Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 23 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Exclusive: राधिकाच्या भूमिकेतून चिन्मयी मोरेची नवी सुरुवात, ‘छोट्या सूनबाई’ Zee Marathi वर

Exclusive: ‘झी मराठी’ वर लवकरच ‘छोट्या सूनबाई’ मालिका सुरू होत आहे आणि या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी चिन्मयी मोरे खूपच उत्सुक आहे. याच निमित्ताने तिच्याशी नवराष्ट्रने खास संवाद साधला आहे

  • By दिपाली नाफडे
Updated On: Sep 23, 2026 | 12:52 PM
झी मराठीवर येतेय धाकट्या सूनबाई मालिका, चिन्मयी मोरेशी गप्पा

झी मराठीवर येतेय धाकट्या सूनबाई मालिका, चिन्मयी मोरेशी गप्पा

Follow Us
Follow Us:

Exclusive: झी मराठीवर लवकरच ‘धाकट्या सुनबाई’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नात्यांमधला जिव्हाळा, माणुसकी आणि भावनांची सुंदर गुंफण या मालिकेतून पाहायला मिळणार आहे. या मालिकेत अभिनेत्री चिन्मयी मोरे ‘राधिका’ची प्रमुख भूमिका साकारत आहे. सोज्वळ, प्रेमळ आणि आपल्या माणसांच्या सुख-दुःखात खंबीरपणे साथ देणारी राधिका प्रेक्षकांच्या मनात आपली जागा निर्माण करेल, असा विश्वास चिन्मयी व्यक्त करते.

नागपूरची चिन्मयी मोरे लहानपणापासूनच अभिनय क्षेत्राशी जोडलेली आहे. आता ‘धाकट्या सुनबाई’मधून ती पहिल्यांदाच डेली सोपमध्ये प्रमुख भूमिका साकारत आहे. या नव्या प्रवासाबद्दल आणि राधिका या व्यक्तिरेखेबद्दल चिन्मयीने मनमोकळ्या गप्पांमध्ये मारल्या. ‘नवराष्ट्र’शी तिने याबाबात खास बातचीत केली आहे.

१. चिन्मयी, अभिनयाची सुरुवात कशी झाली?

मी मुळची नागपूरची आहे. माझी आई नाट्य क्षेत्रात असल्यामुळे अगदी लहानपणापासूनच माझा या क्षेत्राशी संबंध आला. मी अवघ्या १० दिवसांची होते, तेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर आले होते. त्यानंतर हळूहळू चाइल्ड आर्टिस्ट म्हणून काम करायला सुरुवात केली. पुढे व्यावसायिक नाटकं, राज्य नाट्य स्पर्धा, फिल्म्स, शॉर्ट फिल्म्स, जाहिराती अशा वेगवेगळ्या माध्यमांमध्ये काम करण्याची संधी मिळाली. मात्र, डेली सोपचा अनुभव माझ्यासाठी पहिलाच आहे आणि त्यामुळे हा प्रवास माझ्यासाठी खूप खास आहे. मला अभिनयाची आवड होती; पण गंमत म्हणजे मला कधीच अभिनेत्री व्हायचं आहे, असं वाटलं नव्हतं. माझं स्वप्न तर पायलट होण्याचं होतं. काही कौटुंबिक कारणांमुळे ते स्वप्न पूर्ण करता आलं नाही. पण म्हणतात ना, आपल्या इच्छेप्रमाणे सगळं घडलं तर छानच असतं; पण आपल्या इच्छेविरुद्ध काही घडलं, तर कदाचित त्यात देवाची इच्छा आणि आपल्यासाठी काहीतरी वेगळं चांगलं दडलेलं असतं. आज मागे वळून पाहताना वाटतं की, कदाचित माझ्यासाठी हाच प्रवास लिहिलेला होता. अभिनयाने मला वेगवेगळ्या माध्यमांतून खूप काही शिकवलं आणि आता राधिकेच्या भूमिकेच्या निमित्ताने हा प्रवास एका नव्या टप्प्यावर आला आहे. त्यामुळे ही संधी मिळाल्याचा मला खूप आनंद आहे.

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

२. तुझ्या व्यक्तिरेखेचं नाव काय आहे? तिची पार्श्वभूमी आणि मालिकेत तिची भूमिका काय आहे?

