Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 16 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mirzapur: The Movie: ‘मिर्झापूर द मूव्हीला मिळालं ‘हे’ सर्टिफिकेट; पंकज त्रिपाठीच्या सिनेमाचा रनटाइम किती? जाणून घ्या

Mirzapur: The Movie: अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मांच्या ‘मिर्झापूर: द मूव्ही’ला CBFCकडून A सर्टिफिकेट मिळालं असून सिनेमाचा रनटाइम देखील समोर आला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Aug 30, 2026 | 02:45 PM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Mirzapur: The Movie:  बहुचर्चित ‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या सिनेमाच्या प्रदर्शनाला आता फारसा वेळ शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे चाहत्यांची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच सिनेमाशी संबंधित एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ला केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) प्रमाणपत्र मिळालं असून, सिनेमाचा रनटाइमही समोर आला आहे.

‘मिर्झापूर: द मूव्ही’ला मिळालं A सर्टिफिकेट

CBFCच्या वेबसाइटवर उपलब्ध माहितीनुसार, २९ ऑगस्ट रोजी ‘मिर्झापूर: द मूव्ही’ला अधिकृत प्रमाणपत्र देण्यात आलं आहे. एक्सेल एंटरटेनमेंटने सिनेमाच्या प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. त्यानंतर मुंबईतील प्रादेशिक कार्यालयाकडून सिनेमाला प्रमाणपत्र देण्यात आलं.

सिनेमाला A सर्टिफिकेट मिळालं आहे. त्यामुळे हा सिनेमा केवळ प्रौढ प्रेक्षकांसाठी असणार आहे. ‘मिर्झापूर’च्या आधीच्या सीझनप्रमाणेच सिनेमातही हिंसा, अॅक्शन आणि गुन्हेगारी विश्वाची पार्श्वभूमी पाहायला मिळणार असल्याने A सर्टिफिकेट मिळाल्याचं मानलं जात आहे.

तब्बल ३ तास १७ मिनिटांचा सिनेमा

‘मिर्झापूर: द मूव्ही’च्या रनटाइमनेही चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. अली फजल, पंकज त्रिपाठी आणि दिव्येंदू शर्मा यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा तब्बल १९७.१९ मिनिटांचा आहे. म्हणजेच सिनेमाचा रनटाइम जवळपास ३ तास १७ मिनिटं इतका आहे.

काय आहे सिनेमाची कथा?

CBFCच्या माहितीनुसार, ‘मिर्झापूर: द मूव्ही’ची कथा मिर्झापूरच्या गादीभोवती फिरणार आहे. जुन्या शत्रूंचं पुन्हा आगमन आणि नव्या धोक्यांमुळे मिर्झापूरच्या सत्तेसाठीची लढाई आणखी तीव्र होणार आहे.

रक्ताचा बदला घेतला जाणार असून, सत्तेची भूक असलेले अनेक दावेदार शहराच्या हिंसक अंडरवर्ल्डवर नियंत्रण मिळवण्यासाठी एकमेकांशी संघर्ष करताना दिसणार आहेत. त्यामुळे सिनेमा अॅक्शन आणि क्राइम थ्रिलरचा जबरदस्त डोस देणार असल्याचं स्पष्ट होतं.

गुड्डू, मुन्ना आणि कालीन भैया पुन्हा आमनेसामने

दिग्दर्शक गुरमीत सिंह यांनी या क्राइम थ्रिलर सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात अली फजल गुड्डू पंडित, दिव्येंदू शर्मा मुन्ना त्रिपाठी आणि पंकज त्रिपाठी कालीन भैया या लोकप्रिय भूमिकांमध्ये पुन्हा दिसणार आहेत.

विशेष म्हणजे, ‘बबलू पंडित’ या भूमिकेत यावेळी अभिनेता जितेंद्र कुमार दिसणार आहे. या भूमिकेत यापूर्वी विक्रांत मॅसी दिसला होता.

Sonam Wangchuk On Aamir Khan Ghajini: ‘गजनी’ म्हणत सोनम वांगचुकांचा आमिर खानला टोला; ‘3 इडियट्स’बाबत केला मोठा खुलासा

४ सप्टेंबरला थिएटरमध्ये होणार रिलीज

‘मिर्झापूर’ फ्रँचायझीची सुरुवात २०१८ मध्ये झाली होती. पहिला सीझन अमेझॉन प्राइम व्हिडीओवर प्रदर्शित झाला आणि त्याला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला. त्यानंतर २०२० मध्ये दुसरा आणि २०२४ मध्ये तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला.

आता या लोकप्रिय फ्रँचायझीचा विस्तार मोठ्या पडद्यावर होत आहे. ‘मिर्झापूर: द मूव्ही’ ४ सप्टेंबर २०२६ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Ashwini Bhave USA Home: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी मराठी कलाकारांची खास भेट; घराजवळची बाग पाहून नीना कुलकर्णी भारावल्या

Web Title: Mirzapur the movie a certificate runtime pankaj tripathi movie

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 02:45 PM

Topics:  

  • bollywood movies
  • Entertainemnt News
  • Pankaj Tripathi

संबंधित बातम्या

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; राम-रावण युद्धाची भव्य झलक पाहून चाहते भारावले
1

Ramayana Trailer: रणबीर कपूरच्या ‘रामायण’चा दमदार ट्रेलर प्रदर्शित; राम-रावण युद्धाची भव्य झलक पाहून चाहते भारावले

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर
2

Ramayana Release Date: दिवाळीत बॉक्स ऑफिसवर रंगणार ‘रामायणम्’चा भव्य सोहळा! रणबीर कपूरच्या चित्रपटाची रिलीज डेट जाहीर

Sheetal Upare Bollywood Entry:  मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
3

Sheetal Upare Bollywood Entry: मॉडेलिंग, अभिनय ते पटकथालेखन; आता अभिनेत्री शीतल उपारेची बॉलिवूडमध्ये एन्ट्री

Darshan Raval New Song: पहिलं प्रेम, जुन्या आठवणी अन् पुन्हा भेटण्याची ओढ! ‘पहला प्यार दूसरी बार’चं ‘जाने किस मोड़ पे’ गाणं रिलीज
4

Darshan Raval New Song: पहिलं प्रेम, जुन्या आठवणी अन् पुन्हा भेटण्याची ओढ! ‘पहला प्यार दूसरी बार’चं ‘जाने किस मोड़ पे’ गाणं रिलीज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.