Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 15 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ashwini Bhave USA Home: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी मराठी कलाकारांची खास भेट; घराजवळची बाग पाहून नीना कुलकर्णी भारावल्या

Ashwini Bhave USA Home: अमृता सुभाष, नीना कुलकर्णींसह ‘असेन मी नसेन मी’च्या टीमने अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी भेट दिली. त्यांच्या ‘Green Door’ बागेतील ताज्या भाज्यांची खास झलक पाहा.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 30, 2026 | 12:15 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घराचा खास VIDEO चर्चेत
  • अमेरिकेतील घरात मराठी कलाकारांचा मुक्काम
  • बागेतील ताज्या भाज्यांनी वेधलं नीना कुलकर्णींचं लक्ष
Ashwini Bhave USA Home:  मराठी रंगभूमी आणि मनोरंजनसृष्टीतील कलाकारांमधील मैत्रीचे अनेक किस्से पाहायला मिळतात. सध्या ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाच्या निमित्ताने मराठी कलाकारांची टीम अमेरिकेत पोहोचली आहे. याच दौऱ्यात या कलाकारांनी अभिनेत्री अश्विनी भावे यांच्या अमेरिकेतील घरी खास भेट दिली. या भेटीचे काही खास क्षण अश्विनी भावे यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. त्यांच्या घराजवळ फुलवलेल्या सुंदर बागेने आणि त्यातील ताज्या भाज्यांनी सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं.

अमेरिकेतही जपली बागकामाची आवड

अश्विनी भावे सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. कामानिमित्त त्या भारतात येत असतात. अमेरिकेतील घराजवळ त्यांनी ‘The Green Door’ नावाने सुंदर बाग फुलवली आहे. या बागेत विविध प्रकारच्या भाज्या आणि फळभाज्यांची लागवड केली जाते.

याच बागेची खास झलक पाहण्यासाठी ‘असेन मी नसेन मी’ नाटकाची टीम अश्विनी भावेंच्या घरी पोहोचली. ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुलकर्णी यांना विशेषतः अश्विनींचं ‘Green Door’ पाहायचं होतं. त्यामुळे या भेटीत बागेची सफर हा खास आकर्षणाचा भाग ठरला.

Akshaya Gurav Divorce: ८ वर्षांचं नातं संपलं! ‘आई कुठे काय करते’ फेम अक्षया गुरवचा घटस्फोट; घटस्फोटावर पहिल्यांदाच केलं भाष्य

“आज माझ्या मैत्रिणी माझ्या घरी येणार आहेत…”

अश्विनी भावे यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद स्पष्ट दिसतो. व्हिडीओच्या सुरुवातीला त्या आपल्या लाडक्या मैत्रिणी आणि नाटकाची टीम घरी डिनरसाठी येणार असल्याचं सांगतात.

“आज माझ्या मैत्रिणी माझ्या घरी येणार आहेत. अमृता सुभाष, नीना कुलकर्णी, शुभांगी गोखले यांच्यासह संदेश कुलकर्णी… ‘असेन मी नसेन मी’ या नाटकाची टीम माझ्या घरी आज डिनरसाठी येणार आहे,” असं अश्विनी म्हणतात.

पुढे त्या म्हणतात, “आपली माणसं जेव्हा घरी येतात, तेव्हा खरंच खूप आनंद होतो. पण ज्यावेळेला कुणी मला सांगतं की, तुझं ‘Green Door’ पाहायला मला यायचंय, तेव्हा मग एकदम धडकी भरते… कारण तुम्ही सगळे माझ्या ‘Green Door’वर इतकं प्रेम करता.”