माझ्या भूमिकेचं नाव राधिका आहे. राधिका अतिशय सोज्वळ, प्रेमळ आणि मनमिळावू मुलगी आहे. आपल्या आजूबाजूच्या प्रत्येकाची मनापासून काळजी घेणं हा तिच्या स्वभावाचा महत्त्वाचा भाग आहे. आयुष्यात कितीही दुःख किंवा अडचणी आल्या, तरी त्यातही सुख शोधून आनंदी राहण्याचा तिचा प्रयत्न असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, परिस्थिती कितीही कठीण असली तरी राधिका आपल्या माणसांची साथ कधीच सोडत नाही. त्यांच्या प्रत्येक सुख-दुःखात ती खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभी राहते. त्यामुळे राधिकेचा सोज्वळपणा, तिचा प्रेमळ स्वभाव आणि प्रत्येक परिस्थितीकडे सकारात्मकपणे पाहण्याची तिची वृत्ती मला तिच्यातली सगळ्यात सुंदर गोष्ट वाटते.

३. या भूमिकेसाठी तुझी निवड कशी झाली?

या भूमिकेसाठी माझी निवड ऑडिशनच्या माध्यमातून झाली. खरं सांगायचं तर, माझ्या आयुष्यात असा एक सुंदर वळण येईल आणि ते मला इथपर्यंत घेऊन येईल, याची मलाही कल्पना नव्हती. आपण याआधी ज्यांच्यासोबत काम केलेलं असतं, ते आपलं काम आणि आपल्यातला कलाकार कुठेतरी लक्षात ठेवून असतात. त्यातलेच एक म्हणजे अमित फाटक दादा. त्यांनी याआधी गजानन महाराजांची भूमिका साकारली आहे. आता त्यांच्या माध्यमातून मला राधिकेची भूमिका मिळणं, हा माझ्यासाठी खूप सुंदर योग आहे. त्यांच्या रूपाने मला महाराजांचा प्रसाद मिळाला, अशी माझी भावना आहे. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनात एक वेगळा आदर आणि आपुलकी आहे. दादांनीच प्रोडक्शनमध्ये माझं नाव सुचवलं होतं. त्यानंतर माझा फोटो पाहून मला ऑडिशनसाठी कॉल आला. मी ऑडिशन दिलं आणि त्यानंतर माझी या भूमिकेसाठी निवड झाली.

४. या भूमिकेसाठी तू कशी तयारी करत आहेस?

ही भूमिका फक्त पडद्यावर साकारायची नाही, तर राधिका म्हणून ती व्यक्तिरेखा मनापासून जगायची आहे. त्यामुळे प्रत्येक सीनच्या आधी तिच्या जागी स्वतःला ठेवून, त्या क्षणी राधिका काय विचार करेल आणि काय अनुभवेल, हे समजून घेण्याचा माझा प्रयत्न असतो. एखादा प्रसंग करताना राधिका त्या परिस्थितीत असती, तर तिची प्रतिक्रिया काय असती, तिच्या मनात काय सुरू असतं, ती त्या प्रसंगाकडे कशा पद्धतीने पाहते, हे आधी समजून घेण्याचा मी प्रयत्न करते. तिच्या भावना स्वतःला जाणवून घेऊन त्या चेहऱ्यावर, बोलण्यात आणि देहबोलीत आणण्याचा प्रयत्न करतेय.

५. प्रोमोला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळाला?

प्रोमोला प्रेक्षकांचा प्रतिसाद खरंच खूप मस्त आणि माझ्यासाठी खूपच overwhelming होता. सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं आणि प्रोमोलाही माझ्या अपेक्षेपेक्षा कितीतरी जास्त प्रेम मिळालं. ‘धाकट्या सुनबाई’ येणार म्हणून प्रेक्षकांमध्ये खूप उत्सुकता आहे, हे त्यांच्या प्रतिक्रियांमधून जाणवतंय. आता राधिकेला आणि तिच्या प्रवासाला प्रेक्षक कसं स्वीकारतात, हे पाहण्यासाठी मी स्वतःही खूप उत्सुक आहे. आणि सगळ्यात जास्त उत्सुकता आहे ती म्हणजे राधिका आणि वेदांतची जोडी ऑनस्क्रीन पाहण्यासाठी! प्रेक्षकही या जोडीची आतुरतेने वाट पाहत आहेत, हे त्यांच्या प्रतिक्रिया आणि प्रेमातून जाणवतंय. आता ही जोडी आणि त्यांच्यातलं नातं प्रेक्षकांसमोर येण्याची मी स्वतः खूप आतुरतेने वाट पाहतेय. त्यांच्या प्रेमाला आणि प्रतिसादाला सामोरं जाण्याची ही उत्सुकता नक्कीच खास आहे.

New Marathi Serial: तब्बल १८ वर्षांनंतर ‘हा’ मराठी अभिनेता छोट्या पडद्यावर; ‘इच्छाधारी नागीन’मध्ये साकारणार प्रमुख भूमिका

६. सहकलाकार आणि टीमबद्दल कसा अनुभव आहे?

