Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 30 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahima Mhatre: तूला जपणार आहे’च्या सेटवर घडला भयंकर अपघात; ८ महिन्यांनी महिमाने काढली नाकावरची पट्टी, सांगितला थरारक प्रसंग

Mahima Mhatre: ‘तूला जपणार आहे’च्या सेटवर घोडेस्वारी करताना महिमा म्हात्रेचा अपघात झाला. नाकाला गंभीर दुखापत झाल्यानंतर ८ महिने पट्टी का लावावी लागली, अभिनेत्रीने सांगितलं.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 30, 2026 | 04:00 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mahima Mhatre: मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेत्री महिमा म्हात्रे सध्या ‘तूला जपणार आहे’ या मालिकेमुळे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. मालिकेतील ‘मीरा’ या व्यक्तिरेखेमुळे तिने प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून महिमा नाकावर आणि कपाळावर पट्टी लावून मालिकेचं शूटिंग करत होती. त्यामुळे चाहत्यांच्या मनातही अनेक प्रश्न निर्माण झाले होते.

सोशल मीडियावरील कमेंट्समध्ये चाहते तिला वारंवार विचारत होते की, नाकावर पट्टी का आहे? नेमकं काय झालं? अखेर महिमाने या सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. अभिनेत्रीने स्वतःसोबत घडलेला धक्कादायक अपघात सांगितला. हा प्रसंग सांगताना ती भावुक झाली आणि तिला अश्रू अनावर झाले.

“आज मी नाकावरची पट्टी काढतेय…”

महिमाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलं, “गेले काही महिने मी नाकावर अन् कपाळाला पट्टी लावून शूटिंग करतेय. सगळेच मला विचारत आहेत, नेमकं काय झालं होतं आणि इतके महिने तुम्ही पट्टी लावून का शूट करताय? त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी तुम्हाला देणार आहे.”

पुढे ती म्हणते, “मध्यंतरी मी मालिकेत दिसत नव्हते, तेव्हासुद्धा प्रेक्षकांनी मला खूप मनापासून मिस केलं. माझ्या सगळ्या चाहत्यांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे, कारण आज मी ही नाकावरची पट्टी काढतेय.”

आता उपचार पूर्ण झाल्यानंतर लवकरच ती मालिकेच्या एपिसोडमध्ये पूर्वीप्रमाणे दिसणार असल्याचंही महिमाने सांगितलं.

अथर्वचा जीव वाचवण्यासाठी घोड्यावर स्वार झाली होती मीरा

मालिकेत मीरा ही धाडसी व्यक्तिरेखा दाखवण्यात आली आहे. त्यामुळे आतापर्यंत महिमाने अनेक अॅक्शन आणि कठीण सीन्स केले आहेत. असाच एक सीन तिच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.

महिमा सांगते की, मीरा अथर्वचा जीव वाचवण्यासाठी घोड्यावर स्वार होऊन त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते, असा सीन शूट करण्यात येत होता. यासाठी संपूर्ण टीम उत्सुक होती. मैदानात शूटिंग सुरू झाल्यानंतर सुरुवातीचे दोन-तीन शॉट्सही व्यवस्थित पार पडले.

मात्र, शेवटचा शॉट घेत असताना अचानक घोडा प्रचंड वेगाने धावू लागला.

Mirzapur: The Movie: ‘मिर्झापूर द मूव्हीला मिळालं ‘हे’ सर्टिफिकेट; पंकज त्रिपाठीच्या सिनेमाचा रनटाइम किती? जाणून घ्या

घोडा उधळला अन् दोघेही खाली पडले

महिमाच्या म्हणण्यानुसार, ती आणि अथर्व दोघेही घोड्यावर होते. शॉट कट झाल्यानंतर अचानक घोडा उधळला. तिने घोड्याला नियंत्रित करण्याचा प्रयत्न केला, लगाम खेचला; मात्र घोडा काही केल्या थांबत नव्हता.

“त्या क्षणाला मला काहीच समजलं नाही. मी घोड्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला, लगाम खेचला; पण काही केल्या तो घोडा कंट्रोल होत नव्हता. शेवटी आम्ही दोघंही पडलो,” अशी आठवण महिमाने सांगितली.

दोघेही खाली पडल्यानंतर सेटवरील सर्वजण त्यांच्याकडे धावत आले. सुरुवातीला दुखापत फार गंभीर नसावी असंच सर्वांना वाटलं. मात्र, काही क्षणांतच महिमाच्या नाकातून रक्तस्राव सुरू झाला.

“अचानक नाकावर रक्ताची धार लागली. त्याक्षणी मला जाणवलं की काहीतरी मेजर झालंय,” असं महिमाने सांगितलं.

दोन-तीन दिवस रुग्णालयात होती महिमा

अपघातानंतर महिमाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. तिथे तिच्या दुखापतीचं गांभीर्य लक्षात आलं. अभिनेत्रीच्या कुटुंबीयांनाही याची माहिती मिळताच ते रुग्णालयात पोहोचले.

