Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jyoti Chandekar Death Anniversary: “आई, १ वर्ष झालं तुझ्याशिवाय…”; ज्योती चांदेकरांच्या स्मृतीदिनी तेजस्विनी पंडितची भावुक पोस्ट

Jyoti Chandekar Death Anniversary: ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या स्मृतीदिनी जाणून घ्या त्यांचा ५० वर्षांहून अधिक काळाचा अभिनयप्रवास, पुरस्कार आणि गाजलेल्या चित्रपट-मालिका.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 17, 2026 | 08:39 AM
( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

( फोटो सौजन्य- सोशल मिडिया)

Follow Us
Follow Us:

Jyoti Chandekar Death Anniversary:ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांच्या निधनाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. १६ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी सिनेसृष्टीवर शोककळा पसरली होती. आता त्यांच्या पहिल्या स्मृतीदिनी मुलगी आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडितने आईच्या आठवणीत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे.

ज्योती चांदेकर यांनी अनेक गाजलेल्या चित्रपट आणि मालिकांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडली. त्या ‘ठरलं तर मग’ या लोकप्रिय मालिकेत ‘पूर्णा आजी’ची भूमिका साकारत होत्या. या भूमिकेतून त्या घराघरात पोहोचल्या. त्यांच्या निधनानंतर मालिकेच्या संपूर्ण टीमने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली होती.

आईच्या आठवणीत शेअर केला खास फोटो

ज्योती चांदेकर यांच्या स्मृतीदिनी तेजस्विनीने सोशल मीडियावर आईचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ज्योती चांदेकर डायरी वाचताना दिसत आहेत. या आठवणीसोबत तेजस्विनीने आपल्या मनातील भावना शब्दांत व्यक्त केल्या आहेत.

“आई… १ वर्ष झालं! तुझ्याशिवाय आयुष्य पूर्वीसारखं राहिलेलं नाहीये… I Am Sorry, तुला थँक्यू म्हणता आलं नाही…” असं तेजस्विनीने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे.

दरम्यान, अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनीही ज्योती चांदेकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करत एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. ज्योती ताईंसोबत काम करतानाचे अनुभव आठवत त्यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचं कौतुक केलं आहे.

प्राजक्ता कुलकर्णी लिहितात, “ज्योती ताई, तुझ्यासोबत जेव्हा-जेव्हा काम केलंय, तेव्हा प्रत्येक वेळेचा अनुभव अविस्मरणीय आहे. तू उत्तम कलाकार तर होतीसच, पण माणूस म्हणूनसुद्धा अगदी दिलखुलास होतीस. तू जिथे असशील, तिथे सुद्धा सगळ्यांची मनं जिंकून घेत असशील. तुझ्या आठवणी कायम स्मरणात राहतील… Love you.”

प्राजक्ता यांच्या या पोस्टमधून ज्योती चांदेकर यांच्या सहकलाकारांशी असलेल्या जिव्हाळ्याच्या नात्याची आणि त्यांच्या प्रेमळ स्वभावाची झलक पाहायला मिळते. त्यांच्या आठवणींना उजाळा देताना अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर भावुक होत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

Antara Banerjee Arrest: अभिनेत्री अंतरा बॅनर्जीला अटक; ट्रेनमध्ये RPF अधिकाऱ्यावर रेझरने हल्ल्याचा आरोप

ज्योती चांदेकर यांच्या अभिनयाचा समृद्ध वारसा

ज्योती चांदेकर यांनी आपल्या प्रदीर्घ अभिनय कारकिर्दीत मराठी रंगभूमी, चित्रपट आणि छोटा पडदा अशा विविध माध्यमांमध्ये उल्लेखनीय काम केलं. त्यांच्या दीर्घ आणि योगदानाबद्दल त्यांना प्रतिष्ठेचा ‘बालगंधर्व जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला होता.

चित्रपटांमध्येही ज्योती चांदेकर यांनी विविधांगी भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली. ‘मी सिंधुताई सपकाळ’, ‘गुरू’, ‘ढोलकी’, ‘तिचा उंबरठा’, ‘पाऊलवाट’, ‘सलाम’ आणि ‘सांजपर्व’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये त्यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या.

केवळ मोठ्या पडद्यावरच नव्हे, तर छोट्या पडद्यावरही त्यांनी आपल्या अभिनयाची छाप उमटवली. ‘तू सौभाग्यवती हो’ आणि ‘छत्रीवाली’ यांसारख्या मालिकांमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. त्यामुळे ज्योती चांदेकर यांचा अभिनयप्रवास हा अनेक पिढ्यांच्या आठवणींशी जोडलेला आहे.

Ananya Raj Death: धक्कादायक! बॉलिवूड अभिनेत्रीचं २७व्या वर्षी निधन; मृत्यूचं कारण समोर, चाहत्यांना मोठा धक्का

 

Web Title: Jyoti chandekar death anniversary tejaswini pandit emotional post

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 08:39 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress
  • Tejswini Pandit

संबंधित बातम्या

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा
1

Pratyusha Banerjee Case: 10 वर्षांनंतर ‘बालिका वधू’ फेम प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणाचा निकाल; राहुल राज सिंगला दिलासा

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”
2

Amruta Khanvilkar: अमृता खानविलकरची ‘तीन तिघी’ गँग परदेशात! फोटो शेअर करत म्हणाली, “आमच्या बॅगा…”

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष
3

Pach Futacha Bachchan Movie: कीर्तन, कोल्हापुरी भाषा अन् नाट्यमय कथा, पाच फुटाचा बच्चन’ चित्रपटाच्या ट्रेलरने वेधलं लक्ष

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य
4

Bakaiti Season 2: कटारिया कुटुंबात पुन्हा रंगणार धमाल; शीबा चड्ढांनी सांगितलं सुष्माच्या पात्राचं खास वैशिष्ट्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.