Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 12 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Medha Manjrekar: मेधा मांजरेकरांना कर्करोगाचं निदान; आईसाठी लेक सईची भावनिक पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली…

मेधा मांजरेकर यांनी कर्करोगावरील उपचारांच्या प्रवासाबाबत भावनिक पोस्ट शेअर केली. यानंतर लेक सई मांजरेकरने आईसाठी खास पोस्ट करत, “मला तुझा अभिमान आहे” अशा शब्दांत भावना व्यक्त केल्या.

  • By अमृता यादव
Updated On: Jul 13, 2026 | 11:38 AM
(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

ज्येष्ठ अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांच्या पत्नी तसेच अभिनेत्री आणि निर्माती मेधा मांजरेकर यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत आपल्याला कर्करोगाचे निदान झाल्याची माहिती दिली. त्यांना कॅन्सरचं निदान झाल्याचं कळताच इंडस्ट्रीतील कलाकरांनी काळजी व्यक्त केली आहे. याशिवाय मेधा मांजरेकर यांच्यासाठी त्यांच्या लेकीने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

कर्करोगाशी सुरू असलेल्या लढ्याबद्दल अभिनेत्री आणि निर्माती मेधा मांजरेकर यांनी नुकतीच सोशल मीडियावर मन हेलावून टाकणारी पोस्ट शेअर केली. उपचारांच्या पहिल्या टप्प्याचा प्रवास पूर्ण होत आल्याची माहिती देतानाच त्यांनी या कठीण काळात साथ देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या पोस्टनंतर त्यांची मुलगी आणि अभिनेत्री सई मांजरेकर हिनेही आईसाठी भावनिक संदेश लिहित तिच्या धैर्याला सलाम केला.

मेधा यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, “शस्त्रक्रिया, केमोथेरपी आणि रेडिएशनपेक्षा या प्रवासात मला मिळालेलं प्रेम, आधार आणि आशीर्वाद माझ्यासाठी अधिक मोलाचे आहेत. माझे गुरु, डॉक्टर, परिचारिका, कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी आणि महेश यांच्या पाठिंब्यामुळेच मी हा कठीण टप्पा पार करू शकले.” त्यांनी उपचारादरम्यानचे अनेक फोटोही पोस्ट करत हा संपूर्ण प्रवास चाहत्यांसमोर मांडला.

मेधा यांची ही पोस्ट अभिनेत्री सई मांजरेकरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर रिशेअर केली. आईच्या धैर्याचं कौतुक करत सईने लिहिलं, “तू खूप जास्त खंबीर आहेस… मला तुझा अभिमान आहे, आई…” या काही शब्दांत तिने आईवरील प्रेम, विश्वास आणि अभिमान व्यक्त केला. सईची ही पोस्ट सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरत असून, चाहत्यांकडून आई-लेकीच्या या नात्याचं कौतुक केलं जात आहे.

(फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Aamir Khan’s third wedding: ‘तो आता ट्रिपल इंजिन चालवत आहेत’, आमिरच्या तिसऱ्या लग्नावर शेखर सुमन यांचा टोमणा, मोदींचा केला उल्लेख

अभिनेत्री केतकी माटेगांवकर, स्वप्नील जोशी, नीना कुलकर्णी, मंजिरी ओक, तेजस्विनी लोणारी, प्राजक्ता गायकवाड, मानसी नाईक, मेघा धाडे आणि मनवा नाईक यांच्यासह अनेकांनी कमेंट करत मेधा यांना धीर दिला. “तुम्ही लवकर बऱ्या व्हा”, “आम्ही कायम तुमच्या पाठीशी आहोत”, “खंबीर राहा मेधा ताई” अशा शब्दांत कलाकारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. मेधा यांच्या धैर्याचे कौतुक करत या कठीण काळात संपूर्ण मनोरंजन विश्व त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली.

Prajakta Gaikwad : शूटिंगमधून वेळ काढत प्राजक्ता गायकवाडची पंढरीवारी; अभिनेत्रीच्या साधेपणाचं होतंय कौतुक, शेअर केलं सुंदर फोटो

Web Title: Medha manjrekar diagnosed with cancer daughter sai shares an emotional post says

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 11:38 AM

Topics:  

  • cancer
  • Entertainemnt News
  • mahesh manjrekar

संबंधित बातम्या

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट
1

Mee Sansar Mazha Rekhite: आईच्या मायेचं रौद्ररूप! लेकीसाठी अनुप्रिया बनणार दुर्गा; ‘मी संसार माझा रेखिते’मध्ये महाट्विस्ट

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना
2

Abhijit Sawant Meets Big B: ‘स्वप्नवत वाटणारी भेट!’ अमिताभ बच्चन यांना भेटल्यानंतर अभिजीत सावंतने व्यक्त केल्या भावना

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”
3

Salman Khan Good News :सलमान खानने चाहत्यांना दिलं मोठं सरप्राइज! VIDEO शेअर करत म्हणाला, ‘सब यहां मिलेगा…’।”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.