Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 26 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Sony Marathi: ‘कोण होणार करोडपती’ मध्ये येण्यामागचं कारण ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षितने केलं स्पष्ट

Sony Marathi: पहिल्यांदाच माधुरी दीक्षित कोण होणार करोडपती या मराठी रियालिटी शो चं सूत्रसंचालन करणार आहे आणि यामागे नेमकं काय कारण आहे त्याचा खुलासा खुद्द माधुरीने केलाय.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Aug 26, 2026 | 03:06 PM
का स्वीकारला कोण होणार करोडपती शो, माधुरीने केला खुलासा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

का स्वीकारला कोण होणार करोडपती शो, माधुरीने केला खुलासा (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • माधुरी दीक्षित पहिल्यांदाच मराठी रियालिटी शो मध्ये
  • सोनी मराठीवर करणार कोण होणार करोडपतीचं सूत्रसंचालन 
  • नक्की काय आहे कारण, माधुरीने केला खुलासा 
Sony Marathi: भारतीय सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेली माधुरी दीक्षित जेव्हा हॉटसीटवर स्पर्धक म्हणून नव्हे, तर सूत्रसंचालक म्हणून विराजमान होते, तेव्हा उत्सुकता निर्माण होणं साहजिकच आहे आणि याच उत्सुकतेचं उत्तर आहे ‘कोण होणार करोडपती’! या लोकप्रिय प्रश्नमंजुषा कार्यक्रमाच्या सूत्रसंचालकपदी माधुरी दीक्षितची निवड झाल्याची घोषणा झाल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरही तिच्या या नव्या भूमिकेची जोरदार चर्चा रंगली आहे. ‘कोण होणार करोडपती’मध्ये सहभागी होण्याची संधी मिळवण्यासाठी Sony LIV ॲप किंवा WhatsApp द्वारे +91 85919 75331 वर नोंदणी सुरू झाली आहे.

Kon Honar Crorepati: ‘कोण होणार करोडपती’मध्ये मोठा बदल; बॉलिवूडची मराठमोळी अभिनेत्री सांभाळणार सूत्रसंचालनाची धुरा, प्रोमो व्हायरल

माधुरी दीक्षित नव्या अवतारात 

नोंदणी सुरू झाल्यामुळे माधुरी दीक्षितला एका नव्या अंदाजात पाहण्याची प्रेक्षकांची प्रतीक्षाही आता सुरू झाली आहे. मात्र, माधुरीसाठी ‘कोण होणार करोडपती’चा भाग होण्यामागचं कारण केवळ हा खेळ नाही, तर या खेळाशी जोडलेली माणसं, त्यांच्या कथा आणि त्यांची स्वप्नं आहेत. याबद्दल सांगताना माधुरी म्हणते, “मला सगळ्यात जास्त उत्सुकता होती ती स्पर्धकांच्या कथा आणि त्यांच्या स्वप्नांमधून त्यांच्याशी जोडून घेण्याची. ‘कोण होणार करोडपती’ हा केवळ प्रश्नांची उत्तरं देऊन पैसे जिंकण्याचा कार्यक्रम नाही, तर स्वतःच्या स्वप्नांवर विश्वास ठेवण्याचा, आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा आणि स्वप्नं पाहण्याचं धाडस करण्याचा एक अनुभव आहे.”

Madhuri Dixit : माधुरी झाली ‘कोण होणार करोडपती’ची होस्ट; पोस्टर पाहताच पती श्रीराम नेनेंची मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया, म्हणाले…

माधुरीसाठी वेगळी संधी 

अनेक दशकांपासून अभिनेत्री, नृत्यांगना आणि परफॉर्मर म्हणून आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या माधुरी दीक्षितसाठी हा कार्यक्रम प्रेक्षकांशी एका वेगळ्या पद्धतीने जोडून घेण्याची संधी घेऊन आला आहे. 

या नव्या भूमिकेबद्दल बोलताना ती पुढे म्हणते, “‘कोण होणार करोडपती’मधून प्रेक्षकांना माझी एक अधिक सहज आणि उत्स्फूर्त बाजू पाहायला मिळेल, असं मला वाटतं. अभिनेत्री म्हणून आपण एका व्यक्तिरेखेत शिरतो; पण इथे मी फक्त स्वतः असणार आहे. माझ्यासमोर बसलेल्या स्पर्धकांशी गप्पा मारता येतील, त्यांच्या कथा ऐकता येतील आणि त्यांना अधिक जवळून जाणून घेता येईल. माझ्यासाठी हा कार्यक्रम केवळ प्रश्न आणि उत्तरांपुरता मर्यादित नाही. प्रत्येक स्पर्धकासोबत जोडलेली त्यांची स्वप्नं, भावना, हास्याचे क्षण आणि अचानक येणारे आश्चर्याचे प्रसंग या सगळ्यामुळे हा अनुभव खास होतो. मला संवाद साधायला आवडतं, त्यामुळे या खऱ्या आणि अनपेक्षित संवादांचा अनुभव घेण्यासाठी आणि स्पर्धकांसोबत तसेच प्रेक्षकांसोबत हे खास क्षण शेअर करण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.”

माधुरी दीक्षितच्या सूत्रसंचालनाने ‘कोण होणार करोडपती’मधील प्रत्येक क्षण, प्रत्येक कथा आणि प्रत्येक स्वप्न एका सुंदर उत्सवात रूपांतरित होण्यासाठी नक्कीच सज्ज आहे. लवकरच फक्त सोनी मराठी आणि Sony LIV वर हा कार्यक्रम प्रेक्षकांना पाहता येणार आहे. 

Web Title: Madhuri dixit to host kon honar crorepati on sony marathi shared reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 26, 2026 | 03:06 PM

Topics:  

  • Entertainment News
  • madhuri dixit
  • sony marathi

संबंधित बातम्या

Toxic Movie Review: यशचा दमदार डबल रोल अन् खिळवून ठेवणारा सस्पेन्स, कसा आहे ‘टॉक्सिक’?
1

Toxic Movie Review: यशचा दमदार डबल रोल अन् खिळवून ठेवणारा सस्पेन्स, कसा आहे ‘टॉक्सिक’?

Dwidha Movie: ‘द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार दिसणार एका वेगळ्या रूपात, पाहण्याचं ‘शास्त्र असतं ते’
2

Dwidha Movie: ‘द्विधा’मध्ये रेणुका दफ्तरदार दिसणार एका वेगळ्या रूपात, पाहण्याचं ‘शास्त्र असतं ते’

Bandkhor: सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट! टिझरने वाढवली उत्सुकता, महेश मांजरेकरांची कलाकृती
3

Bandkhor: सहा ‘बंडखोर’ जणींची गोष्ट! टिझरने वाढवली उत्सुकता, महेश मांजरेकरांची कलाकृती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.