Salman Khan: ‘सलमानने मला शिवी दिली अन्…’,दिग्दर्शकाने सांगितला पार्टीतील धक्कादायक किस्सा, सलीम खान यांनी असा सोडवला वाद

नीना कुलकर्णींसाठी खास होती बागेची सफर

अश्विनी भावे पुढे सांगतात की, नीना कुलकर्णी यांना त्यांची बाग खास पाहायची होती. “मला खूप समाधान वाटतं. आज नीना ताईंना खास ‘Green Door’ पाहायचं होतं. तिला माझ्या बागेत फिरताना आनंद मिळेल, अशी आशा आहे,” असं त्या म्हणाल्या.

यानंतर अश्विनी भावे यांनी आपल्या बागेतील विविध ताज्या भाज्या कलाकारांना दाखवल्या. काकडी, स्वीट टोमॅटो आणि इतर फ्रेश फळभाज्यांची त्यांनी सर्वांना ओळख करून दिली.

ताज्या स्वीट टोमॅटोची चव घेत कलाकार भारावले

बागेतील ताजे स्वीट टोमॅटो पाहून नीना कुलकर्णी आणि अमृता सुभाष यांनी ते चाखूनही पाहिले. ताज्या टोमॅटोची चव घेतल्यानंतर “हे टोमॅटो आउटस्टँडिंग आहेत,” असं म्हणत दोघींनी अश्विनी भावेंचं कौतुक केलं.

अमेरिकेत राहूनही अश्विनी भावे यांनी बागकामाची आवड जपत आपल्या घराच्या परिसरात अशी हिरवीगार बाग फुलवली आहे. त्यासाठी त्यांनी घेतलेली मेहनत पाहून नाटकाच्या टीममधील कलाकारही भारावून गेले.

नेटकऱ्यांनीही केलं कौतुक

अश्विनी भावे यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनीही भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या साधेपणाचं, प्रेमळ स्वभावाचं आणि सुंदर बागेचं कौतुक केलं.

“अश्विनी ताई खूप प्रेमळ आणि निरागस आहेत,” “सुंदर… एक शब्द आठवतो,” “ताई, बाग खूप सुंदर आहे,” “ही आमची मराठी माणसं… सर्वांशी बोलून-चालून राहतात,” “जराही मोठेपणा नाही,” अशा अनेक कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.

अश्विनी भावे यांच्या ‘Green Door’ची ही झलक पाहून चाहत्यांनाही त्यांच्या या अनोख्या छंदाची ओळख झाली आहे. परदेशात राहूनही आपल्या मातीशी आणि निसर्गाशी जोडलेलं नातं त्यांनी जपल्याचं या व्हिडीओतून पुन्हा एकदा दिसून आलं.

Web Title: Ashwini bhave usa home garden green door

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 12:15 PM

Topics:  

  • America
  • Ashwini Bhave
  • Entertainemnt News

संबंधित बातम्या

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन
1

बाबो… अमेरिकेतही ‘लाडकी बहिण’चा Impact? आता Donald Trump यांनी अमेरिकन नागरिकांना दिले हे मोठं आश्वासन

Marco Rubio India Visit: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव 6 महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात; मुंबई अन् जामनगर दौऱ्यामागचे मोठे कारण काय?
2

Marco Rubio India Visit: अमेरिकेचे परराष्ट्र सचिव 6 महिन्यांत दुसऱ्यांदा भारतात; मुंबई अन् जामनगर दौऱ्यामागचे मोठे कारण काय?

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट
3

Nobel Prize: नोबेल शांतता पुरस्काराचे सर्वात तरुण मानकरी मार्टिन ल्यूथर किंग ज्युनियर; वाचा त्यांच्या संघर्षाची रंजक गोष्ट

Trump Media Ban: ट्रम्प प्रशासनाचा सूडबुद्धीचा निर्णय फेडरल कोर्टाने उधळला; CNN, MSNBCच्या पत्रकारांचा मोठा विजय
4

Trump Media Ban: ट्रम्प प्रशासनाचा सूडबुद्धीचा निर्णय फेडरल कोर्टाने उधळला; CNN, MSNBCच्या पत्रकारांचा मोठा विजय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.