Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 4 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘तुझा- माझा संबंध काय? ‘रात्रीस खेळ चाले’च्या सेटवरील वाद चव्हाट्यावर; अपूर्वाच्या आरोपांना कृतिकाचं सडेतोड उत्तर

'रात्रीस खेळ चाले' मालिकेतील वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. अपूर्वा नेमळेकरने केलेल्या आरोपांना कृतिका तुळसकरने सोशल मीडियावरील व्हिडिओद्वारे सडेतोड उत्तर देत प्रोफेशनलिझमवर स्पष्ट भूमिका मांडली.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 19, 2026 | 01:10 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Krutika Tulskar On Apurva Nemlekar: अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत ‘रात्रीस खेळ चाले’ मालिकेच्या निर्मात्यांवर आणि सहकलाकारांवर गंभीर आरोप केले होते. रात्रीस खेळ मालिकेतून अपूर्वाच्या एक्झिटनंतर अभिनेत्री कृतिका तुळसकरने शेवंताची भूमिका साकारली होती. आता या सर्व आरोपांना कृतिकाने स्पष्ट आणि सडेतोड उत्तर दिले आहे.

अभिनेत्रीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये ती म्हणाली, व्हिडिओच्या सुरुवातीलाच कृतिका म्हणते, “रात्रीस खेळ चाले या मालिकेची अनप्रोफेशनल अभिनेत्री मी आहे. नमस्कार, मी कृतिका तुळसकर. आत्ताच मी एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये माझ्याआधी शेवंता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने मला अनप्रोफेशनल म्हटलं आहे. तर मी तिला सांगू इच्छिते की प्रोफेशनल आणि अनप्रोफेशनल यामध्ये नेमका काय फरक असतो.”

त्यानंतर कृतिकाने थेट आरोप करत म्हटले, “अनप्रोफेशनल म्हणजे सेटवर वेळेवर न येणं, दिग्दर्शकाला वाट पाहायला लावणं, इतर कलाकारांशी आणि निर्मात्यांशी नीट न वागणं, तसेच ‘माझ्यामुळेच मालिकेचा टीआरपी वाढतो’ असा माज सर्व कलाकारांना दाखवणं. यालाच अनप्रोफेशनलिझम म्हणतात.”

अपूर्वा नेमळेकरला उत्तर देताना कृतिका तुळसकरने आणखी काही मुद्दे मांडले. मालिकेतून अचानक बाहेर पडणं आणि त्याचा संपूर्ण टीमवर होणारा परिणाम याकडे लक्ष वेधत तिने अप्रत्यक्षपणे अपूर्वावर निशाणा साधला.

कृतिका म्हणाली, “अजून एक गोष्ट, एखादा निर्माता जेव्हा मालिकेसाठी लाखो रुपये खर्च करतो, तेव्हा त्या मालिकेचा, त्यातील कलाकारांचा आणि तंत्रज्ञांचा विचार न करता अचानक मालिका सोडून जाणं, त्यांच्या पोटापाण्याचा विचार न करणं, यालाच अनप्रोफेशनलिझम म्हणतात.”

ती पुढे म्हणाली, “प्रोफेशनलिझम म्हणजे एका रात्रीत त्या मालिकेसाठी उभं राहणं. कोणतीही पार्श्वभूमी नसताना त्या भूमिकेला न्याय देणं आणि संपूर्ण टीमच्या विश्वासाला पात्र ठरणं.”

कृतिका म्हणाली, “अजून एक तिने असं सांगितलं की मी तिला फोन करायला हवा होता… का? तुझी माझी ओळख आहे? आपण जन्मोजन्मीच्या मैत्रिणी आहोत का? नाही ना…. एक अभिनेत्री म्हणून माझ्याकडे एखादी संधी चालून आली, तर त्या संधीचं सोनं कसं करायचं याचा विचार मी करणार. तिला फोन करून ‘काय गं, तू मालिका का सोडलीस? तुला काढलं गेलं का?’ असे प्रश्न विचारण्याची माझ्यावर कोणतीही जबाबदारी नव्हती.”

Salman Khan: ‘दबंग’ सलमान खानला नेमकं झालं तरी काय? व्हायरल व्हिडिओ पाहून चाहत्यांची वाढली चिंता

कृतिकाने ठामपणे सांगितले, “मला वाटतं, मी माझं काम शंभर टक्के प्रामाणिकपणे केलं आहे. तिला याबद्दल विचारणं किंवा स्पष्टीकरण मागणं यासाठी मी अजिबात बांधील नाही. माझ्या प्रोफेशनलिझमबद्दल किंवा अनप्रोफेशनलिझमबद्दल बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. कारण माझ्यासोबत काम केल्याशिवाय मी सेटवर कशी वागते, काय करते, हे कोणालाच माहिती असू शकत नाही.”

‘ब्रेस्ट साइज वाढवं, ओठांना इंजेक्शन घे’, अभिनेत्रीने उघड केल्या बॉलिवूडमधील धक्कादायक अटी

तिने पुढे सध्याच्या पॉडकास्ट संस्कृतीवरही टीका करत म्हटले, “आजकाल पॉडकास्टमध्ये वाट्टेल ती उत्तरं दिली जातात. ज्या व्यक्तीला आपण कधी भेटलोही नाही, तिच्याबद्दलही काहीही बोललं जातं. त्यामुळे माझ्याविषयी कोणत्याही माध्यमात बोलताना आधी विचार करून बोलावं.”

शेवटी तिने टोला लगावत म्हटलं, “दुसऱ्यांविषयी तथ्य पडताळून, जबाबदारीने बोलणं… यालाच खरा प्रोफेशनलिझम म्हणतात, नाही का?”

Web Title: Actress krutika has responded to the allegations made by actress apurva nemlekar by sharing a video on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 19, 2026 | 01:10 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण
1

Sai Tamhankar: ‘अडकित्ता’मधील मंगलची भूमिका सईला का भावली? अभिनेत्रीने स्वतःच सांगितलं कारण

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू
2

Love And War Movie: ‘लव्ह अँड वॉर’चं शूटिंग अखेर पूर्ण! रणबीर-आलिया-विकीच्या सिनेमाची आता ‘ही’ तयारी सुरू

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी
3

Big Boss 20 Contestants:‘बिग बॉस 20’मध्ये कोणाची लागणार वर्णी? माही विज, अर्शिफा खान ते ईशा रिखी; पाहा संभाव्य स्पर्धकांची यादी

Sayani Gupta: ‘आसमानी’ कॉपीराइट वादात सयानी गुप्ताला मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात कोर्टाचा अंतरिम आदेश
4

Sayani Gupta: ‘आसमानी’ कॉपीराइट वादात सयानी गुप्ताला मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात कोर्टाचा अंतरिम आदेश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.