माझे सगळे सहकलाकार खूपच पाठिंबा देणारे आणि प्रेमळ आहेत. सगळे मला खूप सांभाळून घेतात आणि माझ्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे. विशेषतः जेव्हा एखाद्या कलाकाराचा डेली सोपचा हा पहिलाच अनुभव असतो, तेव्हा आजूबाजूची टीम समजून घेणारी आणि साथ देणारी असणं खूप गरजेचं असतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, इतकं चांगलं आणि आपल्याला समजून घेणारं दिग्दर्शक आणि टीम मिळणं हे प्रत्येकाच्या नशिबात नसतं. मला खरंच अशी टीम मिळाली आहे, यासाठी मी खूप कृतज्ञ आहे. आमचे दिग्दर्शक चंद्रकांत कणसे सर मला खूप प्रेमाने सांभाळून घेतात, शिकवतात आणि त्याचबरोबर माझी काळजीही घेतात. त्यामुळे काम शिकताना मला खूप सहज आणि आपलंसं वाटतं. प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळतंय आणि या सगळ्या कलाकारांसोबत काम करताना माझा स्वतःचा अभिनयाचा प्रवासही अधिक समृद्ध होतोय.

७. मंदार जाधवसोबत तुझं ट्युनिंग कसं जमलं आहे? त्याच्यासोबत काम करताना तुला काय नवीन शिकायला मिळत आहे?

मंदार आणि मी आता खूप चांगले मित्र होत आहोत आणि हळूहळू आमचे vibes सुद्धा खूप छान जुळत आहेत. तो खरंच खूप छान व्यक्ती आहे आणि त्याच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. को-ॲक्टर म्हणून तो खूप सांभाळून घेतो, आणि सतत पाठिंबा देतो. त्यामुळे त्याच्यासोबत काम करताना मला खूप सहज आणि आपलंसं वाटतं. ऑफस्क्रीनसुद्धा आम्ही एकमेकांचे खूप चांगले मित्र झालो आहोत. एक कलाकार म्हणूनच नाही, तर एक माणूस म्हणूनसुद्धा त्याच्याकडून मला खूप काही शिकायला मिळतं. त्यामुळे आमची छान गट्टी जमली आहे आणि एकमेकांसोबत काम करताना खूप मजा येते. मला वाटतं, ऑनस्क्रीनची केमिस्ट्री चांगली असण्यासाठी ऑफस्क्रीन एकमेकांना समजून घेणं आणि एकमेकांसोबत सहज असणं खूप महत्त्वाचं असतं.

८. प्रेक्षकांना काय सांगशील?

प्रेक्षकांना मी एवढंच म्हणेन की, आजवर तुम्ही झी मराठीच्या मालिकांवर जसं भरभरून प्रेम केलं आहे, तसंच आणि त्याहूनही जास्त प्रेम आमच्या नव्याने येणाऱ्या मालिकेवर करा. ‘धाकट्या सुनबाई’ला आपलंसं करा. या मालिकेतलं एक न एक पात्र तुम्हाला नक्कीच कुठेतरी आपलंसं वाटेल किंवा त्याच्याशी तुम्ही रिलेट कराल, अशी मला खात्री आहे. राधिका आणि वेदांतची जोडी, आमची संपूर्ण टीम आणि या मालिकेची गोष्ट तुम्हाला नक्की आवडेल.त्यामुळे ‘धाकट्या सुनबाई’च्या संपूर्ण टीमला असंच भरभरून प्रेम आणि आशीर्वाद द्या, ही मनापासून विनंती. तुमचं प्रेम आणि पाठिंबा आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आम्हीही ही मालिका तितक्याच मनापासून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू.

चिन्मयी मोरेसाठी ‘धाकट्या सुनबाई’ ही केवळ नवी मालिका नसून अभिनयाच्या प्रवासातील एक महत्त्वाचा नवा टप्पा आहे. प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळेल अशीच तिची अपेक्षा आहे. २८ सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला झी मराठीवर येत आहे. 

Web Title: Exclusive chinmayee more to lead in chotya sunbai on zee marathi starts from 28 september

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 23, 2026 | 12:52 PM

Topics:  

  • Marathi Serial
  • New Marathi Serial
  • zee marathi

संबंधित बातम्या

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य
1

Sun Marathi Serial: अनुप्रियाच्या आयुष्यात येणार नवं पात्र; निरंजन कुलकर्णीची मालिकेत एन्ट्री, भूमिकेमागे दडलंय रहस्य

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?
2

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू
3

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन
4

Zee Marathi artists Ganeshotsav: गणरायाच्या स्वागताची तयारी जोरात! झी मराठी कलाकारांचा बाप्पासाठी खास प्लॅन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.