Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jui Gogri: आईपण, करिअर अन् कुटुंबाची जबाबदारी; मराठी अभिनेत्री जुई गोगरीने सांगितली स्त्रीशक्तीची खरी व्याख्या

Jui Gogri : सनई चौघडे’ मालिकेतील अभिनेत्री जुई गोगरीने नवरात्रीच्या निमित्ताने स्त्रीशक्ती, आत्मविश्वास आणि स्वप्नांविषयी आपले विचार मांडले. “प्रत्येक दिवस स्त्रियांचा आहे,” असं म्हणत तिने महिलांना खास संदेश दिला.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 13, 2026 | 01:06 PM
( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Jui Gogri:  नवरात्र म्हणजे भक्ती, उत्साह आणि चैतन्याने भरलेले नऊ दिवस! या काळात देवीच्या विविध रूपांची आराधना करत स्त्रीशक्तीचा जागर केला जातो. मात्र, स्त्रीशक्तीचा उत्सव केवळ नवरात्रीच्या नऊ दिवसांपुरता मर्यादित नसून प्रत्येक दिवस स्त्रियांचाच आहे, असा महत्त्वपूर्ण संदेश अभिनेत्री जुई गोगरी हिने दिला आहे. ‘सनई चौघडे’ या मालिकेत परब कुटुंबातील साध्या, प्रेमळ आणि लाडक्या असावरीची भूमिका साकारणाऱ्या जुईने स्त्रीशक्ती, आत्मविश्वास आणि स्वतःच्या स्वप्नांसाठी लढण्याच्या महत्त्वाविषयी आपले विचार मांडले आहेत. तसेच, नवरात्रीच्या काळात सुट्टी मिळाली की गरबा खेळायला आवर्जून जात असल्याचेही तिने सांगितले.

स्वतःवर विश्वास ठेवणं, हीच खरी स्त्रीशक्ती!

स्त्रीशक्तीची व्याख्या स्पष्ट करताना जुई म्हणते की, आयुष्यातील अडचणींना सामोरं जाण्यासाठी स्वतःवर विश्वास असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्त्री एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडत असते. कुटुंबाची जबाबदारी सांभाळतानाच ती आपल्या करिअरमध्येही पुढे जाण्याचा प्रयत्न करते. वैयक्तिक आयुष्य आणि करिअर यांचा समतोल साधत स्वतःची स्वप्नं पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहणं, हीदेखील स्त्रीशक्तीच असल्याचं जुईने सांगितलं.

स्त्रियांनी स्वतःला कधीही कमी समजू नये, असंही ती आवर्जून सांगते. स्वप्नं कितीही मोठी असली किंवा आयुष्यात कितीही संकटं आली, तरी मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांचा सामना करता येतो. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून प्रत्येक स्त्रीने आपल्या ध्येयाच्या दिशेने वाटचाल करावी, असा संदेश जुईने दिला.

कॉलेजमध्ये असताना अनुभवली स्त्रीशक्ती!

स्वतःमधील स्त्रीशक्तीची जाणीव कधी झाली, याविषयी बोलताना जुईने तिच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या प्रसंगाची आठवण सांगितली. ती म्हणाली की, कॉलेजमध्ये असताना तिच्या कुटुंबाचं नवीन घर घेण्याचं काम सुरू होतं. त्या वेळी तिने आणि तिच्या बहिणीने मिळून जुनं घर विकण्यापासून ते नवीन घर घेण्यापर्यंतच्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या.

त्या अनुभवामुळे कमी वयातही आपण अनेक महत्त्वाच्या गोष्टी करू शकतो आणि आपल्यात ती क्षमता आहे, याची जाणीव तिला झाली. तिच्या मते, एखादी गोष्ट करण्याचं ठरवलं, तर स्त्री ती नक्कीच करू शकते. कितीही अडचणी आल्या, तरी त्यातून मार्ग काढण्याचा विश्वास प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवा.

