Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jui Gadkari: ‘असे फालतू व्हिडीओ बनवायला लाज वाटत नाही का?’ लग्नाच्या Fake व्हिडीओवर जुई गडकरीचा संताप; ट्रोलरला सुनावलं

Jui Gadkari: जुई गडकरीच्या लग्नाबाबत Fake AI व्हिडीओ युट्यूबवर व्हायरल झाला होता. अभिनेत्रीने संताप व्यक्त करत व्हिडीओ हटवण्याचा इशारा दिल्यानंतर तो युट्यूबवरून हटवण्यात आला.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 22, 2026 | 03:23 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • जुई गडकरीच्या लग्नाची Fake बातमी व्हायरल
  • AI जनरेटेड व्हिडीओ पाहून अभिनेत्रीचा संताप
  • ‘आजच्या आज व्हिडीओ डिलीट करा, नाहीतर कोर्टात भेटू’
Jui Gadkari: सोशल मीडियावर सध्या फेक व्हिडीओ आणि AI जनरेटेड फोटो-व्हिडीओचं प्रमाण वाढताना दिसत आहे. मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांना याचा सामना करावा लागतो. कलाकारांचे फेक व्हिडीओ, AI जनरेटेड फोटो, बॉडी शेमिंग तसंच त्यांच्या खासगी आयुष्याबाबत चुकीच्या बातम्या सोशल मीडियावर पसरवल्या जातात. अनेकदा कलाकारांच्या आजारपणाबाबत किंवा निधनाबाबतही खोट्या बातम्या व्हायरल होतात.

काही दिवसांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ जाधवलाही अशाच प्रकाराला सामोरं जावं लागलं होतं. त्याने संबंधित व्हिडीओ शेअर करत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली होती. आता मालिकाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री जुई गडकरीसोबतही असाच प्रकार घडला आहे.

जुई गडकरीच्या लग्नाची Fake बातमी व्हायरल

जुई गडकरीने सोशल मीडियावर स्टोरी शेअर करत एका व्हिडीओबद्दल संताप व्यक्त केला आहे. एका युट्यूब चॅनेलवरून जुईच्या लग्नाबाबत खोटी माहिती पसरवण्यात आल्याचं तिने सांगितलं आहे.

या व्हिडीओमध्ये जुई एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलासोबत लग्न करणार असल्याचा दावा करण्यात आला होता. विशेष म्हणजे हा व्हिडीओ AI जनरेटेड असल्याचंही जुईने आपल्या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

‘आजच्या आज व्हिडीओ डिलीट करा, नाहीतर कोर्टात भेटू’

जुईने संबंधित व्हिडीओची लिंक आपल्या सोशल मीडिया स्टोरीवर शेअर केली. यासोबतच तिने व्हिडीओ तात्काळ हटवण्याचा इशाराही दिला आहे. व्हिडीओ डिलीट केला नाही तर कायदेशीर कारवाई करण्याचं तिने स्पष्ट केलं.

जुईने लिहिलं, “तुम्ही जे कुणीही असाल… प्लीज आपल्या कामाकडे लक्ष द्या. लाइक्स आणि व्ह्यूजसाठी असे फालतू व्हिडीओ बनवायला तुम्हाला लाज वाटत नाही का? तुम्हाला नीट AI पण करता येत नाहीये. अशुद्ध भाषा… सगळंच अशुद्ध!”

पुढे तिने लिहिलं, “हा व्हिडीओ जर आजच्या आज डिलीट झाला नाही तर लवकरच कोर्टात भेटुयात. ही विनंती आहे. प्लीज सर्वांनी हे चॅनेल रिपोर्ट करा आणि या व्हिडीओलाही रिपोर्ट करा.”

Zee Marathi New Serial: नाती, प्रेम अन् माणुसकीचा नवा अध्याय; ‘धाकट्या सुनबाई’ची झी मराठीवर एंट्री, ‘या’ दिवशी होणार मालिका सुरू

आता युट्यूबवरून हटवला Fake व्हिडीओ

दरम्यान, जुई गडकरीने संताप व्यक्त केल्यानंतर आता हा Fake व्हिडीओ युट्यूबवरून हटवण्यात आला आहे. त्यामुळे जुईने केलेल्या मागणीनंतर संबंधित व्हिडीओ आता उपलब्ध नसल्याचं पाहायला मिळत आहे.

कलाकारांच्या खासगी आयुष्याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती नसताना सोशल मीडियावर दावे केले जात असल्याने अनेकदा गैरसमज निर्माण होतात. जुईने संबंधित व्हिडीओविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे हा प्रकार चर्चेत आला आहे.

Veen Doghantali Hi Tutena: समर-स्वानंदीची अष्टविनायक यात्रा, मल्लिका काकूने रचला मोठा डाव; पुढे काय घडणार?

Web Title: Jui gadkari wedding fake ai video youtube

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2026 | 03:23 PM

Topics:  

  • fake video
  • jui gadkari
  • marathi actress

संबंधित बातम्या

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित
1

Hruta Durgule Aali Mothi Shahani Teaser: चिमुकलीची एक इच्छा आणि बदलणारं संपूर्ण जग! ‘आली मोठी शहाणी’चा ट्रेलर प्रदर्शित

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं
2

Ankita Walawalkar On Pregnancy: ‘मला स्वतःला आई म्हणून बघायचंय…’; मातृत्वाबाबत अंकितानं केलं मन मोकळं

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक
3

Meghna Erande Joshi: ‘यंदाचा गणेशोत्सव माझ्यासाठी स्पेशल’; बाप्पासोबतचं खास नातं सांगताना अभिनेत्री भावुक

Prajakta Mali: ‘लग्न करण्याची इच्छा…’; प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘तुझ्या…’
4

Prajakta Mali: ‘लग्न करण्याची इच्छा…’; प्राजक्ता माळीची ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाली- ‘तुझ्या…’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.