“मला लगेच हॉस्पिटलला नेलं. तेव्हा मला समजलं की खूप लागलंय. मला संपूर्ण माझं आयुष्य डोळ्यासमोर दिसत होतं. माझे सगळे कुटुंबीय हॉस्पिटलला आले,” असं ती म्हणाली.

महिमा दोन-तीन दिवस रुग्णालयात होती. त्यानंतर डॉक्टरांनी तिला विश्रांतीचा सल्ला दिला. काही दिवस ती शूटिंगपासूनही दूर होती.

Bharti Singh Gets Emotional on Raksha Bandhan: राखी बांधताना भारती झाली भावुक; पापाराझीच्या गिफ्टने अश्रू अनावर

सात-आठ दिवसांत पुन्हा शूटिंगला सुरुवात

उपचार सुरू असतानाही महिमाने काम थांबवलं नाही. अपघातानंतर अवघ्या सात-आठ दिवसांनी ती पुन्हा सेटवर परतली.

“अपघात झाल्यावर पुन्हा एकदा उठून उभी राहिले आणि शूटिंगला गेले. सात-आठ दिवसांनी पुन्हा सेटवर गेले आणि शूट सुरू केलं. पट्टी लावून का होईना, मी काम केलं. माझी औषधं सुरू होती, ट्रिटमेंट सुरू होती,” असं महिमाने सांगितलं.

या काळात प्रोडक्शन हाऊसनेही तिला मोठा पाठिंबा दिला. कुटुंबीय, प्रेक्षकांचं प्रेम आणि प्रोडक्शनच्या सहकार्यामुळेच आपण पुन्हा कामावर परतू शकले, असं तिने सांगितलं.

चेहऱ्यावर व्रण झाल्यामुळे लावावी लागत होती पट्टी

अपघातानंतर महिमाच्या चेहऱ्यावर व्रण झाला होता. हा डाग आणखी गडद होऊ नये आणि त्यावर थेट सूर्यप्रकाश पडू नये, यासाठी ती नाकावर पट्टी लावत होती.

“अपघात झाल्यावर चेहऱ्यावर एक व्रण आला होता. त्यामुळे तो डाग अजून डार्क होऊ नये, तसेच सूर्यप्रकाश त्याला लागू नये यासाठी मी काळजीने ती पट्टी नाकावर लावत होते. जर पट्टी काढली असती, तर गोष्टी अजून बिघडल्या असत्या,” असं महिमाने स्पष्ट केलं.

तब्बल आठ महिने पट्टी लावून शूटिंग करणं तिच्यासाठी सोपं नव्हतं. मात्र, प्रेक्षकांनी दिलेल्या प्रेमामुळे आणि पाठिंब्यामुळे तिने हा कठीण काळ धैर्याने पार केला.

शेवटी चाहत्यांचे आभार मानताना महिमा म्हणाली, “हे जितकं सोपं वाटतंय तितकं नक्कीच नव्हतं. तुम्ही मला खरंच सपोर्ट केलात, त्यासाठी मनापासून थँक्यू! तुम्हा सगळ्यांमुळे मला खूप आधार मिळाला.”

Web Title: Mahima mhatre accident horse riding tula japnar ahe serial

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 04:00 PM

Topics:  

  • Entertainemnt News
  • Marathi Serial

संबंधित बातम्या

The Paradise Song: ‘द पॅराडाईज’चं दुसरं गाणं ‘येशा नागुला’ रिलीज; नानी-कीर्तीच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष
1

The Paradise Song: ‘द पॅराडाईज’चं दुसरं गाणं ‘येशा नागुला’ रिलीज; नानी-कीर्तीच्या केमिस्ट्रीने वेधलं लक्ष

Mirzapur: The Movie: ‘मिर्झापूर द मूव्हीला मिळालं ‘हे’ सर्टिफिकेट; पंकज त्रिपाठीच्या सिनेमाचा रनटाइम किती? जाणून घ्या
2

Mirzapur: The Movie: ‘मिर्झापूर द मूव्हीला मिळालं ‘हे’ सर्टिफिकेट; पंकज त्रिपाठीच्या सिनेमाचा रनटाइम किती? जाणून घ्या

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या
3

Bigg Boss 20: सलमान खानचा ‘बिग बॉस २०’ OTT वर कधी आणि कुठे पाहता येणार? तारीख आणि वेळ जाणून घ्या

Ashwini Bhave USA Home: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी मराठी कलाकारांची खास भेट; घराजवळची बाग पाहून नीना कुलकर्णी भारावल्या
4

Ashwini Bhave USA Home: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी मराठी कलाकारांची खास भेट; घराजवळची बाग पाहून नीना कुलकर्णी भारावल्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.