“सुट्टी असते, तेव्हा गरबा खेळायला नक्की जाते”

नवरात्रीच्या सणाविषयी बोलताना जुईने तिच्या घरातील परंपराही सांगितली. ती म्हणाली, “मी खरं तर जैन आहे. त्यामुळे गुजराती लोकांप्रमाणे आमच्याकडे नवरात्रीचं फार मोठं सेलिब्रेशन होत नाही. पण आमची जी कुलदेवी आहे, तिची आम्ही नऊ दिवस घरी आरती करतो. आता शूटिंगमुळे त्यासाठी फार वेळ मिळत नाही. पण जेव्हा सुट्टी असते, तेव्हा मी गरबा खेळायला नक्की जाते.”

गरबा खेळताना आपल्याला खूप छान वाटतं, असंही जुईने सांगितलं. तिच्यासाठी गरबा हा केवळ आनंदाचा भाग नसून देवीच्या आराधनेशी जोडलेला अनुभव आहे. गरब्यामुळे वातावरणात एक प्रकारची शुद्धता आणि दैवी भावना जाणवते, असं ती म्हणाली.

Adinath Kothare Upcoming Movies: आदिनाथ कोठारेची बॉलिवूडमध्ये मोठी झेप! ‘रामायण’सह दोन बिग बजेट चित्रपटांत झळकणार

“तुम्हाला जे करायचं आहे, ते ठामपणे करा!”

नवरात्रीच्या निमित्ताने प्रत्येक स्त्रीला संदेश देताना जुईने आत्मविश्वासाने जगण्याचं आवाहन केलं. ती म्हणाली, “मी नेहमी हेच सांगेन की नवरात्रीचे हे फक्त नऊ दिवस स्त्रियांचे नसतात, तर प्रत्येक दिवस स्त्रियांचा असतो. त्यामुळे छान जगा, तुम्हाला जे करायचं आहे ते करा आणि ते ठामपणे करा. ‘मला हे करायचंच आहे,’ असा विश्वास स्वतःवर ठेवा आणि त्याप्रमाणे जगा.”

जुई गोगरीचा हा संदेश स्त्रीशक्तीचा खरा अर्थ अधोरेखित करणारा आहे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवून, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करणाऱ्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक वेगळी ताकद असते. नवरात्रीच्या मंगलमय पर्वात जुईने दिलेला आत्मविश्वासाचा हा संदेश अनेक महिलांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो.

RJ Mitte Death: ‘ब्रेकिंग बॅड’ फेम अभिनेत्याचा धक्कादायक मृत्यू; वयाच्या ३४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Web Title: Jui gogri navratri special women empowerment message ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 13, 2026 | 01:06 PM

Topics:  

  • entertainment
  • marathi actress
  • Navratri 2026

संबंधित बातम्या

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर
1

Columbus Marathi Movie: सुशिक्षित बेरोजगाराच्या आयुष्यात अमेरिकेची संधी! ‘कोलंबस’ची रंजक गोष्ट लवकरच मोठ्या पडद्यावर

Navratri Horoscope: नवरात्रीत 100 वर्षांनंतर जुळून येताहेत 3 शुभ योग! ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार?
2

Navratri Horoscope: नवरात्रीत 100 वर्षांनंतर जुळून येताहेत 3 शुभ योग! ‘या’ 3 राशींचं नशीब चमकणार?

Adinath Kothare Upcoming Movies: आदिनाथ कोठारेची बॉलिवूडमध्ये मोठी झेप! ‘रामायण’सह दोन बिग बजेट चित्रपटांत झळकणार
3

Adinath Kothare Upcoming Movies: आदिनाथ कोठारेची बॉलिवूडमध्ये मोठी झेप! ‘रामायण’सह दोन बिग बजेट चित्रपटांत झळकणार

Navratri 2026 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटाला अर्पण करा मखान्यांचा शीरा, व्रतासाठीची परफेक्ट रेसिपी
4

Navratri 2026 : नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघटाला अर्पण करा मखान्यांचा शीरा, व्रतासाठीची परफेक्ट रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.