(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्रवाहवरील लोकप्रिय मालिका ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ प्रेक्षकांच्या मनात दिवसेंदिवस अधिक घट्ट स्थान निर्माण करत आहे. मालिकेतील प्रत्येक पात्र आणि त्यांची भावनिक गोष्ट प्रेक्षकांना आपलीशी वाटत आहे. लवकरच मालिकेत एक अत्यंत खास आणि भावनिक टप्पा येणार आहे. पार्थ आणि काव्या लवकरच आई-बाबा होणार असल्याची आनंदाची बातमी समोर येणार आहे. प्रत्येक नवविवाहित जोडप्याच्या आयुष्यातील हा एक महत्त्वाचा आणि सुंदर प्रवास असतो, आणि मालिकेतही याच प्रवासाची सुरुवात होणार आहे.
या नव्या वळणाचा प्रोमो प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरला आहे. अवघ्या २४ तासांत या प्रोमोने ५ मिलियनपेक्षा अधिक व्ह्यूज मिळवत एक नवा विक्रम रचला आहे. सोशल मीडियावरही या प्रोमोला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून पार्थ-काव्याच्या या नव्या प्रवासासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत.
पण दुसरीकडे जीवा- नंदिनी यांच्या बाबत डॉक्टरांनी एक दु:खद बातमी सांगितली आहे. नंदिनी आई होण्याचे शक्यता कमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
स्टार प्रवाहने शेअर केलेल्या प्रोमोमध्ये नंदिनी रडताना दिसत आहे आणि संपूर्ण कुटुंबाला ही गोष्ट सांगत आहे. तर दुसरी कडे पार्थ दारातून आत येतो आणि मोठ्याने ओरडतो हत्ती वरून साखर वाटा माझी बायको आई होणार आहे. आणि काव्याला उचलून घेतो. यामुळे घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
काही दिवसांपूर्वीच मालिकेत पार्थ-काव्या आणि जीवा- नंदिनी यांची भव्य वरात काढण्यात आली होती. त्यांच्या लग्नाची वरात लालबाग परिसरात ढोल- ताशांच्या गजरात दिमाखात निघाली होती. हा क्षण सर्वांसाठी अविस्मरणीय ठरला आहेत. त्यांची ही वरात विशेष आकर्षक ठरली होती. मराठी मनोरंजन सृष्टीत पहिल्यांदाच असे प्रेक्षकांसोबत लग्नाचे सेलिब्रेशन करण्यात आलं होतं.
या नवीन टप्प्यामुळे प्रेक्षकांच्या अपेक्षा आणि उत्सुकता अधिक वाढणार असून, मालिकेतील भावनिक गाठोशी प्रेक्षकांच्या हृदयाला भिडणार आहे.
बिपाशा बासूला मिळली ‘The Traitors’ची ऑफर; करण जोहरच्या रिॲलिटी शो ला दिला नकार? स्वतःच सांगितले कारण






