
Onkar Bhojane Milind Kawde (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
‘अफरातफरी’ सिनेमाच्या प्रमोशनला ओंकार भोजने येत नव्हता. त्यामुळे दिग्दर्शक मिलिंद कवडे खूप नाराज झाले. त्यांनी एका मुलाखतीत रागाच्या भरात ओंकारबद्दल वक्तव्य केलं. ते म्हणाले होते की ओंकार खूप अनप्रोफेशनल आहे, खोटं बोलतो आणि प्रमोशनला येत नाही. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर खूप चर्चा झाली. लोक ओंकारला ट्रोल करू लागले.यानंतर ओंकारने पण एका मुलाखतीत आपली बाजू मांडली होती. पण वाद काही थांबत नव्हता.आता दोघे समोरासमोर आले
अलीकडेच ‘अफरातफरी’ च्या पूर्ण टीमने एबीपी माझाला मुलाखत दिली. या मुलाखतीत खास गोष्ट म्हणजे ओंकार भोजने आणि दिग्दर्शक मिलिंद कवडे दोघेही समोरासमोर बसले होते. सगळ्यांना वाटलं होतं की आता भांडण होणार, पण तसं काही झालं नाही. मिलिंद कवडे यांनी या मुलाखतीत सांगितलं की, “मी जेव्हा ते बोललो, त्यानंतर मला ओंकारचा कॉल आला.
तो म्हणाला, सर तुम्हाला जो राग आला आहे तो मी समजू शकतो. मी प्रमोशनला येतोय. मी त्याला म्हटलं You are most welcome. आणि तो विषय मी तिथेच संपवला.”ते पुढे म्हणाले, “काल पण मला एका मुलाखतीत याबद्दल विचारलं. मी सांगितलं की माझ्यासाठी तो विषय संपला आहे. त्याने स्वतःहून मला कॉल केला. जरी तो कॉल चार-पाच महिन्यांनी आला असेल तरी त्याने कॉल केला, हेच महत्वाचं आहे.”म्हणजे दिग्दर्शकाने आता माघार घेतली आहे आणि वाद मिटवला आहे.
Onkar Bhojane: “ओंकार भोजने खूप अनप्रोफेशनल”; अभिनेत्याच्या …
मिलिंद कवडे यांचं बोलणं ऐकून ओंकार भोजने पण शांतपणे उत्तर दिलं. तो म्हणाला, “आपल्याबद्दल भरभरून कौतुक ऐकताना नेहमीच आनंद होतो. माझ्याकडून संवाद कमी पडत असेल तर मी त्यात सुधारणा करेन. कधी कधी आपण छोट्या छोट्या गोष्टींना जास्त महत्व देतो. मला वाटतं तसं करू नये.”
ओंकारने पुढे त्याला प्रमोशन का आवडत नाही याबद्दल पण सांगितलं. तो म्हणाला, “मला सिनेमाबद्दल बोलायला आवडतं. शूटिंग कसं झालं, सहकलाकार कसे होते, कामाच्या आठवणी सांगायला आवडतात. पण आजकाल प्रमोशनच्या नावाखाली वेगळंच काहीतरी विचारतात. तू कुठल्या झोपडीतून आलास, कुठल्या सोसायटीत राहतोस, हे मला नाही आवडत. जेव्हा मी माझी कारकीर्द मोठी करेन तेव्हा मी नक्की सांगेन की माझ्या झोपडीतली दिवाळी कशी लाख मोलाची होती. पण आत्ताच्या आत्ता या गोष्टी मला नाही जमत, म्हणून मी थोडा लांब राहतो.”
ओंकारचं हे उत्तर ऐकून अनेकांना त्याची बाजू पटली आहे. त्याला फालतू चर्चेत पडायचं नव्हतं. फक्त त्याच्या कामाबद्दल बोलायचं आहे, असं त्याने स्पष्ट केलं.एकंदरीत काय तर, या दोघांमधला वाद आता संपला आहे असं दिसतंय. दोघांनीही समजदारी दाखवली आहे. आता सगळ्यांचं लक्ष फक्त ‘अफरातफरी’ सिनेमाकडे आहे. हा सिनेमा कॉमेडी असणार आहे आणि ओंकारच्या अभिनयाची सगळ्यांना उत्सुकता आहे.