्वास वाढवला. त्यामुळे माझी भीती आणि ताण हळूहळू नाहीसे झाले.”

Pahlaj Nihalani Dies: ज्येष्ठ निर्माते आणि सेन्सॉर बोर्डचे माजी अध्यक्ष पहलाज निहलानी यांचे निधन, चित्रपटसृष्टीवर शोककळा

ती पुढे म्हणाली, “त्यांच्याकडून मला अनेक महत्त्वाच्या गोष्टी शिकायला मिळत आहेत. प्रत्येकाशी आपुलकीने वागणं, चूक झाल्यास शांतपणे समजावून सांगणं आणि सेटवर सकारात्मक वातावरण निर्माण करणं, या गोष्टी मला खूप प्रेरणा देतात. त्यांच्या सहवासातून मी कलाकार म्हणूनच नव्हे तर व्यक्ती म्हणूनही खूप काही शिकत आहे.”

‘मोहिनी’मध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा, शालिनी-महेंद्रच्या लग्नात येणार विघ्न; प्रतापराव उघड करणार नात्याचं गुपित

प्रेक्षकांना संदेश देताना ट्विंकल म्हणाली, “’कृष्णाईच्या लेकी’ ही केवळ एक मालिका नाही, तर नातेसंबंध, स्वप्नं, संघर्ष आणि आशा यांची भावनिक कहाणी आहे. या कथेत प्रत्येकाला स्वतःचं किंवा आपल्या आसपासच्या व्यक्तींचं प्रतिबिंब पाहायला मिळेल. त्यामुळे प्रेक्षकांनी ही मालिका आवर्जून पाहावी आणि आम्हाला त्यांचं प्रेम, आशीर्वाद आणि पाठिंबा असाच मिळत राहावा, हीच अपेक्षा आहे.”‘कृष्णाईच्या लेकी’ ही नात्यांची, संघर्षाची, स्वप्नांची आणि आशेची कथा असल्याचं सांगत ट्विंकलने प्रेक्षकांनी मालिकेला भरभरून प्रेम द्यावं, असं आवाहन केलं.

Web Title: Dreaming of becoming a collector backed by determination and struggle twinkle yadav makes a powerful entry in krishnaichya leki actress shares her emotions

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 01:01 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • New Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Elakshi Gupta: ‘तान्हाजी’ फेम इलाक्षी गुप्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज
1

Elakshi Gupta: ‘तान्हाजी’ फेम इलाक्षी गुप्ताच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन; पोस्ट शेअर करत दिली गुड न्यूज

Don’t Be Shy Jhoomo Song:  मस्ती, मैत्री आणि तरुणाईचा जोश; ‘डोंट बी शाय’चं धमाकेदार गाणं ‘झूमो’ रिलीज
2

Don’t Be Shy Jhoomo Song: मस्ती, मैत्री आणि तरुणाईचा जोश; ‘डोंट बी शाय’चं धमाकेदार गाणं ‘झूमो’ रिलीज

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
3

Varun Dhawan Farm: भात शेती करताना दिसला वरुण धवन; स्वतःच्या शेतात राबतानाचे फोटो व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Amitabh Bachchan – Saif Ali Khan: अमिताभ बच्चन आणि सैफ अली खान यांच्यात आहे खास नातं; बिग बींनी स्वतः सांगितलं कनेक्शन
4

Amitabh Bachchan – Saif Ali Khan: अमिताभ बच्चन आणि सैफ अली खान यांच्यात आहे खास नातं; बिग बींनी स्वतः सांगितलं कनेक्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.