Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhuri Pawar: ‘कोण करतंय, का करतंय काहीच..’, गेल्या ३ वर्षांपासून माधुरी पवारला होतोय त्रास; केला धक्कादायक खुलासा

Madhuri Pawar: अभिनेत्री माधुरी पवारने गेल्या तीन वर्षांपासून सोशल मीडियावर त्रास होत असल्याचा दावा केला आहे. सायबरकडे तक्रार केल्यानंतर तिने नेत्यांकडे मदतीची मागणी केली.

  • By अमृता यादव
Updated On: Sep 02, 2026 | 09:32 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • माधुरी पवारने व्हिडीओ शेअर करत केला धक्कादायक खुलासा
  • सायबरकडे तक्रार, मात्र पुरावा नाही
  • माधुरी पवारची मुख्यमंत्र्यांकडे मदतीची मागणी
Madhuri Pawar: अभिनेत्री आणि नृत्यांगना माधुरी पवारने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत गेल्या तीन वर्षांपासून आपल्याला होत असलेल्या त्रासाबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. सोशल मीडियावर चुकीच्या आणि अपमानास्पद कमेंट्स, फॅन पेज हॅक होणे, विकिपीडिया पेज डिलीट होणे आणि वर्किंग नंबरवर कॉल बॉम्बिंग करण्यात येत असल्याचा दावा माधुरीने केला आहे. या सगळ्यामुळे मानसिक त्रासासोबतच आपल्या सुरक्षिततेचीही चिंता वाटत असल्याचे तिने म्हटले आहे.

‘माझ्या प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचता येत नाहीये’

माधुरीने व्हिडीओमध्ये सांगितले की, सोशल मीडियामुळे तिला कमी वेळात प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आले. मात्र, आता याच सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्याबाबत वेगळेच प्रकार घडत असल्याने तिला प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित पोहोचता येत नसल्याचे तिने म्हटले.

काही दिवसांपूर्वी आपल्या पोस्टवर अतिशय घाणेरड्या कमेंट्स येत असल्याबाबत आपण एक बाईट पोस्ट केली होती, असेही माधुरीने सांगितले. मात्र, हा प्रकार गेल्या तीन वर्षांपासून सुरू असल्याचा दावा तिने केला आहे.

‘कुणीतरी माझं फॅन पेज हॅक केलं’

माधुरीने पुढे सांगितले की, तिचे विकिपीडिया पेज दिसत नाही. तसेच तिच्या काही फॅन पेजेसना हॅक करण्यात आले असून त्यातील काही पेजेस हटवण्यात आल्याचेही तिने म्हटले आहे.

इतकंच नाही तर तिच्या वर्किंग नंबरवर ‘कॉल बॉम्बिंग’ करण्यात आल्याचा दावाही तिने केला. सतत फोन वाजत राहणे आणि त्याचा कोणत्याही कामासाठी उपयोग न होणे, यामुळे आपल्याला नाहक त्रास सहन करावा लागत असल्याचे माधुरीने सांगितले.

Box Office: ‘Hanuman Ansh’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ! यशच्या ‘Toxic’ला दिली टक्कर, कमावला तब्बल 2600% नफा

‘कोण करतंय, का करतंय काहीच कळत नाही’

या सर्व प्रकारामागे नेमकं कोण आहे आणि हे का केलं जात आहे, याची आपल्याला काहीच माहिती नसल्याचे माधुरीने स्पष्ट केले.

या सगळ्यामुळे आपल्याला वेगळ्या प्रकारचा मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचेही तिने सांगितले. बाहेर जातानाही सुरक्षिततेची चिंता वाटते. ‘कोण काय बोलेल? कोण मध्येच काही करेल का?’ असे अनेक विचार सतत मनात येत असल्याचे माधुरीने व्हिडीओमध्ये सांगितले.

सायबरकडे तक्रार, मात्र अद्याप पुरावा नाही

माधुरीने या प्रकरणी सायबरकडे तक्रार केल्याचे सांगितले. मात्र, या प्रकारामागे कोण आहे, याबाबत अद्याप कोणताही पुरावा सापडला नसल्याचे तिने म्हटले आहे.

‘हे सतत होत चाललंय, हे थांबतच नाहीये,’ असं म्हणत तिने संबंधित यंत्रणांकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली आहे.

मुख्यमंत्र्यांसह नेत्यांकडे मदतीची मागणी

माधुरीने आपल्या व्हिडीओच्या माध्यमातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्याकडे मदतीची मागणी केली आहे. आपल्या परिस्थितीची दखल घेऊन योग्य ती मदत आणि संरक्षण मिळावे, अशी तिची विनंती आहे.

तिने सुनेत्रा पवार यांच्याकडेही मदतीची मागणी केली आहे. गेल्या तीन वर्षांपासून हे प्रकार सुरू असून प्रेक्षकांना याबाबत आता माहिती होत असल्याचे माधुरीने म्हटले आहे.

‘मला न्याय आणि सुरक्षिततेसाठी तुमच्या मदतीची गरज आहे’

माधुरीने हा व्हिडीओ शेअर करताना आपल्या पोस्टमध्येही आपली व्यथा मांडली. ‘मला न्याय आणि सुरक्षिततेसाठी तुमच्या मदतीची गरज आहे,’ असे तिने म्हटले आहे.

आपल्याबद्दल चुकीच्या आणि अपमानास्पद कमेंट्स करून सतत टार्गेट केले जात असल्याचा तसेच बदनामी करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा तिने केला आहे. आपले विकिपीडिया पेज डिलीट करण्यात आल्याचे आणि सोशल मीडिया अकाउंट्स हॅक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही तिने नमूद केले.

‘एक मुलगी म्हणून ही परिस्थिती माझ्यासाठी मानसिकदृष्ट्या खूप त्रासदायक आणि भीतीदायक आहे,’ असे म्हणत माधुरीने या प्रकारामागे कोण आहे, याची योग्य चौकशी व्हावी आणि आपली प्रतिष्ठा व सुरक्षितता जपली जावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Hunkar The Roar: १७ वर्षांच्या मुलीच्या एका आरोपाने हादरली शक्तिशाली व्यवस्था; ‘हुंकार: द रोअर’चा थरारक टीझर!

Web Title: Madhuri pawar social media harassment cyber complaint

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2026 | 09:32 AM

Topics:  

  • Entertainemnt News
  • marathi actress

संबंधित बातम्या

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक
1

Chinmayi More: ‘धाकट्या सुनबाई’ फेम चिन्मयी मोरेने उलगडला यशाचा प्रवास; आईविषयी बोलताना झाली भावुक

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत
2

Janhavi Killekar: जान्हवी किल्लेकरने जिंकली मनं! वाढदिवसाची पार्टी रद्द करून SMAग्रस्त चिमुकली गार्गीच्या उपचारांसाठी केली मदत

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ
3

Prapti Redkar: स्त्रीशक्ती म्हणजे नेमकं काय? प्राप्ती रेडकरने सांगितला स्वाभिमान आणि आत्मविश्वासाचा अर्थ

Milind Gawali: ‘जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..’, अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक; जुन्या आठवणींना उजाळा
4

Milind Gawali: ‘जगणंसुद्धा आपल्या हातात नसतं..’, अभिनेत्री मधू कांबीकर यांच्या निधनाने मिलिंद गवळी भावूक; जुन्या आठवणींना उजाळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.